Tesla ची भारतात एन्ट्री आणि EV मार्केटमध्ये क्रांती ! ह्या कंपन्यांचे शेअर्स वाढणार ! पहा कोणाला होणार काय फायदा ?

Tesla च्या भारतात प्रवेशाने भारतीय EV मार्केटला गती मिळेल, तर भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांनाही फायदा होईल. भारत सरकारने Tesla साठी आयात शुल्क सवलतीसारखी पावले उचलली आहेत, जे कंपनीला भारतात आपला विस्तार करण्यासाठी अनुकूल ठरेल. भारतीय गुंतवणूकदारांसाठी हे एक मोठे संधीचं द्वार ठरू शकते.

Karuna Gaikwad
Published:

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेल्या Elon Musk यांची इलेक्ट्रिक कार कंपनी Tesla लवकरच भारतात प्रवेश करणार आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि यादरम्यान Elon Musk यांची भेट झाली. या भेटीनंतर, टेस्लाने भारतात नोकरी भरती सुरू केल्याची बातमी समोर आली आहे, यामुळे कंपनी भारतात आपली उपस्थिती वाढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होते.

भारतात प्लांट स्थापन करण्याची योजना

Tesla सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू येथे प्लांट उभारण्याची शक्यता तपासत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tesla भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनीने केवळ 13 पदांसाठी भरती सुरू केली आहे, परंतु भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

पूर्वीसारखी चूक होणार नाही

गेल्या वर्षी टेस्लाचा भारतात प्रवेश जवळपास निश्चित झाला होता, पण अखेरच्या क्षणी Elon Musk ने आपला भारत दौरा रद्द करून चीनला प्राधान्य दिले. मात्र, या वेळी Elon Musk ही चूक पुनरावृत्ती करणार नाहीत असे वाटते. भारतातील ईव्ही कारची वाढती मागणी लक्षात घेता, टेस्लासाठी भारत ही मोठी बाजारपेठ बनू शकते.

भारतातील ह्या कंपन्यांचा फायदा

टेस्लाच्या भारतात प्रवेशामुळे भारताच्या EV मार्केटला मोठा फायदा होणार आहे. यासोबतच, टेस्लाशी संबंधित असलेल्या भारतीय कंपन्यांनाही मोठा लाभ होऊ शकतो. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, हिंदाल्को इंडस्ट्रीज, सुप्राजित इंजिनिअरिंग, बॉश लिमिटेड आणि व्हॅरोक इंजिनिअरिंग या कंपन्या टेस्लाला ऑटो पार्ट्स पुरवतात. याशिवाय, गुडलक इंडिया, संधार टेक्नॉलॉजीज, SKF इंडिया आणि भारत फोर्ज देखील टेस्लाच्या इको-सिस्टीमचा भाग आहेत.

शेअर बाजारात सकारात्मक परिणाम

Tesla भारताकडून 1-2 अब्ज डॉलर चे ऑटो पार्ट्स खरेदी करते. सध्या Tesla च्या उत्पादनाचा मोठा भाग चीनमध्ये आहे, मात्र भारतात प्रवेश केल्यानंतर Tesla ची उत्पादन प्रणाली भारतात हलवण्याचा पर्याय निर्माण होऊ शकतो. भारतात Tesla ची उत्पादन आणि विक्री वाढल्यास, संबंधित भारतीय कंपन्यांचे व्यवसायही वाढतील आणि शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.

भारतातील गुंतवणुकीची तयारी

एलोन मस्क एप्रिल 2024 मध्ये भारत दौर्‍यावर येणार होते, आणि याच दरम्यान टेस्लाच्या भारतात प्रवेशाची घोषणा अपेक्षित होती. यामुळे व्हॅरोक इंजिनिअरिंग, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज यासारख्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले होते. यावेळीही अशीच अपेक्षा आहे की टेस्लाच्या भारतात प्रवेशाच्या बातम्यांमुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होईल.

Elon Musk चा विचार का बदलला?

पूर्वी भारताच्या बाजारपेठेत रस न दाखवणाऱ्या Elon Musk यांनी आता भारतात गुंतवणुकीसाठी पुढाकार का घेतला आहे? याचे मुख्य कारण म्हणजे Tesla ला चीनमध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. BYD सारख्या स्थानिक चिनी कंपन्यांनी मोठी प्रगती केली असून, Tesla च्या विक्रीत घट झाली आहे. जानेवारी 2024 मध्ये Tesla ने 63,238 इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 11.5% कमी होती. त्याच वेळी, BYD ने 296,446 युनिट्सची विक्री करून 47% वाढ नोंदवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe