अहिल्यानगरमध्ये मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर : नागापूर एमआयडीसीतील राममंदिराजवळ राहणाऱ्या एकाने मानसिक छळास कंटाळून घराच्या छतावरील वीजेच्या ताराला हात लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १६ जून २०२५ रोजी घडली. याबाबत १ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह राठोड (रा. आदर्शनगर राममंदिराजवळ नागापूर एमआयडीसी, अहिल्यानगर) … Read more

श्रीरामपूरमध्ये घरातच बनवत होते बनावट देशी दारू, पोलिसांनी छापा टाकून आरोपींना घेतले ताब्यात

श्रीरामपूर : येथील शहर पोलिसांनी गोंधवणी परिसरात छापा टाकून बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. यावेळी १ लाख ६६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस … Read more

वंचित बहुजन आघाडीचा झंझावात! कार्यकर्त्यांची फौज तयार, स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी किसन चव्हाणांचा राज्यभर संघटन बांधणीचा निर्धार

पाथर्डी- राज्यात भारतीय जनता पक्षाला विरोधक राहिला नाही. कोणी इडी व सीबीआयच्या भीतीने गेले तर कुणी पक्षात सामील झाले. वंचित बहुजन आघाडीच प्रुमख विरोधक म्हणून भूमिका बजावत आहे. संघटना महत्वाची असते. प्रत्येक गावात वंचितचे ११ सक्रीय कार्यकर्ते तयार करून स्वाभिमानी युवकांची फौज तयार करण्याचे काम राज्यभर केले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष … Read more

तिसगावकरांची ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी फरफट, आठ दिवसाला नागरिकांना पाणी मिळणार

करंजी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासंदर्भात बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत तिसगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून चार दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते मन्सूरभाई पठाण, सतीश साळवे, सचिन खंडागळे, दिनेश ससाने, नितीन खंडागळे, पोपट शिरसाठ, अक्षय साळवे, नितीन लवांडे, … Read more

गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, राहुरीत ख्रिश्चन समाज आक्रमक! हजारोंचा मोर्चा

राहुरी- आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ राहुरीत ख्रिश्चन समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी जोपर्यंत आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे राहणाऱ्या महलेने … Read more

संगमनेरमध्ये व्याजाचे पैसे न दिल्याने पती-पत्नीला धमकी, दोन सावकारांना संगमनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संगमनेर- व्याजाने दिलेल्या पैशाची रक्कम घेण्यासाठी महिला व तिच्या पतीला त्रास देऊन मोठी रक्कम उकळणाऱ्या नाशिक येथील दोघा खाजगी सावकारांना येथील पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील प्रवीण विलास देशमुख यांनी कंपनीसाठी कैलास बाबुराव मैंद (रा. जेल रोड, नाशिक रोड) यांच्याकडुन त्यांच्याकडे असलेल्या मनी लैंडर लायसन्स … Read more

पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकांची धडाकेबाज कामगिरी, अहिल्यानगर शहरातील मावा बनवणारे कारखाने केले उद्धवस्त

अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील संदेशनगरमधील सुगंधित तंबाखू व मावा तयार करण्याचा कारखाना बुधवारी (दि. २) पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी छापा घालून उद्ध्वस्त केला. सुमारे २ लाख २९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांना ताब्यात घेतले. गोरक्षनाथ शंकर मुर्तडकर (वय ४८ रा. नवनाथ निवास, संदेशनगर, … Read more

कोपरगावमध्ये ६४ इमारती धोकादायक, पालिसा प्रशासनाने मालकांना पाठवल्या नोटीसा, लवकरच इमारती केल्या जाणार जमिनदोस्त

कोपरगाव- शहरातील तब्बल ६४ इमारती व घरे धोकादायक बनल्या आहेत. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या वतीने चार जणांच्या पथकाने केलेल्या सर्वे मधून ही माहिती समोर आली आहे. या ६४ जणांना पालिका प्रशासनाने नुकत्याच नोटीसा बजावल्या आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेल्या पत्रकात … Read more

अहिल्यानगरमध्ये स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली गुजरातच्या दोन तरूणांना १५ लाखाला गंडवलं, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

श्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर परिसरात गुजरात येथून आलेल्या दोन तरुणांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे पंधरा लाखांना लुटल्याची घटना मंगळवारी (दि.१) दुपारी घडली. बेलवंडी पोलिसांनी त्यांच्या हद्दीत ‘ड्रॉप’ झाल्याचे नाकारले आहे. मात्र, त्याचवेळी सुपा पोलिसांनी बेलवंडी हद्दीत ‘ड्रॉप’ झाल्याचे व त्याबाबत तक्रार देण्यासाठी लोक आमच्याकडे आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे बेलवंडी पोलिसांचा अजब कारभार … Read more

चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

अहिल्यानगर- एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात विनापरवाना भारत देशात प्रवेश करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले. त्यांच्याकडे सर्वच ओळखपत्र बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून ते ओळखपत्र त्यांनी पाच वर्षांपूर्वी मुंबई परिसरात बनवले आहे. भारत देशात सीमेवरील चोरट्या मार्गाने त्यांनी प्रवेश केला. नगरमध्ये खडी क्रेशरवर काम करीत असताना ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे … Read more

अहिल्यानगर न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी बांधण्यात येणाऱ्या ५० सदनिकेसाठी तब्बल ६४ कोटींची मंजूर, आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर- न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीशांसाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या ५० सदनिकांसाठी शासनाच्या विधी व न्याय विभाग मंत्रालयाने सुधारित प्रशासकीय मंजुरी नुकतीच दिली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करून पाठपुरावा केला होता. त्यास यश आल्याची माहिती आमदार जगताप यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील १६ जिल्हा न्यायाधीश, १४ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर … Read more

अहिल्यानगरच्या बाजार समितीत चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ दुकाने, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी; हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी

अहिल्यानगर- शहरातील माजी खासदार दादा पाटील शेळके बाजार समितीतील भुसार मार्केटमधील आठ दुकाने बुधवारी पहाटे चोरांनी फोडली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. दुकानाचे शर्टर उचकटून चोरांनी आतप्रवेश करीत रोकड लंपास केली. दरम्यान, तीन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, बाजार समितीत सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची गस्त असताना दुकाने फोडल्याने … Read more

भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले

भंडारदरा- तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचे तांडव सुरू असून त्यामुळे भंडारदरा धरणाचा जलसाठा ७ टीएमसीच्या पुढे गेला आहे. दुसरीकडे निळवंडे धरणामध्येही नव्या पाण्याची जोरदार आवक होत असून ते ५३.१८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. अहिल्यानगर परिसरातील घाटघर येथे मागील २४ तासांमध्ये १४० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, रतनवाडीला १२९ मिमी, पांजरेला … Read more

अहिल्यानगर शहरात उभ्या राहणाऱ्या नाट्य संकुलासाठी १३ कोटींच्या निधींची गरज, नाट्य संकुलात ‘या’ असणार आहेत खास सुविधा

अहिल्यानगर- शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्य संकुलाचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने नाट्य संकुलाचे काम आता ७५ टक्के पूर्ण झाले असून, अंतर्गत कामकाज बाकी आहे. यासाठी स्वतंत्र निविदा तयार करण्यात आली असून सुमारे १३ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. अंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यात नाट्य संकुलाचा … Read more

‘दोन दिवसात जीवे ठार मारू…’ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना धमकी !

अहिल्यानगर : काही दिवसांपासून अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने ते अनेकदा बोलत देखील आहेत, मात्र यामुळे त्यांना अज्ञात व्यक्तीने ‘दोन दिवसांत तुम्हाला जिवे मारून टाकू’ अशी धमकी दिली आहे. तसा मेसेज आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर बुधवारी दुपारी आला होता. याप्रकरणी सायंकाळी कोतवाली पोलिस … Read more

शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप तयार करून लाखोंचा घोटाळा करणाऱ्यांविरोधात काँग्रेसचे उपोषण, दोषींवर ठोस कारवाई करण्याची मागणी

Ahilyanagar News: सोनई- शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप, बनावट देणगी पुस्तक, बनावट कोडच्या माध्यमातून गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी काल मंगळवारी पासून शनिशिंगणापूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य संभाजी माळवदे यांनी उपोषण सुरू केले आहे. लाखोंचा गैरव्यवहार गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थान हे बनावट ॲपमुळे अडचणीत आले आहे. येथील काही … Read more

पाईपलाईन फुटल्याने पुणतांबा गावात पाणीटंचाई, ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थ संतप्त

Ahilyanagar News: पुणतांबा- येथील गावाला पाणीपुरवठा करणारी तळ्याजवळील पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणतांबेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरलेली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीटंचाई यापुर्वी गावाला ४ ते ५ दिवसाआड प्रत्येक प्रभागामध्ये … Read more

राहुरी येथे किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, गुन्हा दाखल 

Ahilyanagar News: राहुरी : आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करुन दगड व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तालुक्यातील वावरथ जांभळी येथे नुकतीच ही घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णा नामदेव हंडाळ (वय ३२) हे राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे राहत असून ते इलेक्ट्रीक मोटार बोअरवेलमध्ये सोडण्याचे काम करतात.  किरकोळ कारणावरून वाद आण्णा हंडाळ हे २९ जून रोजी … Read more