Shrirampur News : शेतकऱ्याच्या हातात बनावट नोटा; श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याने दिला नकार

Published on -

Shrirampur News : बँकेत भरणा करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला श्रीरामपूर येथील बटाटा व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या बिलाच्या रक्कमेत पाचशे रुपयांच्या दोन नोटा बनावट निघाल्या आहे. मात्र, या विषयी संबधित शेतकऱ्याने व्यापाऱ्याशी संपर्क केला असता, त्याने हात वर केल्याने नकली नोटा पदरात पडल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.

आधीच शेतमालाच्या बाजारभावाने जेरीस आलेला शेतकरी वर्ग आता बनावट नोटामुळे अडचणीत सापडला आहे. या प्रकारामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील महिन्यात श्रीराम नवमीमध्ये शंभरच्या काही बनावट नोटा आढळून आल्या होत्या.

त्यानंतर आता पुन्हा एकदा नकली नोटांचे मार्केट तालुक्याच्या ठिकाणी समोर आले आहे. चितळी येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्याने श्रीरामपूर येथील भाजी मार्केट येथील बटाटा व्यापाऱ्याला १५० गोणी बटाटा दिला होता.

त्या बिलापोटी मिळालेली रक्कमेत पाचशेच्या बंडलमध्ये दोन नोटा बनावट मिळून आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधनतेची काळजी घ्यावी. शेतमाल विक्रीतून मिळालेली रक्कम मोठी असेल तर करन्सी मशीनवर समक्ष मोजून व तपासून घेतली पाहिजे.

अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची होऊ शकते. दरम्यान, बाजार समितीने द्यावा, अशी मागणी न्याय मिळवून केली जात आहे. संबंधित शेतकऱ्याने पाचशे रुपयांच्या मिळालेल्या बनावट नोटा बदलून देण्यासाठी व्यपाऱ्यांशी संपर्क साधला.

मात्र हे शक्य नाही म्हणून त्याने हात वर केले आहे. याचा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागणार असल्याने बाजार समितीने यात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe