सचिनने गमावला ‘हा’ मित्र;ट्विटरद्वारे सचिनने वाहिली श्रद्धांजली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोना रोगाच्या साथीने जगात थैमान घातले आहे. कोणाचे नातेवाईक कोरोनाने गेले तर कोणाचे मित्र. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पण त्याचा जवळचा मित्र गमावला आहे.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांच्यासोबत खेळलेले विजय शिर्के यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच वय ५७ वर्ष होत. मंबई क्रिकेटकडून सचिन,विनोद कांबळी आणि विजय शिर्के खेळत असत.

ऑक्टोबर महिन्यात पण सचिनचा जवळचा मित्र अवी कदम यांचाही कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता विजय शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटचे भरून न निघण्याजोगे नुकसान झाले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १७ वर्षाखालील क्रिकेट समर कॅम्पचे विजय शिर्के दोन वर्ष प्रशिक्षक होते. “काही वर्षांपूर्वीच विजय शिर्के ठाण्याला राहायला गेले होते.

कोविड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. कोविडवरही त्यांनी मात केली होती. पण इतर व्याधी बळावल्यामुळे त्यांच निधन झालं”,असं शिर्के यांच्या एका मित्राने सांगितल. विजय शिर्के यांच्याबददल सचिनने ट्विटरवर भावनांना वाट करून दिली.

विजय शिर्के यांच्या निधनावर भारतीय संघाचे माजी गोलंदाज आणि सध्याचे निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनीही शोक व्यक्त केला आहे.सलील अंकोला यांनी त्यांच्या फेसबुकवरून शिर्के यांच्या आठवणी जागृत केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment