विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी जेलभरो आंदोलन !

jailbharo

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, सबजेलसाठी जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. श्रीरामपूर … Read more

औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर बजरंग दलाच्या दोघांना टेम्पोने चिरडण्याचा प्रयत्न !

hit and run

गायींची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता गो-तस्करांनी त्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी रात्री राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील प्रज्वल दत्तात्रय चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी … Read more

झोळे येथील खुनाचा तपास लागला, प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून वृध्दाचा खून !

crime

संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृध्दाच्या खूनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा मृतदेह (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटेच्या … Read more

अखेर खंडकऱ्यांना जमिनी मिळाल्या, स्व. कॉ. गायकवाड व स्व. विखेंच्या संघर्षाला यश : मंत्री विखे

vikhe

खंडकरी आकारी पिडित शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला. स्व. कॉ. माधवराव गायकवाड तसेच स्व. माजी खासदार बाळासाहेव विखे पाटील यांच्या संघर्षाचे हे फलित असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कार अमृत २.० अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १७८.६० कोटीच्या या योजनेतील कामांचे भुमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्या … Read more

प्रवरा नदीतून जायकवाडीकडे २६८० क्युसेकने विसर्ग सुरु, भंडारदरा ९५ टक्के तर मुळा ८३ टक्के भरले !

mula bhandardara

नगर मधील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असून, भंडारदरा केंद्रात २४ तासांत अवघ्या १२ मिमी पावसाची तर रतनवाडीत २५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. भंडारदऱ्यातून २ हजार ४८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. तसेच निळवंडेचा जलसाठा ९१ टक्क्यांवर असून, त्यातून जायकवाडीकडे २६८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. मुळा … Read more

अजब ! पाहुण्याच्या हाताने साप मारण्याची परंपरा, रहिमपूर येथील शिंदे कुटुंबाला नाही साप मारण्याची मुभा

nagpanchami

साप म्हटला की, भीतीने भल्या भल्यांची गाळण उडते. घरात, परिसरात कुठेही साप निघाला, तर त्याला अनेक जण मारतात. मात्र, संगमनेर तालुक्यातील रहिमपूरमध्ये आढळलेल्या सापाला मारण्याची मुभा येथील शिंदे आडनावाच्या कुटुंबीयांना नाही. शिंदे आडनावाच्या घरी साप निघाला, तर त्याला मारण्यासाठी इतर आडनावाच्या व्यक्तीला बोलवावे लागते. त्यामुळे येथे पाहुण्यांच्या हातून साप मारण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील नोंदणीसाठी अधिक काम करण्याचा निर्धार, समितीची पहीली बैठक संपन्न !

ladaki bahin

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुका स्तरावरील अशासकीय सदस्यांच्या समितीची पहीली बैठक संपन्न झाली असून तालुक्यातील उर्वरित महीलांना योजनेचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या त्रुटी दूर करून शासकीय यंत्रणेद्वारे कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी करीता तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून संगमनेर विधानसभा समितीच्या अध्यक्ष पदावर शरद गोर्डे आणि समिती सदस्य … Read more

विरोधकांच्या खोडा घालण्याच्या प्रवृत्तीमुळे संधी मिळूनही तालुक्याचा विकास साधता न आल्याची खंत – आमदार गडाख !

shankar gadakh

राजकारण करताना विरोधकांनी तालुक्याच्या हिताला प्राधान्य देऊन विकासकामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबवावे, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारातील १६ कोटी रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरणचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी केले. सचिव … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील पिकांना आवर्तनाची गरज, धरणातून पाणी सोडल्याने आशा पल्लवित, विहिरी मात्र कोरड्या !

seti

श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने जे पेरले ते उगवेना, जे उगवले, ते आता तग धरेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आषाढ सरींनी पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यात अद्यापही पाहिजे असा दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरींची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरीही तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. … Read more

पालखेड धरणातून ७२३ क्युसेकने विसर्ग सुरू, ओव्हर फ्लोचे पाणी कोपरगावच्या पूर्व भागासाठी द्या – विवेक कोल्हे !

vivek

पालखेड धरण ६५ टक्के भरले असून, जवळपास ७२३ क्युसेकने ओव्हर फ्लो चालू आहे. कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागात पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे बंधारे आणि पाझर तलाव भरलेले नाहीत. त्यामुळे पालखेड अंतर्गत येणारे शिरसगाव, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, उक्कडगाव, दहेगाव बोलका, सावळगाव, तिळवणी, लौकी, भोजडे, दुगलगाव या भागातील शेतकरी पाण्यासाठी त्रासले आहेत. ओव्हर फ्लोच्या पाण्यातून … Read more

पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप परिसरात दहशत माजविणारा दुसरा बिबट्या जेरबंद !

bibatya

पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप, गुरेवाडी, भोरवाडी कन्हेर, या आदिवासी ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले केले आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्हसोबा झाप भागात मांडओहळ हे धरण व वनविभागाचे मोठे क्षेत्र असल्याने येथे बिबटे आहेत. बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वाढलेला वावर लक्षात … Read more

उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरकडूनच अत्याचार : श्रीरामपूरातली घटना !

atyachar

आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील एका मुलींच्या वसतीगृहावर असताना आजारी पडल्याने रेक्टर व मैत्रीण, अशा आम्ही तिघी … Read more

संघर्ष करीत माळेवाडी येथील शेतकऱ्याचा मुलगा ३७वी रँक घेऊन बनला पीएसआय !

sangram autade

श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनिल औताडे यांचा मुलगा संग्राम औताडे नुकताच एमपीएससी परीक्षेत ३७वी रॅक घेऊन उत्तीर्ण झाला असून त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरीपुत्र पीएसआय झाल्याने माळेवाडी ग्रामस्थांनी संग्राम औताडे यांची नुकतीच मिरवणूक काढली. आयुष्यभर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारे अनिल औताडे यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलने, उपोषण केल्याने त्यांच्यावर … Read more

दुष्काळी पट्टयातील गावांमध्ये निळवंडेच्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा : आ. बाळासाहेब थोरात !

nilvande

जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ओहरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायत भागातील सर्व बंधारे भरून घ्यावेत, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निर्माण केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणारे आहे. मागील आठवड्यात धरणाच्या … Read more

येणाऱ्या विधानसभेसाठी राहुरी मतदारसंघासह सहा जागांवर राष्ट्रवादीचा दावा, श्रीरामपुरातही तयारी !

ajit pawar gat

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला असून, उमेदवार कोणीही असो, पण तो अजित पवार गटाचाच असेल. यासंदर्भात मुंबई येथे चर्चा झाली असल्याची माहिती राहुरीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी दिली. भट्टड म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी अगोदर ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, ते मतदारसंघ अजित पवार गटालाच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट … Read more

लंकेची खासदारकी रद्द करावी विखेंची याचिका, औरंगाबाद खंडपीठाकडून खा. नीलेश लंकेंना नोटीस !

lanke vikhe

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्या. किशोर संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून … Read more

‘अपनी सरकार अच्छी सरकार’ हा संदेश प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी पोहोचावा : विजया रहाटकर !

politiks

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बुथ पासून ते सोशल मिडीयावर वैचारीक लढाई करावी लागणार आहे. लोकाभिमुख कामांमुळे महायुती सरकार सत्‍तेवर येणार असल्याने ‘अपनी सरकार अच्छी सरकार’ हा संदेश घरोघरी योजनांच्या माध्यमातून पोहचवण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे उत्‍तर नगर जिल्ह्याचे अधिवेशन राहता येथे संपन्न झाले. … Read more

माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, कंत्राटी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण !

marhan

श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा जमा करण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यास येथील श्रीराम मंदिरासमोरील डावखर चौकात एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून जबर मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याबाबत एकमत झाले. मात्र गुन्हा नेमका कोणी दाखल करायचा यावरून भिजत घोंगडे पडल्याने दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही. पालिकेच्या स्वच्छतेचा ठेका खासगी एजन्सीला देण्यात आला. या एजन्सीमार्फत सुमारे … Read more