अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- आयपीएलच्या १३ व्या सत्रात फिक्सिंगची शक्यता वर्तवली जात आहे. लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूला कोणत्या बाहेरील व्यक्तीने संपर्क केला आहे आणि तो फिक्सिंग संबंधित आहे.
तो खेळाडू कोण, याची अद्याप माहिती नाही. मात्र, त्याने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला (एसीयू) त्याची माहिती दिली. यासाठी आता बीसीसीअायच्या या पथकाने युद्धपातळीवर चाैकशीच्या कामाला सुरुवात केली अाहे.

दाेन दिवसांपूर्वीच यंदा लीगमध्ये सट्टेबाजीवर पूर्णपणे अंकुश ठेवल्याची प्रतिक्रिया बीसीसीअायच्या पथकाने दिली हाेती. मात्र, आता नव्याने हा प्रकार चर्चेत आला आहे.
‘एका आयपीएल खेळाडूला कोणत्या अनोळखी व्यक्तीने फिक्सिंगबाबतीत संपर्क साधला. आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतोय. त्याला थोडा वेळ लागेल.
’ एसीयूच्या मते, खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात असल्याने ऑनलाइन पद्धतीने खेळाडूंना मॅच फिक्सिंगची ऑफर मिळतेय. येथेही असेच काही घडले. नियमानुसार त्या खेळाडूबाबत कुणाला माहिती दिली जात नाही, अशी माहिती एसीयूचे प्रमुख अजित सिंग यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved