Ahmednagar Breaking : तू गावातील मुलींना फसवतो, पैसे घेवुन त्यांना विकतो. असे म्हणून १२ ते १३ तरूणांच्या गटाकडून दोन तरूणांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने व लाथा बुक्क्याने जबरदस्त मारहाण करण्यात आली. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २६ जुलै रोजी झालेल्या या मारहाणीत एक तरूण किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आवेद निसार शेख, वय २० वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी. हा तरूण दि. २६ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता उंबरे येथील मस्जिद मध्ये जात होता. मस्जिदपासून काही अंतरावर असताना १२ ते १३ तरूणांच्या एका गटाने आवेद शेख याला रस्त्यावर थांबवून तू गावातील मुलींना फसवतो, पैसे घेवून त्यांना विकतो. असे म्हणून त्याला तरूणांच्या गटाने शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली.
तसेच त्याचा मोबाईल घेवून त्याला जवळच असलेल्या तालमीत नेले. नंतर मस्जिद मध्ये नेले. आणि खो-याच्या दांड्याने व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी आवेद याचा मित्र सोहेब हुसेन शेख याला देखील मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत सोहेब हुसेन शेख हा किरकोळ जखमी झाला तर आवेद निसार शेख हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी सौरभ संजय दुसिंग, अतुल जालींदर ढोकणे, गौरव चांगदेव ढोकणे, अभिजित बाळासाहेब हुडे, बबलु दत्तात्रय गायकवाड, नितिन ढोकणे, विशाल ढोकणे, अक्षय ढोकणे, हर्षल ढोकणे व इतर ३ ते ४ तरूण सर्व रा. उंबरे, ता. राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.