Ahmednagar Breaking : नोकरीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक ! गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील जेऊर येथील अनेक महिलांना बनावट मसाला कंपनीचे नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ विधाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरामधील महिलांना बनावट मसाला कंपनीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेवासा तालुक्यातील रहिवासी असून त्याने गावातीलच एका महिलेच्या आधाराने सर्वसामान्य महिलांना फसविले आहे.

अमिष दाखवून महिलांची फसवणूक

महिलांकडून ७० रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळण्यात आली आहे. लॅपटॉप, कंपनीत नोकरी, जागा भाडेतत्त्वावर घेणे, दुचाकी गाडी, दिल्ली सहल तसेच विविध अमिष दाखवून महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय देखील विधाते यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

अनेक महिलांची फसवणूक

गोरगरीब महिलांनी मजुरी करून सदर आमिषाला बळी पडत पैसे भरलेले आहेत. अनेक महिलांची फसवणूक झाली असली तरी सर्वच महिला समोर येत नाहीत. काही महिलांच्या रक्तांची तपासणी देखील करण्यात आली आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची निपक्षपाती सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शामभाऊ विधाते यांनी केली आहे

दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे

या प्रकरणात गोरगरीब महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. त्याची निपक्षपाती चौकशी होऊन गुन्हे दाखल होण्याची गरज आहे. या प्रकरणात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आरोपींना पाठीशी घालू नये. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. – श्यामभाऊ विधाते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe