Big Breaking ! कसारा इगतपुरी मार्गावर मालगाडीचे सात डबे घसरले

Ahmednagarlive24 office
Published:
Big Breaking

Big Breaking  : कसारा आणि इगतपुरीदरम्यान डाऊन मार्गावर संध्याकाळी साडेसहा वाजता मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे कसारा ते इगतपुरीदरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.

या घटनेत जेएनपीटी/डीएलआयबी कंटेनर ट्रेनसह सात डबे रुळावरून घसरले. परिणामी, या मार्गावरील सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस यांसह अन्य मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.

या व्यत्ययाचा लोकल उपनगरीय रेल्वे सेवेवर मात्र कोणताही विपरित परिणाम झाला नाही. मध्य रेल्वे मार्गावर मेल- एक्स्प्रेस, मालगाड्यांचे डबे घसरण्याच्या घटना चालू वर्षात वाढल्या आहेत.

अशातच रविवारी सायंकाळी ६.३१ वाजता कसारा आणि इगतपुरीदरम्यान डाऊन मार्गावर मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे एक अभियांत्रिकी पथक परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

सायंकाळपासून घटनास्थळी घसरलेले डबे हटवण्याचे आणि रूळ दुरुस्तीचे काम सुरू आहे. या घटनेमुळे कसारा-इगतपुरी डाऊन मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

मालगाडीच्या अपघातानंतर ट्रेन १७६१२ सीएसएमटी नांदेड एक्स्प्रेसला कल्याण-कर्जत- पुणे-दौंड-लातूर मार्गे वळवण्यात आली आहे. तर रेल्वे क्रमांक १२१०५ सीएसएमटी गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस कल्याण-पुणे-दौंड-मनमाड मार्गे वळवली गेली.

रेल्वे क्रमांक १२१३७ सीएसएमटी- फिरोजपूर पंजाब मेल-एक्स्प्रेसला दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे आणि रेल्वे क्रमांक १२२८९ सीएसएमटी नागपूर दुरांतो एक्स्प्रेसला दिवा-वसई- उधना-जळगाव मार्गे वळवण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe