अहिल्यानगरमधील भोरवाडीमध्ये यात्रेनिमित्त हजारो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थित रंगला शर्यतीचा थरार

वाळकी- नगर तालुक्यातील भोरवाडी येथे बुधवार (दि. ९) रोजी नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यती पार पडल्या. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेला हा चित्तथरारक शर्यतींचा थरार तब्बल १० तास रंगला. या शर्यतीसाठी गाडा मालकांनी सुमारे एक हजार बैल आणि २०० घोडे आणले होते. दिवसभरात जिल्ह्यातील हजारो बैलगाडा शौकिनांनी शर्यतीत रंगणारा थरार पाहण्यासाठी भोरवाडी येथे गर्दी केली … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी

पाथर्डी- श्रीक्षेत्र भगवानगड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. वारकरी संप्रदयात एक आध्यात्मिक केंद्र म्हणून भगवानगडाची ओळख असून, ही ख्याती वाढत चालली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचे दर्शन व पूजन करण्यासाठी हजारो भगवान भक्त गडावर दाखल झाले होते. भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी व शिष्यगणांनी भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे … Read more

कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश

टाकळी ढोकेश्वर- कुकडी डाव्या कालव्यातून सिंचन सुविधा मिळत असली तरी कालव्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वस्तीवरून शेतामध्ये जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने पिंपळनेर, म्हसे, जवळा, नारायणगव्हाण, वडगाव गुंड, निघोज, अळकुटी या परिसरातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होती. या प्रश्नाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य … Read more

अहिल्यानगरमध्ये पैश्यांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला लावली पिस्तुल तर बायकोचाही केला विनयभंग, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर- शहरातील एका सराफ व्यापाऱ्याने केडगाव येथील एक महिलेकडून व्याजाने २६ लाख घेतले. व्याजापोटी ४९ लाख रुपये वेळोवेळी दिले. तरीही ती महिला अन्य काही लोकांनी ७जुलै रोजी पैशासाठी व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला पिस्तुल लावला. तसेच, त्याच्या पत्नीला ओढत घराच्या दरवाजापर्यंत आणून विनयभंग केला. ही घटना सराफ बाजार व स्वास्तिक चौकातील सराफ व्यापाऱ्याच्या घरी घडली. याप्रकरणी त्या … Read more

अहिल्यानगरमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार २७ जुलै रोजी अनावरण

अहिल्यानगर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे दि.२७ जुलै रोजी पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय गुरूवारी दि.१० शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेतला. अनेक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली. ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सशोभीकरण करण्यात आले व डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा … Read more

कोपरगावमध्ये सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या मकोका आरोपींना छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने केला जामीन मंजूर

अहिल्यानगर- जिल्हातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावात असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स दरोड्यातील मकोका आरोपींना औरंगाबाद हायकोर्टात जामीन मंजूर झाला आहे. जिल्हातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावात, फिर्यादी अक्षय संजय थोरात याच्या काकाचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाने सोने चांदीचे दुकान आहे. दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी, संध्याकाळी ७.४५ वाजता पाच अनोळखी इसम दुकानात घुसले त्यापैकी एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात … Read more

ढोल-ताशा पथक ही आपली संस्कृती आहे, अहिल्यानगरमधील वाद्यपथकाच्या सराव प्रारंभप्रसंगी आमदार संग्राम जगतापांचे प्रतिपादन

अहिल्यानगर- गणेशोत्सवासाठी ढोल पथके सज्ज होत आहे. त्यासाठी शहरात प्रथम आज हिंदवी शौर्य वाद्यपथकचा सरावास प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ढोल पूजन करून करण्यात आला. यावेळी श्रीढोलपथक पुणे, संस्थापक, अध्यक्ष व हिंदवी शौर्य वाद्यपथक प्रमुख सुनील करांदे यांच्यासह सर्व वादक व त्यांचे मित्र परिवार व नागरिक उपस्थित होते. नंतर ढोल पथक सराव प्रारंभ करण्यात … Read more

शिष्यवृत्ती परिक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ विद्यार्थी झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत, जि.प शाळेच्या ४ विद्यार्थ्यांचा समावेश

अहिल्यानगर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील १८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. जिल्हा परिषद शाळांतील ४ विद्यार्थ्यांचा, तर खासगी शाळांतील १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक … Read more

विमान तिकीट एजन्सीच्या नावाखाली आहिल्यानगरच्या तरूणीची केली तब्बल ३० लाखांची फसवणूक, पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर- विमान व हॉटेल तिकीट बुकिंग एजन्सी देण्याच्या नावाखाली कमिशनचे आमिष दाखवून तरुणीची ३० लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राहुल दर्शन जगताप, पत्नी एंजेल राहुल जगताप (दोघेही रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत आंचल पवनकुमार अग्रवाल (वय २४, रा. तांबटकर मळा, गुलमोहर रस्ता, … Read more

AMC News : अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणावर महानगरपालिकेकडून कारवाई, ओढे, नाल्यांच्या जवळील संरक्षक भिंतींवर चालवला हातोडा

AMC

AMC News : अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर परिसरात ओढे आणि नाल्यांच्या लगत बांधलेल्या अनधिकृत संरक्षक भिंतींवर महानगरपालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी दिवसभरात चार अशा अतिक्रमणांचा नाश करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिका ओढे आणि नाल्यांची साफसफाई करत असून, या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील ओढे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांचा शहरात वावर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून जेरबंद केले. वसीम कादीर कुरेशी (वय २८, रा हमालपाडा आंबेडकर चौक झेंडी गेट, ता. जि. अहिल्यानगर, हल्ली रा. नागापूर ता.जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, जिल्ह्यातून हद्दपार असलेला … Read more

एसपी सोमनाथ घार्गे यांच्या पथकाची अहिल्यानगर शहरात धडाकेबाज कारवाई, छापा टाकत मावा बनवणारे कारखाने केले उद्धवस्त

Ahilyanagar News : अहिल्यानगर- पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नीलक्रांती चौक, माणकर गल्ली येथे मावा बनविणारे कारखाने उद्ध्वस्त केले. पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पथकाचे प्रमुख उपअधीक्षक संतोष खाडे … Read more

गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीत लाखोंचा जनसागर ! ५९ लाखांचं सोनं साईबाबांच्या चरणी, कोण आहे हा अज्ञात कोट्यधीश ?

Shirdi News : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी देशभरातून आलेल्या लाखो साईभक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. राज्यभरातून आलेल्या पालख्यांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमली. काल अखंड श्री साईसच्चरित पारायणाची समाप्ती झाली. या मिरवणुकीत संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी … Read more

अहिल्यानगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडे सापडले ४ पिस्तुल, ३४ जिवंत काडतुसे,८ लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

Ahilyanagar News : उमारठी (मध्यप्रदेश) येथून दोघांनी चार पिस्तूल आणले. त्याची कुणकुण कोतवाली पोलिस ठाण्यात लागताच सापळ्यात अडकले. स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरून कोतवाली पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना मोटारीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार पिस्तूल, ३४ जिवंत काडतुस, ३ मोबाईल फोन असा ८ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे … Read more

संंगमनेर शहरातील भूमिगत गटारीत गुदमरून दोन तरूणांचा दुर्देवी मृत्यू, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल होणार

Sangamner News : संगमनेर शहरातील नियोजित एसटीपी प्लांटसाठी सुरू असलेल्या भूमिगत गटारीमध्ये गुदमरल्याने दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (१० जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरातील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलसमोर घडली. अतुल रतन पवार यांचा गुदमरून तर व रियाज पिंजारी (वय ३०, रा. मदिनानगर, संगमनेर) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Ahilyanagar News : चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ४३० खाटांचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाले. पण शासकीय महाविद्यालय शहराच्या मुख्यालयात न होता अन्य होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे शासकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान भवनात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. … Read more

515 कोटींचा रस्ता मंजूर ! अहील्यानगर जिल्ह्यातील ह्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होणार…

शेवगाव बाह्यवळण रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली करण्याचे, तसेच कुंभमेळाच्या पुर्वी अहील्यानगर ते सावळीविहीर रस्ताच्या काम पूर्ण करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साविळीविहीर ते अहील्यानगर मार्गाचे काम निर्धारीत वेळेत पुर्ण करा.मार्गाचे महत्व लक्षात घेवून कामामध्ये … Read more

खा. नीलेश लंकें यांचे शुक्रवारपासून उपोषण सावळीविहीर-नगर बायपास रस्ता कामास विलंबाचे निमित्त

  नगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एनएच १६० या महामार्गाच्या रूंदकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सुर उमटत असून या नाराजीची दखल घेत खासदार नीलेश लंके हे या कामास सुरुवात करावी या मागणीसाठी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार आहेत. सावळी विहीर किमी ८८.४०० ते अहमदनगर बायपास किमी १६३.४०० या … Read more