अहिल्यानगरमधील लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, लिंबाला मिळाला तीन वर्षांतील सर्वात निचांकी दर

अहिल्यानगर- गेल्या तीन वर्षातील निचांकी भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांसाठी लिंबू अधिकच अंबट ठरू लागले आहे. सध्या अगदी प्रतिकिलोला बारा ते तेरा रूपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एरवी पावसाळा, हिवाळा या दोन्ही ऋतूमध्ये लिंबाचे भाव कमी होतात. मात्र गेल्या तीन ते चार वर्षात या दोन्ही ऋतूत अगदी उन्हाळ्याप्रमाणे चांगले भाव … Read more

पाथर्डीतील मुख्य रस्त्यावर गटारीचं पाणी, उपजिल्हा रुग्णालय परिसर दुर्गंधीने हैराण; सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेचे दुर्लक्ष

पाथर्डी : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या दुर्लक्षाने तीन महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील बाजूच्या गटारीतून घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून, उपजिल्हा रुग्णालय घाणीच्या विळख्यात सापडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वी मुख्य गटारीचे काम करण्यात आले. कामाची पाहणी करण्यासाठी यंत्रणा उदासीन असल्याने रस्ता खाली … Read more

जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांची श्रीगोंदा तहसील कार्यालयात झाडाझडती, कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष देण्याच्या सूचना

श्रीगोंदा- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली विकास कामांचा आढावा घेत योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहत शासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली तसेच कार्यालयाची स्वच्छता, अभिलेखांची स्थिती आणि कामकाज यावर लक्ष केंद्रित करत कामकाजाबाबत सूचना केल्या. श्रीगोंदा तहसील … Read more

शेतकऱ्यांना दिलासा! कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीपासाठी सोडण्यात आले पाणी, विखे पाटलांचा तातडीचा निर्णय

अहिल्यानगर- पावसाळा सुरू होवून महिन्याभराचा कालावधी उलटला आहे. सुरूवातीच्या या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने उगवण झालेली पिके सुकू लागली आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. या पार्श्वभुमीवर कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीपासाठी गुरूवारी रात्री पासूनच आवर्तन सोडण्याच्या जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण … Read more

अहिल्यानगरच्या बाजार समितीत आंब्याच्या भावात मोठी घसरण, डाळिंबाला १६ हजार, संफरचंदाला १२ हजार तर जांभळाला मिळाला ८ हजाराचा भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत गुरुवारी ३९९ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी सफरचंदाला प्रतिक्विंटल २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची २ क्विंटलवर आवक झाली. यावेळी सीताफळाला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार … Read more

अहिल्यानगरच्या शिरपेचाच मानाचा तुरा! ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांचा लंडनच्या ‘हाऊस ऑफ पार्लमेंट’मध्ये होणार सन्मान; जगातल्या २५ सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये निवड

अहिल्यानगर : श्रीरेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह अर्बन क्रेडीट संस्थेच्या माध्यमातून समाजभान जपत, सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांनी मोठी गरुड भरारी घेतली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल आतापर्यंत त्यांना मिळालेल्या शेकडो पुरस्कारानी घेतली आहे. मात्र या सर्व पुरस्कारावर नुकताच त्यांना लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट या संस्थेने जगभरातील २५ सर्वश्रेष्ठ … Read more

केडगावमध्ये प्लॉटच्या नावाखाली कोतकरांनी केली एकाची १७ लाखांची फसवणूक, दोन जणांविरूद्घ गुन्हा दाखल

अहिल्यानगर- केडगावच्या दुधसागर सोसायटी परिसरात प्लॉटची खरेदी देण्यासाठी विश्वास संपादन करून दोघांनी इसारापोटी १७ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र, इसार घेऊनही प्लॉटची खरेदी दिली नाही. इसाराची रक्कम परत न देता फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२३ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तुकाराम रामदास … Read more

आमदार संग्राम जगताप यांना संरक्षण द्या, अन्यथा या जिहादी प्रवृत्तींना धडा शिकवण्याचं काम आम्ही करू, धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अहिल्यानगर: जिहादी लोकांना भारताचे संविधान शिकवण्याची गरज आहे. लव जिहाद, वोट जिहाद करीत हिंदू धर्माच्या विरोधात काम करीत आहेत. आम्ही देखील आमच्या धर्माचे काम करीत असून कोणीही आडू शकत नाही. दौंड येथील बादशाह या नावाच्या व्यक्तीला तातडीने पोलिसांनी अटक करावी, अन्यथा आम्ही त्याला घेऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देऊ फेक अकाउंटवर देखील कारवाई करावी अन्यथा अशा … Read more

अहिल्यानगरमध्ये मोहरमच्या दिवशी तब्बल ४४० जणांना शहरातून करण्यात येणार हद्दपार, पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त

अहिल्यानगर :मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून एक दिवसांकरिता सुमारे ४४० समाज कंटकांना हद्दपार केले जाणार आहे. त्यात तोफखाना, कोवताली व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समाजकंटकाचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी केली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या आहेत. अहिल्यानगर … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाचा ५०% बफर स्टॉक सरकारने केला खुला, युवानेते विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

कोपरगाव : खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरियाचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी सरकारने युरियाचा ५० टक्के बफर स्टॉक खुला केला आहे. त्यामुळे सहकारी संस्था आणि खाजगी डीलर्सकडे युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. यासाठी विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. यावेळी खरीप … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन स्थगित! रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांवर होणार चर्चा

अहिल्यानगर- जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहेत. ठेकेदार कंपनीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले आहे. महाराष्ट्र राज्य १०८ रुग्णवाहिका चालक युनियनच्या न्याय मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यभरातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी दि. १ जुलै रोजी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चालकही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघा भावांनी खडकाळ माळरानावर फुलवली डाळिंब शेती, वर्षाकाठी कमवतायेत ३० ते ४० लाख रूपये

अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव सिद्धी हे गाव दुष्काळी पट्ट्यातले. भूप्रदेश खडकाळ, सिंचनाची कोणतीही सोय नाही. अशा परिस्थितीत इंगळे कुटुंब शेती करत होते. हुलगा, मटकीसारखी कोरडवाहू पिकं घेऊन जे काही मिळेल त्यावर समाधान मानायचं, हाच शेतकऱ्यांचा मार्ग होता. पण इंगळे कुटुंबातील पुढच्या पिढीने परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. शिक्षण आणि शेतीचा संगम भाऊसाहेब इंगळे यांचे सुपुत्र ज्ञानदेव आणि … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत ३ दिवस श्री साईबाबांचा भव्य उत्सव, असे असणार आहेत कार्यक्रम, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक?

शिर्डी- संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या भव्य उत्सवामध्ये सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. पत्रकात म्हटले, की गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत प्राचीन असून आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दिली उघडीप, शेतकऱ्यांची चिंता वाढली! पेरलेली पिके वाया जाण्याची भीती

अहिल्यानगर- ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे. मे महिन्यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी सुखावल्याचे पाहायला मिळाले. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर बहुतेक ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला. जमिनीची ओल पाहून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर काही ठिकाणी अपवाद … Read more

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार काशिनाथ दाते यांनी अधिवेशनात उठवला आवाज

पारनेर- पारनेर-नगर मतदारसंघातील सुप्यापासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत दि. २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले होते. यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. काशिनाथ दाते यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अंतर्गत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांच्या कामकाजाबाबत २ हजार लोकांनी नोंदवले अभिप्राय, ९ जुलै असणार आहे अभिप्राय नोंदवण्याची शेवटची संधी

अहिल्यानगर- जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी कसे काम करतात. कोणत्या विभागात उणिवा आहेत. कोणता विभाग चांगला काम करतो. यासंदर्भात नागरिकांना आता थेट अभिप्राय देण्याची संधी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यावरील नागरिकांची मते जाणून सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० जून ते ९ जुलै दरम्यान सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. … Read more

जवखेडे खालसा येथील मंदिरात पुन्हा आरती केल्यास दर्ग्यावर चादर चढवण्याचा मुस्लिम समाजाचा इशारा

करंजी- हिंदुत्ववाद्यांनी जवखेडे खालसा, ता. पाथर्डी येथे आज गुरुवार (दि.३) जुलै रोजी पुन्हा आरती केल्यास येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी दि.१० जुलै रोजी हजरत पीर बाबा रमजान उर्फ कान्होबाच्या दर्ग्यावर राज्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने चादर अर्पण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जवखेडे प्रकरणाबाबत आदेश डावलून न्यायालयाचा आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, स्थानिक सरपंच व अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध … Read more

चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

अहिल्यानगर- एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात विनापरवाना भारत देशात प्रवेश करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले. त्यांच्याकडे सर्वच ओळखपत्र बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून ते ओळखपत्र त्यांनी पाच वर्षांपूर्वी मुंबई परिसरात बनवले आहे. भारत देशात सीमेवरील चोरट्या मार्गाने त्यांनी प्रवेश केला. नगरमध्ये खडी क्रेशरवर काम करीत असताना ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे … Read more