अहमदनगर ब्रेकिंग : सतरा वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नागरदेवळे (ता. नगर) येथे एका सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, दि.१९ रोजी दुपारी ३.५५ वाजेच्या पूर्वी घडली.

पायल भाऊसाहेब साबळे (वय १७, रा. लक्ष्मीनगर, नागरदेवळे) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन युवतीचे नाव आहे. दरम्यान, तिने आत्महत्या का केली, याबाबतची माहिती समजू शकली नाही.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पायल साबळे रविवारी दुपारी घरी असताना तिने घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

सदरचा प्रकार ३.५५ वाजेच्या सुमारास नातेवाईकांच्या निदर्शनास आला. तिचे वडील भाऊसाहेब दत्तू साबळे यांनी तिला उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुणालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबतची खबर जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,

पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.याबाबत अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलीस अंमलदार विधाते अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe