Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 101 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

वीज वितरणच्या आडमुठे धोरणाचा शेतकर्‍यांना बसतोय फटका

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- परतीच्या पावसाचा आधार मिळाल्याने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावातील काही भागात रब्बीची पिके येण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच एक समस्यां समोर येऊन उभी ठाकली आहे. पिंपरी निर्मळ परिसरात शेती वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसा वीज पुरवठ्याच्या आठ तासांत तासभरही वीज येत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिंपरी निर्मळ … Read more

निष्ठावंत शिवशाहिरीचा सूर्य अस्ताला गेला; माजीमंत्री कोल्हेंनी वाहिली पुरंदरेंना श्रद्धांजली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गड-कोट- किल्ल्यांचा इतिहास जीवंतपणे जाणता राजाच्या माध्यमातून निर्माण करण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने निष्ठावंत शिवशाहिरीचा सूर्य अस्ताला गेला, अशा शब्दांत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नाशिक येथे तत्कालीन खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या निवासस्थानी … Read more

विखे पाटील म्हणाले…महाराष्ट्राचा इतिहास जिवंत ठेवणारे शाहीर काळाच्या पडद्याआड गेले

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या शंभरीत त्यांची प्राणज्योत मालवली.पुरंदरे यांच्या निधनान महाराष्ट्राचा इतिहास जिवंत ठेवणारे शाहीर काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. … Read more

बळीराजावर पुन्हा संकट…ढगाळ वातावरणामुळे उभ्या पिकांना रोगांचा प्रादूर्भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्षे, गहू, हरभरा, बोर, तसेच कांद्याच्या पिकांना याचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातादरण याचा मोठा फटका पिकांना बसतो आहे. परिणामी उत्पादनात तर घट होणारच आहे पण पिकासाठी झालेला खर्चही काढावा कसा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान … Read more

‘त्या’ सभापतिपदाच्या निवडणुक स्थगितीबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी 18 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी संगीता शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केलेली सभापतिपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संगीता … Read more

पैसे भरूंनही भाविकांना मिळेना देवाचे दर्शन… शिर्डीतील धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने साई दर्शनासाठी दररोज फक्त पंधरा हजार भाविकांना दर्शनपास देण्याची सुविधा करण्यात आली आहे. ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करताना बँक खात्यातून पैसे तर गेले मात्र दर्शनाचा ऑनलाईन पास न मिळाल्याने त्रस्त झालेल्या भाविकांनी साईमंदिर परिसराचे प्रवेशव्दार क्रमांक चार समोर ठिय्या करत साईदर्शनाची मागणी केली. सोमवार सकाळपासून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- राहता तालुक्यातील वाकडी गावांमधील खंडोबा मंदिराच्याजवळ असलेल्या विहिरीत एका महिलेचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुजेता प्रकाश सुनार, वय 22 वर्ष, राहणार -वाकडी,तालुका -राहता (मुळ गाव -जिल्हा रकुम, नेपाळ) हि महिला बाथरूमला जाते असे सांगून घराबाहेर गेली. परंतु परत घरी आलीच नाही.त्यानंतर काल सकाळच्या सुमारास तिचे प्रेत … Read more

आज ५८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ३११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यातील या दुर्गम गावात 100 टक्के कोविड लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणुन प्रसिद्ध असणा-या अतिदुर्गम डोंगराळ भागातील घाटघर या गावाचे कोरोना लसीकरण १०० टक्के झाले आहे. विशेषबाब म्हणजे आदिवासी भागातील लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे पहिले गाव ठरले आहे. अकोले तालुक्यातील घाटघर हे भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे खेडे समजले जाते .त्यातच ग्रामिण भाग असल्याने … Read more

चक्क शिक्षकाने नर्सला मिठीत घेत केला विनयभंग ; नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- तु दुसऱ्याच्या गाडीवर रुग्णालयात का येते? मी तुला घरी नेवून सोडतो ना.! असे म्हणत एका शिक्षकाने परिचारीकेस कडकडून मिठी मारत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादिनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक संतोष भाऊराव धिंदळे (रा. केळुंगण, ता. अकोले) व अनिल भरत … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 97 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

मेंढपाळांना लोखंडी रॉडने मारहाण करून चोरट्यांनी ६२ हजारांचा ऐवज लांबवला

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-मोटार सायकलवरून घरी चाललेल्या दोघा मेंढपाळांना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करत ५० हजारांची रोकड व १२ हजार रुपये किमतीचे मेंढ्यांचे केस कापण्याचे मशिन असा ६२ हजार रुपयांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात घडली. याबाबत कृष्णा भाऊसाहेब सरक (रा. कोळपे आखाडा, नांदगाव शिवार, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस … Read more

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अकरा गावांतील रस्त्यांची दुर्दशा हटवणार : काळे

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांचा अनुशेष मोठा असून हां अनुशेष मोठा असला तरी तो भरून काढणे शक्य आहे. या अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवून नागरिकांना येणाऱ्या रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे … Read more

सुट्टीच्या दिवशी भाविकांच्या गर्दीने साई दरबार गजबजला

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-  शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांच्या गर्दीचा ओघ शनिवारी व रविवारी मोठ्या संख्यने असलेला दिसून आला. साई दर्शनासाठी ऑनलाईन पास असणे अत्यावश्यक केल्याने अनेक भाविकांना साईबाबांच्या समाधी दर्शनाऐवजी मंदिराचा कळस तसेच द्वारकामाई व चावडीचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. गेली दीड-दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे साईंचे दर्शन व आशीर्वाद न घेतल्याने … Read more

कट्टर विरोधक दिवाळी फराळ पार्टीला आले एकत्र… राजकीय तर्कवितर्कांना उधाण

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा बँकेेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हजेरी लावली. यावेळी दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या फराळाची ‘गोड’ चर्चा शहरात सुरू झाली आहे. माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी … Read more

Maharashtra weather news : राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता… तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 maharashtra weather news :-  राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानच्या सीईओ बानायत यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :-शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच नॅशनल ॲवार्ड ऑनलाईन प्राप्त झाला आहे. शनिवार, दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी उशिरा झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात हा पुरस्कार श्रीमती .भाग्यश्री बानायत यांना जाहीर करण्यात आला. लगेच ऑनलाईन प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले. नागपूर येथील रेशीम … Read more