पारनेरच्या नगराध्यक्षपदी विजय औटी यांची वर्णी लागणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर पंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय विजय सदाशिव औटी यांची पारनेरच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पारनेरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे समजल्यावर औटी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला.

नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवर विजय मिळवून नगर पंचायतीतील सर्वात मोठा पक्ष बनला होता.

त्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी तातडीने हालचाली करून तीन अपक्ष नगरसेवकांना गळाला लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व तीन अपक्ष नगरसेवक अशी दहा सदस्यांची गटनोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

गटनेतेपदी विजय औटी यांची तर उपगटनेतेपदी सुरेखा भालेकर यांची निवड करण्यात आली. त्यामुळे नगर पंचायतीत सत्ता स्थापन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला. औटी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe