दुर्दैवी घटना ! शोषखड्ड्यात पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील माहुली येथे शोषखड्ड्यात पडून साडे पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(unfortunate death )

दानवी उर्फ परी दर्शन मंचरे (वय ५.५ वर्षे, रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, माहुली येथील हॉटेल निलायमने सांडपाणी मुरवण्यासाठी पुढील बाजूस शोषखड्डा केला आहे.

दर्शन तात्यासाहेब मंचरे व त्यांची मुलगी परी उर्फ दानवी मंचरे (रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) हे रविंद्र बाबासाहेब लेंडे (रा.खंदरमाळवाडी ता. संगमनेर) यांच्याकडे कामानिमित्त आले होते ते घरी परतत असताना हॉटेल निलायम येथे थांबले होते.

हॉटेल निलायम लगतच्या हॉटेल समोर एका बसने अचानक पेट घेतल्याने दोघांचेही लक्ष त्या बसकडे गेले. त्याच दरम्यान परी खेळत खेळत समोरील कारंजाकडे गेली.

खेळत असताना परी अचानक कारंजालगत असलेल्या खड्ड्यात पडली. खड्ड्यातून परीला बाहेर काढत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत परीला मृत घोषीत केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News