समृद्धी महामार्गावर वेषातंर करून संतोष खाडे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई, ७७ लाख ८० हजाराचा गुटखा केला जप्त

कोपरगाव- येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिर्डी एक्सचेंज येथे राखाडी रंगाच्या आयशरमधून सुमारे ६४ लाख ८० हजार रुपयांचा प्रतिबंधीत सुंगधी तंबाखुचा गुटखा पकडला. यावेळी पोलिसांनी १२ लाखाच्या आयशर टेम्पोसह ७७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आयशर चालकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कोपरगाव … Read more

शाळेच्या पोषण आहारात अपहार करणं मुख्याध्यापिकेला भोवलं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्राराची दखल घेत निलबंनाची केली कारवाई

श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम. वसुंधरा मधुकर जगताप यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मंगळवारी दि.८ जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढला. पी.एम.श्री योजना तसेच शालेय पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून तसेच भ्रष्टाचाराची पोलखोल केली म्हणून तक्रारदार पालकांच्या मुलीना अपमानित … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या खुल्या जागा अन् गाळे भाडे वसुलीसाठी १० पथकांची नियुक्ती, २५ कोटींची थकबाकी वसूल करणार

अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या मालकीच्या व सध्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या खुल्या जागा, व्यापारी संकुलातील गाळे, ओटे, शाळा खोल्या, मंगल कार्यालयांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला आहे. १०१६ मालमत्तांपैकी ६८२ गाळे, जागांचे करारनाम्यांची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच, बहुतांश भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे ही रक्कम सुमारे २५ कोटी पेक्षा अधिक आहे. या थकबाकी वसुलीसाठी उपायुक्त, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात २४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी घेतला अकरावीला प्रवेश, विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल तर कला अन् वाणिज्य शाखेकडे फिरवली पाठ

अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीला १ जुलैपासून सुरुवात झाली असून ७ जुलैपर्यंत विविध कनिष्ठ महाविद्यालयात २४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी विविध शाखांत प्रवेश घेतले. यामध्ये कला, वाणिज्य शाखेपेक्षा तीनपट १५ हजार ६६० विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पहिली पसंती दिली. त्याखालोखाल ५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी कला शाखेत, तर ३२२३ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतले आहेत. एकूण … Read more

शेवगाव तालुक्यात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ, वृद्ध दाम्पत्याला मारहाण तर घरासह दुकान फोडत ४ लाखांचा ऐवज केला लंपास

बालमटाकळी- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे मंगळवारी मध्यरात्री १० ते १२ चोरट्यांनी गावच्या मध्यवस्तीत धुमाकूळ घालत वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. या वेळी चोरट्यांनी एका घरातून ४ ते ५ तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने व एक दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण ४ लाख रुपयांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी गावातील हिरालाल धोंडलकर (वय ७५) यांच्या घरात … Read more

भंडारधरा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचा पर्यटकांचा उतावळेपणा

भंडारदरा – तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात सध्या पावसाळ्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे; मात्र निसर्ग सौंदर्य अनुभवताना अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकत नसल्याचे चित्र आहे. या उतावळेपणामुळे अपघातांची शक्यता निर्माण होत आहे. धरणाच्या सांडव्यामधून प्रवरा नदीत सोडण्यात आलेल्या विसर्गाचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर सांडव्याभोवती जमू लागले आहेत. सांडव्यामधून कोसळणाऱ्या पाण्याचा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात टायर चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सहाजणांना अटक करत ३ लाख ६० हजारांचा माल ताब्यात

अहिल्यानगर- एमआयडीसी पोलिसांनी वांबोरी घाटातील अपघातग्रस्त मालट्रकचे टायर व अन्य साहित्य चोरीच्या गुन्ह्यात वांबोरी येथून सहा जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ओंकार ज्ञानदेव पवार (वय २५), शुभम जनार्धन जाधव (वय २१), मयुरेश शाम मोरे (वय २२), सचिन महादेव शेळके (वय २५), फिरोज अनिस शेख (वय ३१), दीपक सुभाष शिंदे … Read more

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात ड्युटीला असणारा पोलिस अंमलदार दोन दिवसांपासून बेपत्ता, तोफखाना पोलिसांत घटनेची नोंद

अहिल्यानगर- पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत. जयराम बाजीराव काळे (वय ३४ रा. कजबे वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी आश्विनी जयराम काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अंमलदार जयराम काळे हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहेत. ते … Read more

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, धडकेत एका तरूणाचा जागीच मृत्यू, सुपा पोलिसांत गुन्हा दाखल

पारनेर- अहिल्यानगर -पुणे महामार्गावरून, पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या एमजी ग्लोस्टर या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पळवे खुर्द येथील नितीन शेळके (वय ३४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने नगरकडे निघालेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने दुचाकीवरून पळव्याकडे निघालेल्या नितीन शेळके यांना चिरडून तो नितीन यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने त्याच्याविरोधात … Read more

Ahilyanagar Breaking : आ. सुरेश धस यांच्या मुलावर अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल, कारणही धक्कादायक

आष्टी (जि. बीड) येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत हॉटेल व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यात घडली. आ.धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा कार चालवत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश

पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला असून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्याखासदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांचे ते मोठे यश मानले जात आहे. या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर … Read more

प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केली लाकडी दांडक्याने मारहाण, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी- प्रेमात अडथळा होत असलेल्या पतीला पत्नी व तीच्या प्रियकराने शिवीगाळ करून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना दि. २ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात घडली. या घटनेतील पती-पत्नी राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात राहतात. पत्नीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याबाबत पतीला संशय आहे. दि. २ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पती-पत्नी … Read more

नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक मदत लागल्यास तातडीने संपर्क करण्याचे डाॅ. जयश्री थोरात यांचे आवाहन

संगमनेर- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून ६ हजार ५७० क्यूसेस पाणी सोडण्यात आले असून आगामी काळात पावसाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन युवा काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. … Read more

कचरा डेपोमुळे संगमनेरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तातडीने उपायोजना करण्याची आमदार खताळांची विधानसभेत मागणी

संगमनेर- संगमनेर खुर्द परिसरातील कचरा डेपोला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. वाढते वायु प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी नगरविकास खात्या मार्फत काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केली?, असा सवाल करत या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार येऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत … Read more

नेवासा तालुक्यात जुन्या वादातून टोळक्याची तरूणाला बेदम मारहाण, हवेत गोळीबार करत जीवे ठार मारण्याची धमकी

नेवासा- तालुक्यातील चिलेखनवाडी येथे जुन्या वादातून एका तरुणास मारहाण करत हवेत गोळीबार करण्यात आला. ही घटना शनिवारी ५ जुलैच्या रात्री घडली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देत याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात आकाश मच्छिंद्र सावंत, अवी सावंत, योगेश सावंत (सर्व रा. चिलेखनवाडी) तसेच ऋतीक देशमुख, महेश कर्डिले, निलेश कर्डिले, शुभम गर्जे व इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, ५ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चिलेखनवाडी गावात बीटु दळवी याच्या दुकानाजवळ झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एरिगेशन कॉलनी चिलेखनवाडी येथे आकाश सावंत, शुभम गर्जे (रा. वडुले, ता. नेवासा), अवि सावंत (रा. देवसडे, ता. नेवासा), योगेश सावंत (रा. चिलेखनवाडी ता.नेवासा), ऋतीक देशमुख (रा. अंतरवाली, ता नेवासा), महेश कर्डिले, निलेश कर्डिले पत्ता माहीत नाही व इतर १० ते १५ अनोळखी इसमांनी माझा मुलगा कुणाल पवार यास लाकडी काठीने व रॉडने मारहाण करून दुखापत केली.

यावेळी मी भांडण सोडण्यासाठी गेले असता मला आकाश सावंत, शुभम गर्जे व अवि सावंत यांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली. या भांडणात माझी साडी व ब्लाउज फाटला आहे. तसेच सचिन दिलीप पवार याची आकाश सावंत याने गचांडी पकडली व शुभम गर्जे याने लाकडी काठीने त्याच्या हातावर व बरगडीवर मारहाण केली आहे.

त्यावेळी आम्ही आरडाओरडा केल्याने आकाश सावंत, शुभम गर्जे व ऋतीक देशमुख यांनी हातात कट्टे घेऊन हवेत गोळीबार केला, तसेच वरील इसमांनी जाताना तुम्हाला ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. आम्ही सोबत आणलेल्या मोटारसायकलींचे नुकसान केले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भंडारदरा येथील रंधा धबधब्याच्या पाण्यात उडी घेत तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी, कृती टाळण्याचे पोलिसांकडून आवाहन

भंडारदरा- अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील रंधा धबधब्यावर रविवारी संध्याकाळी सहा वाजता एका अज्ञात तरुणाने जोरदार वाहणाऱ्या प्रवाहात उडी घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अत्यंत धोकादायक आणि जीवावर बेतू शकणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासन आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशनकडून पर्यटकांना अशा प्रकारच्या कृती टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट … Read more

वांबोरी चारी टप्पा एकच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून १४ कोटींचा निधी मंजूर, ४३ गावातील शेतकऱ्यांना होणार फायदा

करंजी : राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा एकच्या दुरुस्ती कामासाठी जलसंपदा विभागाकडून १४ कोटी ६० लक्ष ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. अधिक माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, वांबोरी चारी टप्पा एकमधील अनेक पाझर तलावांमध्ये पाणी … Read more

भंडारदरा येथील रंधा धबधब्याच्या पाण्यात उडी घेत तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी, कृती टाळण्याचे पोलिसांकडून आवाहन

भंडारदरा- अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील रंधा धबधब्यावर रविवारी संध्याकाळी सहा वाजता एका अज्ञात तरुणाने जोरदार वाहणाऱ्या प्रवाहात उडी घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अत्यंत धोकादायक आणि जीवावर बेतू शकणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासन आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशनकडून पर्यटकांना अशा प्रकारच्या कृती टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट … Read more