श्रीगोंदा :- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातून भाजपचे दोन नगरसेवक व पक्षाचे उमेदवार नाना कोथिंबिरे आणि सुनील वाळके यांच्यासह तब्बल ५४ जणांची शहरातून हद्दपारी करण्यात आली आहे. प्रातांधिकारी गोविंद दाणेज यांनी ही माहिती दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १४२ जणांना शहरातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. त्या प्रकरणांची प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन ५६ जणांना हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अन्य प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. या ५६ जणांना २७ जानेवारीपर्यंत शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सुनील वाळके, अक्षय काळे, मंगेश मोटे, गोरख आळेकर, नितीन वाळके, ऋषिकेश गायकवाड, अविनाश घोडके, अतिक कुरेशी, स्वप्निल खेत्रे, अतुल दुतारे, बंडी उर्फ संतोष कोथिंबीरे, दीपक मखरे, जीवा घोडके, युसुफ शेख, अमीर शेख, दिलीप लबडे, दत्तु कोथिंबीरे, वैभव काळोखे, आदिशा उर्फ आदिक काळे, भाऊ कोथिंबीरे, विजय साळुंके, दिंगबर साळुंके, सचिन गायकवाड, संतोष मखरे, प्रदीप मोटे, अरिफ मालजप्ते, प्रविण मखरे, अक्षय मखरे, दत्तात्रेय वाळके, मंगेश वाळके, महेश कोथिंबीरे, बत्तीस शेख, नीतीन गायकवाड, युवराज सावंत, इम्रान सय्यद, गुलाब खेंडके, भीमा मखरे, दत्तात्रेय खेडकर, गणेश मोटे, गोरख लोखंडे, किरण उर्फ बाळू माने, अजीत माने, सुरेश जाधव, अरविंद माने, अनिल कोथिंबीरे, नाना कोथिंबीरे, बंडू कोथिंबीरे, गणेश कोथिंबीरे, शाम शेंडगे, अनिल शेंडगे, बाळू शेंडगे, राजेंद्र राऊत, वसीम ताडे, बापु दातीर, सागर मखरे, गणेश चांदगुडे, यांचा यामध्ये समावेश आहे.