अहिल्यानगर जिल्ह्यात ३० हजारांहून अधिक बसवण्यात आले सौर पंप! सौर पंप दुरुस्तीसाठी आता ऑनलाइन तक्रार व्यवस्था, जाणून घ्या प्रक्रिया

अहिल्यानगर- जिल्ह्यात विविध योजनांमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या ३० हजार ६९७ वर पोहोचली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’, प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप’ अशा दोन योजनांद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. सौर कृषी पंप बसवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे होय. यामुळे … Read more

अहिल्यानगरमधील केडगाव ते निंबळक बायपासवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा अपघाती मृत्यू!

वाळकी- केडगाव ते निंबळक बायपास रस्त्यावर कल्याण रोड बायपास चौकात असलेल्या उड्डाणपुलाच्या जवळच अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ४ जुलै) सकाळी उघडकीस आली आहे. वनविभागाचे पथक सोनेवाडी येथे असतानाच त्यांना बायपास रस्त्यावर एक बिबट्या मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पथक तातडीने कल्याण बायपास चौकातील उड्डाणपुलाच्या पुढे … Read more

केडगावमध्ये रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिक संतप्त, १५ दिवसांत विजपुरवठा सुरळीत करू, महावितरणचे आश्वासन

अहिल्यानगर- केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण कंपनीविरोधात संतापची लाट आहे. केडगाव उपनगराचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. आज स्थायी समितीचे माजी सभापती … Read more

अहिल्यानगरमधील एमआयडीसीमधील कामगार हॉस्पिटलचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावावा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

अहिल्यानगर- शहरातील एमआयडीसीमधील कामगार हॉस्पिटलचा प्रश्न राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून धुळखात पडून असून तो मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी उद्योग मंत्री सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून निवेदन दिले. लवकरच एमआयडीसीमध्ये कामगार हॉस्पिटल बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सावंत यांनी दिले. नगर एमआयडीसी हजारो कामगार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे ॲक्शन मोडवर

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यामध्ये क्राईमच्या संदर्भात दुसरा क्रमांक लागतो. गुन्हेगार दिवसेंदिवस गुन्हा करण्याच्या पध्दती बदलत आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते. गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी जिल्हा पोलीस दल विविध संकल्पना राबवीत आहे. येणाऱ्या काळात एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. जिल्हा पोलीस … Read more

कर्जतमध्ये सोन्याची बिस्कीट बनवून देतो म्हणत वृद्ध महिलेल्या गंडवणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

कर्जत- तालुक्यातील पाटेवाडी येथील वृद्ध महिलेला सोन्याच्या बिस्कीटाचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा कर्जत पोलिसांनी पर्दाफाश केला असुन, मराठवाड्यातील चार आरोपींना अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील वृद्ध महिला बेबी शशिकांत महाडीक यांची १६ जुन रोजी फसवणूक झाली होती. याबाबत त्यांनी कर्जत पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, तीन चार अनोळखी व्यक्तींनी तुझ्या गळ्यातील … Read more

अहिल्यानगर शहरात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे तगडे नियोजन, तब्बल १००० हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त

अहिल्यानगर- मोहरम विसर्जन मिरवुणकीसाठी शनिवार (दि. ५) व रविवार (दि. ६) अशी दोन दिवस मोहरम विसर्जन मिरवणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच, जागो जागी चौक्या व पहारे राहणार आहेत. मोहरमच्या अनुषंगाने शहरात नो व्हेईल झोन घोषीत करण्यात आला. अहिल्यानगर शहरातील … Read more

अहिल्यानगर मार्केट यार्डमध्ये एकाच रात्री ८ दुकाने फोडणाऱ्या सराईत चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहिल्यानगर- मार्केट यार्डमधील भुसार विभागातील ८ दुकाने फोडून चोरी करणारे दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. या चोरट्यांकडून मार्केट यार्ड सह साकत व देहरे गावात मेडिकल दुकानांत केलेल्या चोऱ्याही उघड झाल्या आहेत. अकबर लुकमान खान (वय ३३, रा.दौला वडगाव, ता. … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तब्बल ४ कोटी रूपयांच्या घोटाळा, अफरातफर करणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांना वसुलीच्या नोटीसा

अहिल्यानगर- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देय असलेल्या फरकाच्या रकमा स्वतःच्या खात्यात वळवून सुमारे ४ कोटी १४ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी अफरातफरीची ही रक्कम शासनाच्या खात्यात १८ जुलैपर्यंत भरावी, अशा आशयाच्या वसुलीच्या नोटिसा ५६ जणांना बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागा अंतर्गत कर्मचाऱ्यांना देय असलेल्या फरकाच्या रकमा स्वतःच्या खात्यावर … Read more

अहिल्यानगरमध्ये मोहरम सणानिमित्त डीजे वाजवणं भोवलं, डीजे चालकांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

अहिल्यानगर- मोहरम सणानिमित्त शहरातील मंडळासह डीजे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा बंगाली शाह यंग पार्टी आणी मौला फ्रेंड सर्कल यंग पार्टी तर्फे काढण्यात आलेल्या चादर मिरवणुकीत परवानगीनुसार अटींचा भंग करुन प्रचंड आवाजात डीजे वाजवून व घोषणाबाजी करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग करीत ध्वनीप्रदूषण केल्याची घटना २ जुलै रोजी समोर आली. या प्रकरणी बाबा … Read more

आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणाऱ्या बीडच्या शेखची थेट तेलंगणातून केली उचलबांगडी

अहिल्यानगर : शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मेसेसद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. सदर आरोपी मूळचा बीड जिल्ह्यातील असून, तो ट्रक चालक असल्याचे समोर आले आहे.अनिस महंमद हनिफ शेख असे त्याचे नाव आहे. दि. २ जुलै रोजी सुहास साहेबराव शिरसाठ (रा. बुरूडगाव रोड, अहिल्यानगर) यांच्या मोबाईलवर अनोळखी … Read more

श्रीरामपूर तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांच्या शेतातून चोरले दोन गुंठे गवत

श्रीरामपूर- तालुक्यातील उक्कलगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, शेतातील उभी चारा पिके चोरून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. जून महिना सरून जुलै उजाडला तरी पावसाचा थेंबही पडेनासा झाल्याने आधीच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीला पडलेल्या अवकाळी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता ती पिके कोमेजू लागली आहेत. थोड्या … Read more

अजून थोडा पाऊस आला असता तर मुळा धरणाऱ्या बाबतीत घडला असता ‘हा’ ऐतिहासिक विक्रम, मात्र थोडक्यात संधी हुकली

राहुरी- नगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणाची स्थापना १९७२ साली झाली. दरवर्षी कोणता ना कोणता विक्रम या धरणाच्या बाबतीत घडत असतो. यंदाच्या वर्षी मात्र एक ऐतिहासिक संधी हुकली आहे. ती संधी म्हणजे मुळा धरण जून महिन्यात निम्मे म्हणजेच ५० टक्के भरण्याचा विक्रम. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये ५० टक्क्यांपर्यंत साठा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. … Read more

अहिल्यानगरमध्ये शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी पडकलं, पाच दिवसाची पोलीस कोठडी

राहुरी- शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देण्याचे आमीष दाखवणारा भामटा राहुरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सदर आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले. या प्रकारानंतर जिल्हाभरात ज्या शेतकऱ्यांची सोलार पंपच्या नावाने फसवणूक झाली, त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे. याबाबत पोलीस … Read more

साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान व साईबाबांविषयी समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती ही अत्यंत गंभीर व दुःखद बाब आहे. या अपप्रचाराविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या दुर्भावनायुक्त प्रचारास कोणत्याही स्वरूपात प्रोत्साहन दिले जाणार नाही. अलीकडेच … Read more

दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये न आणल्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण

राहुरी : दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत सासरच्या सात लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की कोमल सुदर्शन कळमकर (वय २३ वर्षे, रा.केसापूर, ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत … Read more

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणातून सोडण्यात आले पाणी, धरण ६० टक्के भरल्याची माहिती

भंडारदरा- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले असून, पाण्याची येणारी आवक पाहून धरणातून पाण्याचा प्रवाह कमी अथवा जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धरण शाखेकडून देण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे धरणाचा साठा सातत्याने वाढत असून … Read more

अहिल्यानगरमधील दिंडीतील वारकऱ्यांना चारचाकी वाहनाने दिली जोरदार धडक, पाच वारकरी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक

राहुरी- तालुक्यातील टाकळीमियाँ येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला पंढरपूरजवळील भोसे गावाजवळ गुरुवारी ३ जुलै रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पाच वारकरी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाकळीमियाँ येथून पंढरपूरकडे जाणारी श्री दत्त सेवा पायी दिंडी आपल्या रथासह … Read more