अहमदनगर ब्रेकिंग : काकाने पुतणीचा कुऱ्हाडीने वार करत केला निर्घृण खून

Published on -

Ahmadnagar breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. काकानेच आपल्या विवाहित पुतणीला कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करत ठार केले आहे. रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग काकाला आल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समजते.

ही घटना कोपरगाव शहरातील खडकी भागात बुधवारी रात्री घडली. सौ. नेहा संदीप कांबळे (वय २१, हल्ली रा.सप्तशृंगी मंदीराजवळ खडकी, कोपरगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. तर संतोष हरीभाऊ आरणे (वय २६, रा.खडकी कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे.

ह्याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तरुणीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री त्यांची मुलगी नेहा ही काही कामानिमित्त घराबाहेर एका मुलासोबत बोलत होती. आरोपी संतोष यानेनेहा ही बाहेरील मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन तिच्यावर संशय घेतला.

तसेच याचा त्याला राग आला. कुऱ्हाडीने तिच्यावर वार करून तिला ठार केले. दरम्यान मयत नेहा व तिचा काका संतोष यांत अनैतिक संबंध होते अशी माहिती पो. नि. प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe