पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेवून सरकार पळ काढण्याच्या मानसिकतेत; विखेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेवून सरकार पुन्हा पळ काढण्याच्या मानसिकतेत दिसते. तसेच राज्यातील कोणत्याच प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारची नसते. अशी टिका माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राहाता येथील विश्रामगृहात जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी … Read more

कपड्याच्या दुकानांवर चोरट्यांनी नजर; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगावमध्ये कापड दुकान फोडून चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने शिव कलेक्शन हे कपड्याचे दुकान फोडून कपड्यांची चोरी केली. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, किरण गागरे यांचे … Read more

राहाता तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमधील 15 रिक्त जागांसाठी मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर अर्बन बँकेच्या पाठोपाठ आता नगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होत असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्ह्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान … Read more

तरुणावर घराचा दरवाजा तोडून डोक्यात तलवारीने वार ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पत्नीस गाडीचा कट का मारला अशी विचारणा करणार्‍या तरुणावर घराचा दरवाजा तोडून डोक्यात तलवारीने वार कारून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी राहता शहर पोलीस ठाण्यात परस्पर … Read more

किराणा आणण्यासाठी गेलेली ‘ती’ तरुणी घरी परतलीच नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- किराणा दुकानात जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली एक 20 वर्षीय तरुणी राहात्यातून बेपत्ता झाली आहे. धनश्री राजेंद्र विसपुते (वय 20) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी धनश्रीचे वडील राजेंद्र पंढरीनाथ विसपुते यांनी राहाता पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली … Read more

घरातून सोन्याचे दागिने चोरणारा अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील राजुर येथील एकाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीस राजूर पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी चांगुणा सुभाष नवाळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात आरोपीने चांगुणाबाई नवाळी यांच्या घराचा दरवाजा उघडुन घरातील बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी … Read more

दुर्दवी घटना ! अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर येथील दोन भावंडाचा निळवंडे जलाशयाच्या पुलाच्या खाली अंघोळीसाठी गेले असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समीर शांताराम पवार वय १४ आणि सोहम शांताराम पवार वय ११ रा. राजूर असे मृत्यू झालेल्या भावंडाची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, समीर व सोहम हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत कांदा 2200 तर सोयाबीन 6301 रुपये क्विंटल !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  राहाता बाजार समितीत काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 4225 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 1850 तर लाल कांद्याला 2200 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबिनला जास्तीत जास्त 6301 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 4 हजार 225 कांद्याच्या गोण्यांची … Read more

“कांद्याने केला, शेतकऱ्यांच्या वांदा”, वाऱ्याच्या लहरी प्रमाणे भाव बदलत असल्यामुळे शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्या ऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. कांदा हे नगदी पिक असले तरी तेवढेच बेभरवश्याचे आहे. मग ते उत्पादनात असो की दरामध्ये. गेल्या आठवड्यात कुठे दर स्थिर … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 69 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

या भागात भर दिवसा वाळूची अवैध तस्करी; कायद्याचा धाक उरलाच नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- शासकीय कारवाईचा धाक कुणालाही वाटत नाही यामुळे आजही भर दिवसा अवैध रित्या वाळू चोरली जात असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे. यातच संगमनेर तालुक्यातील बोटा-येलखोप परिसरातील कचनदी पात्रातून दिवसा-ढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र महसूल अधिकारी या उपशाविरुद्ध कारवाई मारत नसल्याचे दिसून … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले…वास्तव मांडतो म्हणूनच माझ्यावर टीका केली जाते

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- ‘आपण वास्तव मांडतो, त्यामुळे टीका केली जाते. आपली विधाने चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून व्हायरल केली जातात. उद्या हेच लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा,’ असे म्हणत इंदुरीकरांनी पुन्हा एकदा विरोधकांना फटकारले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील एका कार्यक्रमात इंदुरीकरांनी कीर्तनातूनच आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आपण खरे … Read more

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बेलापूर येथील आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर-ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते. सदर … Read more

नागरिकांनो लक्ष द्या…मास्क म्हणून रुमाल वापराल तर 500 रुपये दंड होणार

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. नुकतेच शासनातर्फे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसार मास्कऐवजी तोंड रुमालाने झाकल्यास तो मास्क म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तोंडावर मास्क न लावणारे, मास्कऐवजी रुमाल वापरणारे व्यक्तींवर ५०० रूपये दंड आकाराला … Read more

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव शहरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, गोटुंबे आखाडा (ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मच्छिंद्र परसराम पोकळे (रा. ओमनगर, कोपरगाव) यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. पोकळे यांनी कोपरगाव … Read more

विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर ऍट्रॉसिटीसह रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.26 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास विद्यालयातील विद्यार्थी मित्राचा वाढदिवस विद्यालयाच्या … Read more

महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्‍त फसवणूकीची होती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्‍त फसवणूकीची होती. भ्रष्‍टाचाराने सरकार पूर्णपणे बरबटले गेले आहे. कोणत्‍याही समाज घटकाला हे सरकार न्‍याय देवू न शकल्‍याने या सरकारने माफीनाम्‍याच्‍या जाहीराती प्रसिध्‍द केल्‍या पाहीजेत अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केली. महाविकास आघाडीला दोन वर्षे पुर्ण … Read more

आज ११२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ११२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more