श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाबाबत पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाला जवळपास दोन महिने उलटून गेली तरीदेखील पदभार स्विकारण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येतेय. राज्य सरकारला विश्वस्त मंडळात रस नसल्याचे यातून दिसून येत असून नुकतेच उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाच्यावतीने 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला आहे. पुढील सुनावणी 14 डिसेंबरला … Read more

श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदाची निवड आज पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती मिळावी म्हणून पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे अपील केले होते. मात्र शिंदे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज होणार आहे. पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष … Read more

जावयाला किडनी देऊन वडिलांनी वाचवले मुलीचे कुंकू ! अहमदनगर जिल्ह्यातील घटना…

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  नेवासे तालुक्यातील धामोरी (देवगड) या गावी राहणारे देवगड भक्त मंडळ परिवारातील धामोरी भजनी मंडळाचे अध्यक्ष यादव विठ्ठल पटारे (वय ४८) यांनी आपली स्वतःची किडनी दान करून जावयाचे प्राण मुलीचे कुंकू वाचवले. यादव पटारे यांचे जावई आनंद सोमनाथ जोगदंड (वय ३०) रा. बालाजीनगर, औरंगाबाद यांच्या वर्षांपूर्वी दोनही किडन्या खराब … Read more

कोपरगावचा पाणीप्रश्न आमदार आशुतोष काळेच सोडवणार

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  चाळीस वर्ष सत्ता भोगूनही ज्यांना कोपरगावचा पाणी प्रश्न समजला नाही त्यांना ५ नंबर साठवण तलावाचे महत्व मात्र समजले आहे. ५ नंबर साठवण तलावाबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आमदार आशुतोष काळे यांनी मिळविल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे … Read more

उन्हाळी कांद्याला राहाता बाजार समितीत मिळतोय ‘हा’ दर

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 2822 गोण्यांची आवक बुधवारी राहाता बाजार समितीत झाली. यामध्ये आवक झालेल्या कांद्यामध्ये प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 2500 तर लाल कांद्यालाही 2500 रुपये इतका भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव जाणून घेऊ… दरम्यान राहाता बाजार समितीत 2 हजार 822 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. … Read more

काळे – कोल्हे यांनी एकत्र येऊन कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- सुमारे तीस चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोपरगाव चे आजी माजी आमदार काळे कोल्हे यांनी सोडवावा असे कळकळीचे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोणतीही निवडणूक आली की कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्यावर व … Read more

साई संस्‍थानचे प्रसादालय कोव्‍हीडचे नियम पाळून भक्‍तांसाठी तातडीने सुरु करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  साईमंदिरात दर्शनासाठी ऑफलाईन पास उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या निर्णयाप्रमाणेच संस्‍थानचे प्रसादालय सुध्‍दा कोव्‍हीडचे नियम पाळून भक्‍तांसाठी तातडीने सुरु करावे अशी मागणी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे. यासंदर्भात कोव्‍हीड संकटानंतर प्रशासनाने राज्‍यातील मंदिर सुरु करण्‍याचा निर्णय घेतला होता. मात्र मंदिरात प्रवेशासाठी ऑनलाईन पासेसची सुविधा शिर्डी संस्‍थानने सुरु केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकला शेतात ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बडाळा महादेव येथील कैसर तय्यबजी फार्म येथे परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दावेद नागेय्या कंदामला, वय २८ रा. गजवेल, ता. सिद्धीपेठा, राज्य तेलंगणा या तरुणाच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२,२०१९ प्रमाणे खुनाचा गुन्हा … Read more

गाडीखाली कोंबडी चिरडून मेल्याने चालकाला जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर परिसरातील आठवाडी एकलहरे येथे कोंबडी मृत झाल्याने गाडी चालक गाडी बाहेर आला नाही म्हणून त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे परिसरात आठवाडी परिसरात एका गाडीखाली कोंबडी चिरडून मेली. तेव्हा … Read more

दर्शनासाठी ऑनलाईन पास भक्तांसाठी सुविधा नसून अडचणीची ठरली

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  शेकडो मैल दूर प्रवास करूनही शिर्डीत आल्यानंतर साईभक्तांना साईदर्शनासाठी प्रशासनाच्या कार्य विरोधात ठिय्या आंदोलन करून दर्शनासाठी विनवणी करावी लागते ही तर मोठी खेदजनक बाब आहेत. एकीकडे शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुललेली असताना दर्शन रांगा मात्र रिकाम्याच असतात. ऑनलाईन पास संकल्पना करोना महामारी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य असली तरी … Read more

परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून बनावट दारू केली जप्त

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी नेवासा, नेवासाफाटा, सलबतपूर व घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून बनावट दारू जप्त एली आहे. तसेच काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा फाटा येथील परवानाधारक … Read more

ज्वेलर्स शॉपच्या मालकाला अज्ञातांकडून दोन कोटींची खंडणीची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले यांना एका अज्ञाताने व अनोळखी व्यक्तीने मोबाइल नंबरवरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्वेलर्सचे … Read more

सोयऱ्या धायऱ्यांच राजकारण…घुलेंची कन्या होणार गडाखांची सून

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- बऱ्याच दिवसांपासून चर्चा असलेली नगर जिल्ह्यातील एक राजकीय सोयरिक अखेर जुळून आल्यामुळे जिल्ह्याच्या सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात आणखी नव्या समिकरणांची भर पडली आहे. त्यामळे येत्या विधानपरिषद निवडणुकीत नातेसंबंधांची झलक पाहायला मिळणार आहे. दरम्यान जिल्हा हा राजकीय सोयरीकमुळे नेहमीच चर्चेत राहिला असून आणखी एक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सोयरिक झाली … Read more

भाविकांसाठी महत्वाची बातमी ! साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी येथील श्री. साईबाबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांना दररोज १० हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध साईमंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन … Read more

सरकारच्या त्या एका निर्णयामुळॆ साईभक्तांना होतोय त्रास !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- निर्बंधांमध्ये शिथिलता आणत राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईमंदिरही भाविकांसाठी खुलं झालं आहे. मात्र असं असलं तरी राज्य शासनाच्या एका निर्णयाने साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन पासची सक्ती आणि १० वर्षांखालील बालकांना मंदिरात प्रवेश नसल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. … Read more

ahmednagar kanda bajar bhav : कांदा 3100 पर्यंत

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारच्या तुलनेत काल कांद्याच्या आवकेत 19 हजार गोण्या घट झाली तर जास्तीत जास्त भावात 100 रुपयांनी वाढ झाली. काल 41 हजार 372 गोण्या (22 हजार 709 क्विंटल) आवक झाली तर भाव 3100 रुपयांपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 3000 ते 3100 … Read more

परवानाधारक दुकांनामधील बनावट दारू विक्री संदर्भात उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी नेवासा, नेवासाफाटा, सलबतपूर व घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून बनावट दारू बाबत रविवारी रात्री एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने ही कारवाई केली. यात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सीलबंद बाटल्यांमधील … Read more

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला दोन कोटीची खंडणी मागितली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले,वय 42 वर्ष यांना काल एका अज्ञाताने अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. या खंडणीखोराने दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले. तसेच पोलिसांना … Read more