संगनेरमध्ये घरकुल बांधकामासाठी २५ हजाराची लाच घेतांना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं, पोलिसांत गुन्हा दाखल

संगमनेर- घरकुलासाठी लागणाऱ्या वाळूच्या परवानगीसाठी तालुक्यातील कनोली येथील तलाठ्यास २५ हजार रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने येथील बस स्थानक परिसरात रंगेहात पकडले. संगमनेर बस स्थानक परिसरात काल सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई झाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यात घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिक घरकुलाच्या कागदपत्रांची पूर्तता … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना आवताडेने घातला कोट्यावधींचा गंडा, ७३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा असतानाच श्रीगोंदा पोलिस ठाण्यात यातील इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळाच्या विरोधात ७३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नवनाथ जग्गनाथ अवताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद … Read more

श्रीगोंदा तालुक्यात जमीनीच्या वादातून घरात घुसून महिलेसह पतीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल करुन घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

श्रीगोंदा- जमिनीच्या वादातून घरात घुसून महिलेसह पतीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी आरोपींनी ४५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याच्या दोन अंगठया व गळयातील गंठण बळजबरीने हिसकाऊन घेतले. ही घटना रविवारी संध्याकाळी चिखली येथे घडली. या घटनेत महिलेचा पती आणि हॉटेलवरील कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात २० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाला सुरूवात, जून महिन्यात ‘या’ तालुक्यात पडलाय सर्वाधिक पाऊस, जाणून घ्या तालुकानिहाय आकडेवारी

अहिल्यानगर- जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाला सोमवारी सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ९१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने काही प्रमाणात खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अद्याप समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून या पावसाने … Read more

निळवंडे धरणातून १३ हजार ९९४ क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारदरा- अहिल्यानगर तालुक्यातील ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघर भागात तब्बल १७७ मिमी म्हणजेच सात इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या सांडव्यातून व वीज निर्मिती केंद्रातून एकूण ९ हजार ७७४ क्युसेकने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला … Read more

माझी व्हीडीओ शुटींग काढती काय? असं म्हणत महिलेच्या डोक्याला बंदूक लावत मारहाण, नवऱ्यालाही जीवे मारण्याची धमकी

श्रीगोंदा-कोर्टातील दाखल दाव्याच्या कारणावरून महिलेला माझी व्हीडीओ शुटींग काढती काय ? असे म्हणत मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावत महिलेसह तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण काढून नेले. सुदैवाने या घटनेत पिस्तूलमधील गोळी अडकल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी सुरेखा मच्छिद्र झेंडे (वय ४५, रा.चिखली यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात … Read more

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना दिलासा, बॅंकेतील पैसे मिळणार परत

अहिल्यानगर- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अवसायन प्रक्रियेत असलेल्या या बँकेने ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमेचा काही भाग परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अवसायक गणेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठेवीदारांकडे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती आहे, त्यांना त्यांच्या ठेवीच्या ५० टक्के रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात १४ हजार ९५३ विद्यार्थ्यांना देण्यात आली जातवैधता प्रमाणपत्रे

अहिल्यानगर- सध्या विद्यार्थ्यांच्या अकरावी सायन्ससह विविध शाखांत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच सीईटी परीक्षा दिलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी जात पडताळणी समिती कार्यालयात गर्दी होत आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे १ जानेवारी २०२५ पासून १७ हजार ४५१ प्रकरणे जात वैधता पडताळणीसाठी प्राप्त झाली होती. जिल्हा जात पडताळणी … Read more

संगमनेरात वृक्षारोपणावर आधारित ‘कार्बन क्रेडिट’ प्रकल्प राबवावा — आमदार सत्यजित तांबे.

थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 2006 साली संगमनेर तालुक्यात व शहरात ‘दंडकारण्य अभियान’ ही पर्यावरणपूरक चळवळ सुरू झाली. त्यानंतर सौ. दुर्गाताई तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मागील 18 ते 20 वर्षांत शहरामध्ये व्यापक प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या नियोजनबद्ध वृक्षारोपणामुळे संपूर्ण शहराचे सुशोभीकरण झाले असून संगमनेर अधिक आकर्षक आणि हरित बनले … Read more

प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहा – डॉ जयश्रीताई थोरात यशोधन कार्यालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन

संगमनेर (प्रतिनिधी)–भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे निळवंडे धरणातून 6570 क्यूसेस पाणी सोडण्यात आली असून आगामी काळात पावसाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे म्हणून नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असे आवाहन युवा काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते … Read more

मुुख्यध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचे ३ दिवसांपासून आंदोलन, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

अहिल्यानगर- कापड बाजार येथील लक्ष्मी भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात आंदोलन सुरू होते. अखेर संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या ठोस आश्वासनाने आंदोलन स्थगित करण्यात आले. नुकतीच शाळा सुरु होऊन काही दिवस उलटले असताना मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची अचानक बदलीचा आदेश आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी पालक … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील प्रसिद्ध रथयात्रेला सुरूवात, रथयात्रेला २०० वर्षांची परंपरा तर गावात प्रभू श्रीरामचंद्रांनी निर्माण केलेली पाच शिवलिंगे

जामखेड- तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वर रथयात्रेस रविवारी (दि.६) आषाढी एकादशीला प्रारंभ झाला आहे. आषाढी एकादशी ते गुरूपोर्णिमा, असे पाच दिवस यात्रा साजरी होणार आहे. जवळेश्वराची रथयात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आषाढी एकादशी ते गुरुपोर्णिमा अशी पाच दिवस चालणाऱ्या आषाढी रथयात्रेचा इतिहास मोठा रंजक आहे. रथयात्रेची प्रथा अंदाजे २०० वर्षांपूर्वीपासून असावी, असे जाणकार मंडळी सांगतात. आषाढी … Read more

शेवगाव तालुक्यातील ढाकणे महाविद्यालयाच्या २४२ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड

घोटण- शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय, या ग्रामीण भागातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘मेगा ओपन कॅम्पस ड्राईव्ह २०२५” मध्ये ४८९ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या आणि त्यामधून २४२ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या वेळी मानव संसाधन व्यवस्थापक श्री. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार संधी, मुलाखतीची तयारी, … Read more

नगर- जामखेड महामार्गावर पोलिसांकडून बनावट कारवायांचा धडाका

Police Complaint Authority Mumbai Bharti 2023

चिचोंडी पाटील : नगर- जामखेड महामार्गावर रात्री ११ नंतर कोणतेही व्यवसाय सुरू न ठेवण्याबाबत पोलीस अधीक्षकांचे आदेश आहेत. मात्र, काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून येथील व्यावसायिकांना त्रास देण्याच्या हेतूने बनावट कारवाई होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सध्या रंगू लागल्या आहेत. याप्रकरणी पोलिस वाहनांची जीपीएस तपासणी केली तर अनेक बनावट कारवाया उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस ११ वाजण्याच्या सुमारास … Read more

अहिल्यानगर शहरात सुख,समृद्धी नांदू दे, सर्वांचे संकटे दूर होऊ दे, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची पांडुरंगाचरणी प्राथर्ना

अहिल्यानगर- पांडुरंगाने सर्वांचे संकटे दूर करून शहरात सुख, समृद्धी नांदू दे! अशी प्रार्थना आपण विठ्ठल चरणी केली आहे. मनपाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सर्व सुविधा देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. आज अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय झाला आहे, अनेकजण पंढरीच्या वारीला गेले आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक दिंड्या अहिल्यानगर शहरातून … Read more

आमच्या गावात लिंबू खरेदी करायचे नाहीत असे म्हणत श्रीगोंद्यात व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण

श्रीगोंदा- लिंबू व्यावसायिकाला गावात लिंबू खरेदी करायचे नाही, असे सांगत १५ ते १६ जणांनी लाकडी दाडक्याने मारहाण करून दोन अंगठ्या तसेच खिशातील एक लाख ९२ हजार काढून घेत लिंबूखरेदी करीता पुन्हा आला तर हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली. बांगर्डे ते खांडगाव रोडवर दि.५ रोजी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अमोल सुरेश म्हेत्रे … Read more

जामखेड तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड सागर मोहोळकरची पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

जामखेड- येथील सागर मोहळकर या आरोपीबाबत जामखेड पोलिसांनी सतर्क होत जामखेड कारागृहात न ठेवता न्यायालयाचे परवानगीने पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.सदर आरोपी सागर दत्तात्रय मोहोळकर जामखेडचा रहिवाशी असून, तो त्याच्या साथीदारांच्या मदतीने लोकांमध्ये दहशत निर्माण करुन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत असतो. यापूर्वी जेलमध्ये अटकेत असताना त्याने एका आरोपीचा खून केला आहे. … Read more

अहिल्यानगर शहरात मोहरमची विसर्जन मिरवणूक पडली शांततेत पार, ‘लब्बैक या हुसेन… या हुसेन’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

अहिल्यानगर- मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीला कोठला येथून रविवारी (दि.६ जुलै) दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. ‘लब्बैक या हुसेन… या हुसेन’च्या घोषणा, ठिकठिकाणी सरबतचे वाटप आणि सवारींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. मंगलगेट, पंचपीर चावडी, चौपाटी कांरजा येथून मिरवणूक रात्री ९.४० वाजता दिल्लीगेट बाहेर पडली. मोहरमनिमित्त कोठला परिसरात सवारींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी … Read more