पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीत येणं म्हणजे जगाच्या पाठीवरील एक अद्भूत सोहळा- जलसंपदामत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी- आषाढी वारी हा जगाच्या पाठीवरील एक अद्भूत सोहळा आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर चालून पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा सुखाचा क्षण असल्याची भावना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमिताने श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे पहाटे दर्शन घेतले. दरवर्षी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या … Read more

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवाश्यात ज्ञानोबा माऊली जयघोषाने परिसर दुमदुमला, पैसे खांबांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

नेवासा-आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या येथील माऊलींच्या पैस खांबाचे काल रविवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भक्तांच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम, या नामघोषाने परिसर दुमदुमला होता. आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने काल पहाटेच्या सुमारास माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात नाशिकहुन येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेल्या भाविकांच्या हस्ते चमेली चंदन उटीसह पंचामृताने … Read more

साईभक्तांसाठी बांधण्यात आलेल्या ‘त्या’ दोन इमारतीसंदर्भात साई संस्थानचा पाठपुरावा सुरू, विखेंची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार

साकुरी- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले की, नॅशनल हायवेने खोपडी व पाथरी दरम्यान पदयात्रींसाठी उभारलेल्या दोन इमारती अधिकृतपणे संस्थानकडे हस्तांतरित झाल्या नाहीत. इमारतींच्या हस्तांतरणासाठी संस्थानकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वर सिन्नर ते सावळीविहीर फाटा या मार्गाचे रुंदीकरण … Read more

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी! गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीतील ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती ठेवण्यात येणार बंद

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाययोजना व विशेष सेवा-सुविधा राबविण्यात येत आहेत. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी … Read more

अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

भंडारदरा- अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आषाढ महिन्याच्या सरींचा जोर कायम असून, त्याचा थेट परिणाम भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढला असून, रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणात ७हजार ८१४ दलघफु जलसाठा नोंदवला गेला. धरण ७१.६९ टक्के भरले असून, सांडव्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत … Read more

जादा पैश्याचे आमिष दाखवून शिर्डीतील गुतंवणूकदारांना १ कोटी ६५ लाखांचा गंडा, ‘ग्रो मोर इनव्हेस्टमेंट’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल

शिर्डी- येथील साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर २० गुंतवणूकदारांनी मिळून तब्बल १ कोटी ६५ लाख ४ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर फक्त काही हप्ते मिळवून उर्वरित रक्कम न देता फसवणूक झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुंतवणूकदारांनी विश्वासघात झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. याबाबत … Read more

महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे, राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंगा चरणी प्रार्थना!

संगमनेर-पंढरपूरचा पांडूरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधूभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे. ही संस्कृती मानवतेला साद घालणारी असून महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे. राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे. संगमनेर मधील चैतन्य … Read more

आईबापानं पोत अन् गंठण शिवून पोराला शिकवलं, पोरानं सीए होत आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं, संगमनेरच्या विशालची प्रेरणादायी यशोगाथा

संगमनेर- शहरातील गंठण काम करणाऱ्या पांडुरंग आणि सुवर्णा मिठ्ठा यांचा मुलगा विशाल याने सीए फायनलची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या विशालने आपल्या कठोर परिश्रम आणि आई-वडिलांच्या त्यागातून मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘आई-वडिलांनी कर्ज काढून माझे शिक्षण पूर्ण केले,’ असे सांगताना विशालच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर मुलाच्या यशाने पांडुरंग … Read more

संगमनेरमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या ६० जणांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, सहकार्य न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

संगमनेर- नगरपरिषदेच्या हद्दीत रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्या ६० जणांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते विविध व्यावसायिक आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश आहे. शहर आणि उपनगरात दररोज घंटागाड्या घरोघरी येऊन सर्व प्रकारचा कचरा संकलित करत असतानाही काही लोक रस्त्यांवर कचरा टाकतात, ज्यामुळे शहराच्या सौंदर्याला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी … Read more

पंढरीची वारी करून माघारी परततांना अहिल्यानगरमधील पती-पत्नीला ट्रॅक्टरने दिली जोराची धडक, अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

श्रीगोंदा- पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील वारकरी मल्हारी बाजीराव पवार (वय ५७) आणि त्यांच्या पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५४) यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे रस्त्यावर भिगवणजवळ एका अनोळखी ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेने येळपणे गावावर शोककळा पसरली असून, … Read more

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार चांदा-कुकाणा रस्त्यावर दुर्दैवी अपघात

कुकाणा रोडवरील पेट्रोल पंपाजवळील कॉर्नर जवळ आयशरच्या धडकेत दुचाकीचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यातील चांदा – कुकाणा रोडवरील पेट्रोल पंपाजवळील कॉर्नर जवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक महिला गंभीर जखमी झालेली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुकाण्याकडून चांद्याकडे येणाऱ्या (एम.एच. ०२ सी.ई. ८१३७) क्रमांकाच्या आयशरच्या धडकेत चांद्याहून बाजार करून कौठा येथील (एम.एच. १७, व्ही. … Read more

मोटारसायकल घसरली, कारखाली चिरडले गेले ! दोघांचा दुर्दैवी अंत…

शनिवार दिनांक ५ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मारुती रिट्स व एका दुचाकीची श्रीरामपूर-नेवासा रोडवरील पुनतगाव फाट्यानजीक समोरासमोर धडक होऊन दोन जण जागेवर ठार झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की, विक्रम भीमा आढाव (रा. शिरसगाव, ता. येवला, जि. नाशिक) हे आपल्या दोन मित्रांसमवेत मित्राच्या मारुती रिट्स कारने भालगाव, ता. नेवासा येथे स्वतः करिता … Read more

कोपरगावच्या रखडलेल्या विकासकामांवरून राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत घमासान!

लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निधीच्या कामांना अद्याप मुहूर्त देखील मिळालेला नाही. कोपरगाव शहराच्या दुरवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून पक्षाच्या आमदारांनाच घरचा आहेर दिला आहे. तसेच मित्रपक्ष भाजपाचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी देखील टीका केली आहे. कोपरगाव नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतील अनेक कामे अद्यापही प्रलंबित आहेत. काही कामांना अद्याप मुहूर्त देखील लागलेला … Read more

कोपरगावमध्ये बिबट्याची जोडी उघडपणे फिरतेय ! वनविभागाला झोप उडवणारा इशारा!

कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा, वराडे वस्ती, अचानक नगर परिसरात बिबट्याची जोडी नुकतीच आढळून आली आहे. ही बिबट्याची जोडी गेल्या आठ दिवसांपासून रात्री-अपरात्री राजरोस फिरत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप नवले यांना त्यांच्या उसाच्या शेतात एका बिबट्याने दर्शन घडले. त्याचा फोटो कुणाल लोणारी यांनी काही फुटावरून काढला. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम असून … Read more

Ahilyanagar Police : एलसीबी प्रवेशासाठी सुरु आहेत राजकीय भेटीगाठी ! जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष

Ahilyanagar Police : अहिल्यानगर पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती होण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चढाओढ असल्याचे दिसत आहे. एलसीबीमध्ये आपलीच नियुक्ती व्हावी, यासाठी यातील एका कर्मचाऱ्याने नातेवाईक असलेल्या आपल्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा आश्रय घेतला आहे, तर काही कर्मचारी कामगिरीच्या जोरावर आपणच कसे एलसीबीसाठी सक्षम असल्याचे वरीष्ठांना विश्वासात घेऊन सांगत आहेत; परंतु नव्याने दाखल झालेले जिल्हा पोलीस … Read more

डोक्यावर ५ किलोची गाठ… डॉक्टरांनी केला चमत्कार ! तरुणाला साई हॉस्पिटलमधून मिळाले दुसरे जीवन

Shirdi News : डोक्यावर अवाढव्य गाठ घेऊन जगत असलेल्या एका तरुणाच्या जीवनात शिर्डी संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नवचैतन्य आणले. अनेक हॉस्पिटल्सनी नाकारलेली शस्त्रक्रिया येथे यशस्वीरित्या पार पडली आणि रुग्ण पुन्हा नवजीवन जगू लागला. ही वैद्यकीय सेवा केवळ उपचार नव्हे, तर एक सामाजिक योगदान ठरली. अनिकेत भानुदास इंगळे (वय २१, रा. चत्तरी, ता. पातुर, जि. … Read more

डॉक्टर-इंजिनिअरचं स्वप्न विकलं जातंय फसव्या Apps मधून ! पालकांसाठी गंभीर इशारा

शिर्डी : गुणवत्तेचा अभाव असलेली, निकालशून्य देणारी आणि विद्याथ्यांच्या भविष्याशी थेट खेळ करणारी नीट व जेईई परीक्षांसाठीची काही बोगस ऍप्स आणि स्टडी मटेरियल काही स्वयंघोषित शिक्षणतज्ज्ञांनी बाजारात आणली आहेत. ही Apps प्रभाव पाडत माथी मारली जात आहेत. या फसव्या मोहजालाला बळी न पडता विद्यार्थी आणि पालकांनी सावध राहून आपले वेळ, पैसा आणि शिक्षणाचे अमूल्य क्षण … Read more

विखे पाटील कुटुंबाच्या प्रयत्नांना यश ! ४५० गरीब कुटुंबांना हक्काची जमीन मिळणार

Ahilyanagar News : विखे पाटील कुटुंबाच्या अथक प्रयत्नांमुळे गोर गरीबांच्या निवाऱ्याच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार येणार आहे. सावळीविहीर बुद्रुक गावात सामाजिक समरसतेसह विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. ४५० कुटुंबांना प्रत्येकी अर्धा गुंठा जमिनीचा हक्काचा निवारा मिळणार असल्याची माहिती सरपंच उमेश साहेबराव जपे व उपसरपंच विकास जपे यांनी दिली. पत्रकात म्हटले, की गोरगरीबांच्या आयुष्यात स्थिरता यावी, … Read more