अहिल्यानगर जिल्ह्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट, रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी

जेऊर- अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंच्या उपद्रवामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोड रोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे पालक वर्गामध्ये चिंता निर्माण झाली असून रोडरोमीओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरीक, विद्यार्थिनी तसेच पालक वर्गामधून होत आहे. जेऊर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पंचक्रोशीतील विविध गावांमधून विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. इमामपूर, धनगरवाडी, ससेवाडी, डोंगरगण, … Read more

श्रीगोंदा पोलिसांचा साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटख्यावर छापा, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोघांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा- तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटख्यावर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत ६६ हजार ६९४ रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी तेथून धूम ठोकली. सोमवारी दि.७ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारवाई करत करण भरत काळे (रा. सोनलकरवस्ती गव्हाणेवाडी), अनिकेत सोनवणे (पुर्ण नाव माहित नाही. … Read more

अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेने तीन महिन्यांपासून कचरा न उचलल्यामुळे घनकचरा कर माफ करावा, माजी नगरसेवक निखील वारे यांची मागणी

अहिल्यानगर- शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कचरा संकलनाचे नियोजन ढासळले आहे. कुठे आठवडाभर कचरा उचलला जात नाही, तर कुठे नागरिकांना दुर्गंधी, रोगराई आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या तीन महिन्यांपासूनचा कचरा उचलावा अन्यथा घनकचरा कर माफ करावा, अशी मागणी माजी नगरसेवक निखील वारे यांनी सहायक आयुक्त सपना वसावा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात … Read more

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोलगेट हटवले, मात्र सदर ठिकाणच्या माती आणि मुरूमामुळे अपघाताचे प्रमाण वाढले, नागरिक संतप्त

जेऊर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर शिवारातील टोलगेट तब्बल आठ वर्षानंतर हटविण्यात आले आहे. टोलगेट हटविल्यानंतर सदर ठिकाणी असलेली माती मुरूम आहे त्याच अवस्थेत असल्याने रस्त्यावर चिखल साचत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात वाढले असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारामध्ये टोलनाका सुरू होता. टोल नाक्याची मुदत संपल्यानंतर देखील अनेक वर्ष … Read more

संगमनेर तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत बनवलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा, हातानेच उखडतोय खडी-डांबराचा थर

तळेगाव दिघे- प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला संगमनेर तालुक्यातील सोनोशी, चिंचोली गुरव मार्गे असलेला मालदाड रोड (संगमनेर) ते निहऱ्हाळे डांबरी रस्ता काम पूर्ण होण्यापूर्वीच ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे सदरच्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या संदर्भात दिलेल्या पत्रकात … Read more

सरकारने मद्याची दरवाढ कमी करावी तसेच करवाढही मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा

श्रीरामपूर- राज्यातील हॉटेल, परमिट रूम व वाईन शॉप व्यवसायिकांसाठी एकच कर प्रणाली असावी. तसे न करता राज्य सरकारने परमिट रूमवर अधिक भार टाकला आहे. तसेच १० टक्के अतिरिक्त वॅट लागू केला आहे. सदरची अन्यायकारक करवाढ मागे घ्यावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम चालक व मालक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असे श्रीरामपूर तालुका परमिट … Read more

उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून युवकाला शिवीगाळ करत चाकूने हल्ला, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी- उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून युवकावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना ५ जुलै रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा परिसरात घडली. या प्रकरणी अक्षय विजय तनपुरे याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अंकित सुरेश धसाळ, वय २७, हे राहुरी … Read more

भाऊ मानते असं सांगितल्यानंतरही आरोपी विवाहितेच्या घरात घुसला, मारहाण करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला

राहुरी शहर- राहुरी तालुक्यातील एका २३ वर्षीय विवाहित तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना ३० जून २०२५ रोजी रात्री घडली. तसेच या प्रकरणात आरोपीने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पीडित तरुणी … Read more

श्रीरामपुरमध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स प्रकरणावरून आमदार हेमंत ओगले अधिवेशात आक्रमक, सखोल चौकशीची केली मागणी

श्रीरामपूर- राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीवर बोलताना आमदार हेमंत ओगले यांनी आक्रमक भूमिका घेत मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांना काल मंगळवारी वाचा फोडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स बाबत सखोल चौकशीची मागणी केली. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स बरोबर नशेचे इंजेक्शन वाईटनर यांसारख्या अमली पदार्थांची सर्रास विक्री चालू असून मोठ्या … Read more

जामखेड पोलिसांचा वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना दणका, अट्टल गुन्हेगारांचा बिमोड करण्याचाही दिला इशारा

जामखेड- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावणारे तसेच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवण्याऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार अमोल … Read more

पालकांनी शाळेतील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे मुख्याध्यापिकेने दिला विद्यार्थ्यांना मानसिक त्रास, पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन

श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पी. एम.श्री. व शालेय पोषण आहारात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत कारवाईची मागणी केल्याच्या रागातून शाळेत शिकत असलेल्या दोन लहान मुलींना परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून त्यांना मानसिक त्रास दिल्यामुळे पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी. यासाठी पालकांकडून पाल्यासह पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित … Read more

बनावट कागदपत्रे तयार करून अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांची लाटली शिष्यवृत्ती, दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल

वाळकी- केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सात विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा नगर तालुक्यातील एका नामांकित संस्थेत प्रवेश दाखवून शासनाची ३८ हजार ९०० रुपयांची शिष्यवृत्ती दोघांनी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील योजना … Read more

नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याच्या तपासाची गती वाढवावी, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा अखेर संपली असून प्रशासक गणेश गायकवड यांनी यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या ५० टक्के रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी डीआयसीजीसी व रिझर्व्ह बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळताच ठेवी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवेसनेत प्रवेश, एकनाथ शिंदे लवकरच करणार जिल्हा दौरा

अहिल्यानगर- शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका पंचायत समिती माजी सभापती नंदा शेंडगे, मनपाचे माजी नगरसेवक दशरथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षातील दीडशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहेत. या मेळाव्यातही इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, … Read more

अहिल्यानगरमधील डाॅ. विखे पाटील अभियांत्रिकीच्या २० विद्यार्थ्याना मिळाली मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी

अहिल्यानगर- ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग विभागाने यशाची नवी शिखरे गाठली आहेत. संस्थेच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून अलीकडेच घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतींमध्ये एकूण २० विद्यार्थ्यांची नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. चतुर्थ वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण २८ कंपन्यांच्या वतीने प्लेसमेंट मुलाखती घेण्यात आल्या. … Read more

संगमनेर तालुक्यातील कत्तलखाने करण्यात आले बंद, ‘जमीयत उलेमा ए हिंद’ संघटनेच्या आवाहनानंतर चालकांचा निर्णय

संगमनेर- जमीयत उलेमा ए हिंद,या संघटनेच्या आवाहनानुसार संगमनेर शहरातील कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील कत्तलखाना चालकांनी घेतला आहे. त्यानुसार काल मंगळवार (दि. ८) पासून शहरातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ही संघटना करते. राज्यातील कत्तलखाना चालकांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असल्याने कत्तलखाने बंद करावे, असे आवाहन … Read more

श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षकपदी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती

राहुरी- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर या उपविभागांमध्ये अनेक वर्षे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी बजावलेले सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात त्यांचे विशेष कौशल्य असल्यामुळे त्यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख मिळाली आहे. त्यांनी यापूर्वीही श्रीरामपूर परिसरात अनेक मोठे … Read more

राहुरी तालुक्यात एकाच रात्री चोरट्यांनी फोडले चार घरे, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने केले लंपास, नागरिकांमध्ये भीती

राहाता- तालुक्यातील खडकेवाके गावात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या केल्या. यामध्ये वाल्मिक अर्जुन लावरे यांच्या घरातून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. उर्वरित तीन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नसले, तरी त्यांनी उचकापाचक केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की चोरट्यांनी वाल्मिक … Read more