२००० रुपयांच्या नोटेबद्दल सर्वात महत्वाची बातमी …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  २००० रुपयांच्या नोटेबाबत एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे.एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या नसून उच्च मूल्याच्या चलनाची मागणी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.

काळा पैसा आणि बनावट नोटांना रोखण्यासाठी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र, त्यानंतर मोदी सरकारने 500 रुपयांच्या नवीन नोटा छापल्या, तर 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्याच्या जागी 2 हजार रुपयांची नोट आणली गेली. याशिवाय 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपयांच्या नव्या नोटाही आणल्या होत्या.

हद्दपार करण्याच्या तयारीत :- केंद्र सरकार 2 हजारांच्यानोटा हद्दपार करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे. कारण मागच्या 2 वर्षात 2 हजारांच्या नोटा छापण्यात आलेल्या नाहीत.. स्वत:  अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही महत्त्वाची माहिती दिली.

नोटा छापण्याचे आदेश दिलेले नाहीत :- देशाच्या चलन प्रणालीमधून हळूहळू दोन हजार रुपयांच्या नोटा काढल्या जात आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून आरबीआयने दोन हजारांच्या नोटा छापण्याचे आदेश दिलेले नाहीत. याचाच परिणाम म्हणून, देशभरात पसरलेल्या एकूण नोटांमधील दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 3.27 टक्क्यांवरून 2.01 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियासोबत चर्चा करुन निर्णय :– नव्या नोटा 2 वर्ष छापल्या जात नसल्या तरी 2 हजारच्या आधी छापलेल्या नोटा अजूनही चलनात असल्याची माहितीही अर्थराज्य मंत्र्यांनी दिली आहे. 2 हजाराच्या नोटा छापण्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जातो असंही त्यांनी संसदेत सांगितलं.

नोटा व्यवहारातून कमी करण्याचा प्रयत्न :- अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. लेखी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 30 मार्च 2018 पर्यंत 2000 रुपयांच्या 336.2 कोटी नोटा प्रचलित असून 26 फेब्रुवारी 2021 रोजी तो 249.9 कोटींवर आला आहे.याआधी दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून कमी करण्याचा प्रयत्न कसा होत आहे हेही आरबीआयने सांगितले होते. 2016-17  मध्ये 2000 रुपयांच्या 354.3 कोटींच्या नोटा छापल्या गेल्या. 2017-18 मध्ये 11.5 कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात केवळ 4.67 कोटीच्या नोट छापल्या गेल्या.

नोटेची छपाई नसल्याने तुटवडा :- दोन वर्षांत 2 हजार रुपयांच्या नोटेची छपाई करण्यात आली नसल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. नोट छापली नसल्याने याचा तुटवडाही जाणवत आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणत्याही मूल्याच्या बँकेच्या नोटांच्या छपाईचा निर्णय जनतेच्या देवाण-घेवाणीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसार घेतला जातो. 2019-20 आणि 2020-21 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर दिलेली नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News