अहिल्यानगर शहरातील ‘या’ भागामध्ये अनधिकृत गॅस रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर पोलिसांनी टाकला छापा, मुद्देमाल जप्त करत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा घालून २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एकास ताब्यात घेतले. ही कारवाई सावेडी परिसरातील वैदुवाडी येथे १० जुलै रोजी दुपारी केली. तोफखाना पोलिसांनी छापा टाकून वैदुवाडी येथील गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून संकेत दत्ता शिंदे (वय २१, रा. वैदुवाडी) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून एक … Read more

अहिल्यानगरमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल २८ लाखांची फसवणूक, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर – जादा परताव्याचे आमिष दाखवून ‘इनफिनाईट सर्व्हिसेस प्रा. लि.’ आणि ‘मास्टर सिनर्जी एड्युटेक एलएलपी’ या कथित फायनान्स कंपन्यांनी एकाची २८ लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सीईओ अगस्ती मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा, माकेटिंग डायरेक्टर नवनाथ आवताडे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील २९१ कोटींचा घोटाळा झालेल्या ‘या’ बहुचर्चित बँकेची इडी’कडून चौकशी सुरू, ठेवीदारांना दिलासा

अहिल्यानगर- जिल्ह्यातील बहुचर्चित अर्बन बँकेत २९१ कोटींचा घोटाळा झाला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यात संचालक, कर्जदार आरोपी असून, आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली होती. आता थेट ‘इडी’ने बँकेची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, २९१ कोटींच्या घोटाळ्याची ‘इडी’कडून चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली. नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक … Read more

अहिल्यानगरमध्ये सावकारीचा परवाना रद्द असतांनाही सावकारकी करणं एकाला भोवलं, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील बालिकाश्रम रस्त्यावरील ताठे मळा परिसरातील एका व्यक्तीचा सावकारकीचा परवाना रद्द झालेला असताना तो सावकारकी करताना आढळून आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन आदिनाथ ताठे (रा. ताठे मळा, बालिकाश्रम रोड सावेडी) असे त्या परवाना रद्द झालेल्या सावकाराचे नाव आहे. याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक विशाल पांडुरंग आळकुटे … Read more

नगर-मनमाड रस्त्यांसाठी खासदार निलेश लंके यांचं उपोषण सुरू, काम सुरू झाल्याशिवाय माघार न घेण्याचा दिला इशारा

अहिल्यानगर- विळद बायपास ते सावळी विहीर या 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात व्हावी, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी 11 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामामुळे जनतेच्या संयमाचा अंत झाला असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी … Read more

राहुरी तालुक्यातील तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा, तिघांना घेतले ताब्यात

राहुरी- अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक ९ जुलै रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी, कुक्कडवेढे रस्ता आणि उंबरे शिवारातील तीन ठिकाणी छापेमारी करत १७ हजार रुपयांच्या आसपासची देशी-विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वांबोरी शिवारातील हॉटेल … Read more

नेवासा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरावरील ऊस जळून खाक, आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान

नेवासा- शॉर्टसर्किटमुळे नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील जनार्धन कुंडलिक शेटे यांच्या सोनई शिवारातील शेतातील ऊस पीक नुकतेच जळून खाक झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडी येथील शेतकरी जनार्धन शेटे यांचे सोनई शिवारात गट नंबर ६६० मध्ये १ हेक्टर २० आर क्षेत्रात ३६५ जातीची आडसाली ऊस लागवड आहे. शनिवारी सकाळी १० वाजता शेतातील विजेच्या तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्कीटने) … Read more

राहुरी तालुक्यात मोटारसायकलवरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले, दोघांवर गुन्हा दाखल

राहुरी- राहुरी शहरात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत दोन जणांना ताब्यात घेतले असून, जवळपास ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक १० जुलै २०२५ रोजी सकाळच्या सुमारास राहुरी शहरातून अवैधरित्या दारूची … Read more

कर्जत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सन्मान

राशीन- कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल कारभारी जगताप हे सन १९७५ ते १९७७ दरम्यान देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडरपणे उभे राहिले. तसेच हुकूमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून, कारावास स्वीकारून स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला. या योगदानाबद्दल त्यांचा गौरवपूर्ण सन्मानपत्र देऊन महाराष्ट्र … Read more

सततच्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा परिसरातील भात पिकांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

भंडारदरा- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, या परिसरात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राजूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे यांनी केली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ३१ दिवसांपासून अव्याहतपणे कोसळत असलेल्या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. … Read more

ग्रोे मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीने लोकांना घातला ३५० कोटींचा गंडा, कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची मा.खा डॉ. सुजय विखेंची माहिती

शिर्डी- ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शिर्डी परिसरातून जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एजंटगिरी व सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत, अशी माहित माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. ग्रो मोअर प्रकरणी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, … Read more

श्रीगोंदा आगाराची कर्जत-बेलवंडी एसटी बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल, बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी

कर्जत : श्रीगोंदा आगाराची कर्जत – बेलवंडी एसटी बस बंद केल्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे तर काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे तर काहींनी शिक्षण सोडले आहे. त्यामुळे बंद केलेली एसटी सुरु करावी, अशी मागणी काल वाहतूक नियंत्रक कर्जत यांच्याकडे केली आहे. श्रीगोंदा आगाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून कर्जत – … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या कोतवाल भरतीत दिव्यांगांना आरक्षण जाहीर करण्याची मागणी, तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बालमटाकळी- अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच सर्व तालुक्यांत महसूल विभागामार्फत कोतवाल (महसूल सहाय्यक) या पदासाठी शासनामार्फत भरती होणार असून, यामध्ये पद भरतीचे आरक्षण जाहीर करताना दिव्यांगांना डावलण्यात आले असून, सदर बाब दिव्यांगावर अन्याय करणारी तसेच दिव्यांगांना रोजगारपासून वंचित ठेवणारी गंभीर आहे, त्यामुळे कोतवाल पदभरतीत शुद्धीपत्रक काढून दिव्यांगांना आरक्षण जाहीर करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन सावली दिव्यांग संघटनेचे … Read more

आमदार रोहित पवारांची कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता संपुष्टात, उपसभापती कैलास वराट यांच्याविरोधातील अविश्वास ठराव १२ विरुद्ध ० मतांनी मंजूर

जामखेड- येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींनी स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणे बदलली आहेत. उपसभापती कैलास वराट यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १२ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला असून, त्यामुळे वराट यांचा उपसभापती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. वराट हे आमदार रोहित पवार यांच्या गटाशी संबंधित असल्याने, या अविश्वास ठरावाच्या … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास न्यायालयाने दिली स्थगिती, रहिवाश्यांना दिलासा

ढोरजळगाव- लोणी व्यंकनाथ येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती मिळाल्याने तेथील रहिवाश्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथील अनुसूचित जमातीच्या रहिवाशांना ग्रामपंचायतीने त्यांचे गट क्रमांक १६२ मधील गायरान जमिनीवरील राहते घरे हे अतिक्रमणित असल्याचे सांगत त्यांना सदरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथतर्फे ग्रामपंचायत अधिकारी यांनी … Read more

आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा, मौज मजा करण्यासाठी शाळा-कॉलेजला जाऊ नका, पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

करंजी- आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि मार्ग दाखवणारे पहिले गुरू म्हणजे आई-वडील, त्यामुळे गुरुपौर्णिमेला आई वडिलांचे पूजन महत्त्वाचे असून, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आई वडिलांबरोबरच शाळा, शिक्षक आणि पुस्तकावर प्रेम करा. शिक्षण घेताना आई-वडिलांकडे क्षणभर बघत जा. मौज मजा करण्यासाठी शाळा-कॉलेजला जाऊ नका तर आई-वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी उच्च … Read more

अहिल्यानगरमधील तरूणांचा गाजियाबाद येथे झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप

अकोले- नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या रघुनाथ सोनवणे यांचे सुपुत्र आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी बी. आर. सोनवणे यांचे पुतणे, रुपेश रघुनाथ सोनवणे (वय २३ वर्षे) यांचा ५ जुलै २०२५ रोजी गाजियाबाद येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. रूपेश यांचे जन्मगाव खरशिंदे (अहिल्यानगर) आहे. त्यांच्या या … Read more

राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारा अन् पुल दुरूस्तीचे काम ललकरच लागणार मार्गी, काम जलसंपदा विभागकडे वर्ग

वळण- राहुरी तालुक्यातील मानोरी येथील मुळा नदीवरील बंधारा आणि लगतचा पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, आता या कामाचा प्रशासकीय तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळा पाटबंधारे विभागाकडून या कामाची जबाबदारी जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आली असून, यामुळे पूर्वीचे सर्व प्रस्ताव आपोआपच रद्द झाले आहेत. बंधाऱ्याचा समावेश आता उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये म्हणजे बॅरेज प्रकारात करण्यात आला … Read more