नगर :- तालुक्यातील हिवरे झरे येथील शेतकरी अशोक नाथा खेंगट यांचा गट नंबर ३२० मध्ये एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती.
गुरुवारी (१७ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या शेतावरून गेलेली विद्युतवाहिनी तुटून उसाच्या शेतात पडल्याने हा ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर या परिसरातील महावितरण कर्मचारी व तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तरी या शेतकऱ्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.