अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- कोविडचे संकट उभे राहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेऊन ‘सुरभि’ने पहिले खासगी कोविड हॉस्पिटल सुरू केले. अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारूपाला आले आहे.
13 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारणारे जिल्ह्यातील एकमेव खाजगी हॉस्पिटल आहे. प्रशासकीय यंत्रणेलाही मदत करण्यातही सुरभि नेहमी अग्रेसर असते, असे गौरवोद्दार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले.

आज शनिवारी (दि. 15) सुरभि हॉस्पिटल येथे 13 के. एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सीजन टॅंकचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सुरभि ब्लड बँकेचे लोकार्पण आ. संग्राम जगताप व 32 स्लाइस क्षमतेचा सिटीस्कॅन मशिनचे लोकार्पण महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार, डॉ. विजय भंडारी, सुरभि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी यांच्यासह सुरभि हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. भोसले म्हणाले की, अल्पावधीतच सुरभि हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.
तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सुरभिचे काम नेहमीच अग्रेसर राहिले आहे. सुरभि हॉस्पिटलने प्रशासकीय यंत्रणेलाही नेहमीच मदतीची भूमिका ठेवली आहे. सामाजिक बांधिलकी जपत हॉस्पिटलकडून वेळोवेळी समाजहिताचे उपक्रम राबविले जातात. वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक सेवेतही हॉस्पिटलचे काम दिशादर्शक आहे.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, सुरभी हॉस्पिटलने शहर व परिसरातील अनेक गरजू रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले आहेत.
उच्च दर्जाची वैदकिय सेवा देण्यात सुरभि अग्रेसर आहे. आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, सुरभिने केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात विशेष कामगिरी बजावली आहे. सामाजिक बांधिलकी जपून हॉस्पिटलची वैद्यकीय वाटचाल सुरू आहे.
अचानकपणे तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यास सुरभि हॉस्पिटल ऑक्सिजन, नवीन अद्यावत रक्तपेढीसह सर्व प्रकारच्या यंत्रसामुग्रीसहीत संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांनी मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम