बिबट्या दिवसाढवळ्या फिरतोय, पण प्रशासन झोपेत ? नागरिकांमध्ये संताप

Ahilyanagar News : पुणतांबा येथील रामपूरवाडी रोडलगत असणाऱ्या थोरात वस्ती, म्हसोबावाडी, रेल्वे पुलाजवळ, चव्हाण वस्ती या परिसरात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र घबराट निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून बिबट्या सतत ठिकाणे बदलत असून काही दिवसांपूर्वी रामपूरवाडी रोडवरील कै. सावित्राभाऊ थोरात यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास दिसून आला. बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज … Read more

बळीराजा सुखी होऊ दे! पांडुरंगाच्या चरणी अक्षय कर्डिले यांची भावनिक प्रार्थना

Ahilyanagar News : शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला तर देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी राहील, त्यामुळे राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी पंढरीच्या पांडुरंगाकडे केली आहे. राहुरी नगर पाथर्डी नेवाशासह जिल्हाभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या अनेक दिंड्यांचे स्वागत युवा नेते अक्षय … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विभागात भरती, १३७ जागांसाठी १३३८ अर्ज

Ahilyanagar ZP Bharti : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान, पंधरावा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी आरक्षणासह १३७ जागांसाठी भरती करण्यात येत असून या जागांसाठी सुमारे १३३८ जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, पोस्टाने आलेल्या अर्जाची अद्याप मोजणी सुरू असल्याने या … Read more

प्रवरेत रंगला अध्यात्मिक वारी सोहळा टाळ-मृदुंग, जयघोष आणि वारी….

शिर्डी : प्रवरेच्या सहकार भूमीत “वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची” या संकल्पनेतून डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजिलेला अध्यात्मिक सोहळा हे शिक्षण आणि संस्कृतीचे सुंदर संमेलन ठरले. टाळ-मृदुंगाच्या निनादात, जयघोषाच्या गजरात विद्यार्थ्यांनी साकारलेली वारी आणि उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लोणीत साक्षात पंढरपूर अवतरल्याचा अनुभव मिळाला. सहकार आणि ज्ञानाच्या पंढरीत खऱ्या अर्थाने “अवघा रंग एक झाला” … Read more

पाऊस नाही, विहिरी कोरड्या ! गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने सोडा : आ. आशुतोष काळे

Ahilyanagar News : मे महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि हवामान खात्याच्या अंदाजाच्या भरोशावर कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहे. परंतु जून महिन्यात पावसाने अपेक्षाभंग केल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! १६ घरफोड्या, २४ लाखांचा मुद्देमाल….

Ahilyanagar News : घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून पकडलेल्या आरोपींकडून २५० ग्रॅम सोन्यासह २४ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अहिल्यानगर, सातारा, नाशिक व पुणे जिल्ह्यात १६ घरफोड्या केल्याचे तपासात समोर आले आहे.पकडलेल्यांमध्ये मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले (वय २८, रा.बेलगाव, ता. कर्जत), सुनिता उर्फ … Read more

Ahilyanagar Breaking : अखेर नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह आढळला

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मोठ्या पुलावरुनएका स्त्रीला गोदावरी पात्रात पडताना अनेक लोकांनी पाहिल्यानंतर आपत्ती विभागातील स्वयंसेवकांनी सदर महिलेस गोदावरी पात्रात शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सदरची घटना ३० जून रोजी घडली. दरम्यान, चार दिवसानंतर काल शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वारी शिवारातील गोदापात्रात सदर महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सदर महिलेच्या संदर्भात ओळख … Read more

संगमनेर तालुक्यात काही जण दांडगाई करत आहेत, त्यांना ठामपणे उत्तर देऊ, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा इशारा

संगमनेर- काँग्रेसचा विचार हा शाश्वत आणि जनकल्याणकारी आहे. सुसंस्कृत राजकीय परंपरेचा वारसा जपत, तालुक्यातील चुकीच्या गोष्टींना आता उत्तर द्यावेच लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या सत्कार समारंभात थोरात बोलत होते. थोरात … Read more

शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करणं संगमनेरच्या तहसिलदारांना भोवणार, कारवाई करण्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संगमनेर-शासकीय कार्यालयात वैयक्तिक वाढदिवस साजरा करून नागरिकांच्या कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या तहसीलदार धीरज मांजरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल वाकचौरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. पत्रकात वाकचौरे यांनी म्हटले, की ३० जून रोजी तहसीलदार धीरज मांजरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी तो तहसील कार्यालयातच साजरा केला. … Read more

सोनई परिसरात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मावा कारखान्यावर मोठी कारवाई, ८० हजारांच्या मुद्देमालासह एकाला केली अटक

सोनई- सोनईजवळील कारखाना परिसरात अवैधपणे सुगंधित मावा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ८० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकास अटक झाली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश … Read more

अहिल्यानगर तालुक्यात महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, भिंतीवरच लटकवले मीटर

चिचोंडी पाटील- राज्य शासन मोठमोठ्या घोषणा करत सर्वसामान्य नागरिकांना अनेक धक्के देत आहे. यात वीज ग्राहकांना जुने मीटर बदलून त्याजागी स्मार्ट मीटर बसवून दिले जात आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराकडून हे काम गुणवत्तापूर्वक केले जात आहे की नाही? याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नगर तालुक्यातील सारोळा बद्धी येथे महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर … Read more

अकोले तालुक्यातील आढळा धरण १०० टक्के भरले, शेतकऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण

अकोले-तालुक्यातील देवठाण येथील १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण गुरुवारी दुपारी १२ वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून, यामुळे संपूर्ण लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ६० क्यूसक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. जलसंपदा विभागाने ही माहिती जाहीर केली. या वर्षी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण भरल्याने रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले असून, पिण्याच्या पाण्याचीही चिंता … Read more

संगमनेरच्या चंदनापुरी घाटात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूलबस उलटली, ४ विद्यार्थी किरकोळ जखमी

संगमनेर- तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळील आनंदवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेत नेणारी स्कूलबस उलटल्याने चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही बस चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. साकूर पठार भागातील अनेक विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना रोज शाळेत नेण्यासाठी विद्यालयाची स्कूल बस वापरली जाते. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये स्वस्तात प्लाॅट देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या पोलिसाला ठोकल्या बेड्या, तर सेवेतूनही करण्यात आले निलंबित

अहिल्यानगर- स्वस्तात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून लोक मंगल गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली शंभर पेक्षा जास्त कष्टकरी, पोलिस, पत्रकार यांचे पैसे गोळा करून प्लॉट न देता फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात संशयित पोलिस अंमलदाराला कोतवाली पोलिसांनी आज अटक केली. त्या अगोदर भागीदार सामाजिक कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली आहे. संशयित आरोपी पोलिस अंमलदार अशोक बाळू पुंड (रा. साई गजानन कॉलनी, … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यात जनावरांना लंम्पी आजाराची लागण, अश्या पद्धतीने जनावरांची घ्या काळजी?

जामखेड- तालुक्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य असलेला लंम्पी आजाराची पुन्हा लक्षणे दिसून आल्याने पशुपालन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड तालुक्यात पुन्हा लंपी आजाराने डोके वर काढल्याने पशुपालक शेतकऱ्यांत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे आजाराचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा रामभरोसे चालू असल्याचे चित्र आहे. … Read more

पाथर्डी शहरात मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर थेट कारवाई होणार, मुख्याधिकारी संतोष लांडगे यांचा इशारा

पाथर्डी- गेल्या काही दिवसापासून शहरांमध्ये भटक्या गाई व मोकाट वळुंच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वळुंच्या झुंजीमुळे अनेकजण जखमी होत असून वाहनांचे देखील यामुळे मोठे नुकसान होत आहे. याची दखल घेऊन नगरपरिषदेने गाय व वळूना पकडायचा पिंजरा आणला असून सार्वजनिक ठिकाणी आपल्या जनावरांना बेजबाबदारपणे सोडणाऱ्या मालकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी … Read more

अहिल्यानगरमध्ये जमिनीत वाटा देतो म्हणून सख्या भावानेच बहिणींना फसवलं, बहिणींनी केली तक्रार

कर्जत- तुम्हाला तुमच्या वाट्याची जमीन तुमच्या नावावर करुन द्यायची आहे असे सांगून कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयात हक्क सोडपत्र करून घेतले. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला याबाबत तिघी बहिणींनी महसुल विभागाकडे हक्क सोडपत्र रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे. या बाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील गोयकरवाडी येथील रहिवासी भाऊ सहादू टकले यांची सात एकर जमीन … Read more

२० वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला श्रींगोदा पोलिसांनी सापळा रचून पकडलं

श्रीगोंदा- वीस वर्षापूर्वी दाखल गुन्ह्यातील खटल्याचे सुनावणी कामी न्यायालयात हजर राहत नसलेल्या आरोपीला नॉन बेलेबल वॉरंटमध्ये वीस वर्षांनंतर श्रीगोंदा पोलिसांनी वांगदरी गावचे शिवारात सापळा रचुन ताब्यात घेत ठोकल्या बेड्या. शफीक अदम अत्तार रा. लिंपणगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फौजदारी न्यायालय श्रीगोंदा यांचेकडील संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक २०००२३४/१९९९ सरकार … Read more