अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिवव्याख्याते जितेश सरडे यांच्या वकृत्वाची दखल त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीत आमदार निलेश लंके यांच्या प्रचारसभा गाजविल्या होत्या. त्यावेळी राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच केले होते.
राज्यात आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सरडे यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी देण्यासंदर्भात हालचालीही सुरू झाल्या होत्या.
परंतू कोरोनो विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर विदयार्थी काँग्रेस पदाधिकारी निवडी लांबणीवर पडल्या होत्या. अलिकडेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून सरडे यांना दोनदा मुलाखतीसाठी मुंबईत बोलविण्यात आले होते.
दोन्ही मुलाखतींमध्ये सरडे यांनी आपले वेगळेपण सिद्ध करीत प्रदेशाध्यक्ष पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख, विदयार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांना प्रभावित केले होते.
गुरूवारी रात्री सरडे यांच्याशी संपर्क करण्यात येउन शुक्रवारी होणा-या राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीसाठी आमंत्रीत करण्यात आले होते.
राष्ट्रवादी भवनामध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पार पडलेल्या या बैठकीत विभागवार आढावा घेण्यात येउन विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
त्यात सरडे यांच्यावर माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आदीती तटकरे, सोनिया दुहन,
मेहेबूब शेख हे पदाधिकारी तर जितेश सरडे यांच्यासमवेत अॅड. राहुल झावरे, सरपंच अरूण पवार, संदीप चौधरी, राहुल थोरात, सचिन कणसे हे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा