प्रश्न मांडून सरकारविषयी बुद्धीभेद करणाऱ्यांचे मुद्दे खोडून काढा : डॉ. सुजय विखे !

sujay vikhe

सहकार समृद्ध होईपर्यंत्त दुधाच्या धंद्याचा प्रश्न अडचणीचा राहणार आहे. सहकाराशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे स्पष्ट करतानाच हा धंदा सहकाराकडून खासगीकडे कसा गेला? असा सवाल माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. श्रीरामपुर तालुक्यातील कडीत येथील एका खासगी दूध प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, जो उठतो तो दुग्धविकास मंत्र्यावर रोष … Read more

आदिवासी नृत्य पथकातील आदिवासी शेतकऱ्याचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू !

aksmat mrutyu

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये असलेल्या लव्हाळवाडी येथील एका आदिवासी शेतकरी तरुणाचा भंडारदरा धरणामध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण लव्हाळवाडीच्या आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या पथकातील प्रमुख कलाकार होता अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या लव्हाळवाडी येथील ज्ञानेश्वर देवु उघडे (वय ३८) या तरुणाचा भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये पाय घसरून पडल्याची घटना घडली असून … Read more

नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरातून जावी यासाठी पाठपुरावा करू : खा. वाकचौरे !

wakchaure

आगामी काळामध्ये नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर वरूनच जावी यासाठी आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजीत देशमुख, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, आर.बी. … Read more

भंडारदरा नगरीमध्ये वर्षा उत्सव सुरू, विकेंडचे औचित्य साधत भंडारदऱ्याला भरली पर्यटकांची जत्रा !

bhandardara

अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या निसर्गनगरीत पर्यटकांची जत्रा भरल्याचे शनिवारी व रविवारी दिसून आले. हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट दिली. भंडारदरा नगरीमध्ये सध्या वर्षा उत्सव सुरू असून वरुण राजा भंडारदऱ्यावर मेहेरबान झालेला आहे. १ जुनपासून भंडारदऱ्याला मान्सून दाखल झाला आणि निसर्गाने कात टाकली. डोंगररांगांनी हिरवळरुपी शाल परिधान केली असून डोंगरांच्या काळ्याभोर कातळावरून असंख्य धबधबे … Read more

मेहनतीने व कष्टाने पिकवलेले डाळिंब कठीण काळात देतेय शेतकऱ्यांना आधार !

dalimb

एकीकडे सर्व शेतीमालाचे भाव कोसळलेले असताना राहाता तालुक्यातील चितळी परिसरात डाळिंबाच्या बागा आजमितीला शेतकऱ्यांना कर्जाचे ओझे हलके होण्यास आधारवड ठरल्या आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात भूजल पातळीत घट झाली. याचा परिणाम डाळिंब बहरावर झाला. त्यामुळे फळाचा आकार आणि वजन अपेक्षित वाढले नाही. यामुळे डाळिंबाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले. असे असले तरी गत वर्षीच्या … Read more

नागरीकांनी पावसाळ्यातील झिका या डेंग्युसदृश आजारापासून सावधानता बाळगावी !

zika

टाकळीभान नागरीकांनी पावसाळ्यातील झिका या डेंग्युसदृश आजारापासून सावधानता बाळगावी व त्याची लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन माळवाडगाव व टाकळीभान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश लोंढे व डॉ. राम बोरुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पावसाळ्यात झिका आजार हा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या … Read more

नदीत वाहून जाणाऱ्या दोन भावांना साडीच्या आधाराने वाचविले, ताईबाईंच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक !

rescue

गोदावरी नदीच्या पाण्यात तीन सख्खे भाऊ वाहून जाताना काठावर जवळच शेळ्या चारणाऱ्या ताईबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाने तिसऱ्या भावाला वाचविण्यात अपयश आल्याची हुरहुर त्यांना कायम आहे. ताराबाई यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक दारणा धरण क्षेत्रात झालेल्या … Read more

आषाढी वारीच्या विशेष बसेसमुळे कोपरगाव आगाराला १९ लाखांचे उत्पन्न !

kopargaon busstand

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. कोपरगाव आगाराच्या एकूण ३० बसेस होत्या. त्या बसेसमधून ७ ते २१ जुलै या १४ दिवसात २१२ फेऱ्या झाल्या असून ११००० प्रवाशांकडून कोपरगाव आगाराला सवलतींसह एकूण १९ लाख ७ हजार ६४८ रुपये इतके उत्पन्न मिळाले, अशी माहिती आगारप्रमुख अमोल बनकर … Read more

श्रमिक मजदूर संघाच्या लढ्याला यश, पोषण आहार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ !

karmachari

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात श्रमिक मजदूर संघाच्या मानधन वाढीच्या मागणीला अखेर यश आले आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढीचा निर्णय ५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कमी पगारावर काम करणारे कर्मचारी म्हणजे शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी होय. ही योजना २००३ सालापासून सुरु झाली आहे. सुरूवातीला फक्त … Read more

वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी : डॉ. पिपाडा

गुन्हेगारीला

शिर्डी आणि परिसर गुन्हेगारीचा अड्डा झालेला असून चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. यामध्ये दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या चोऱ्यासह साई भक्तांकडील दागिन्यांच्या चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देवुन चोऱ्या व गुन्हेगारी कमी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना नुकतेच दिले. याबाबत दिलेल्या … Read more

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला, धरणाची पातळी ८० टक्क्यावर !

bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण ८० टक्के भरले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कोसळत असलेला पाऊस काही प्रमाणात ओसरला असल्याचे दिसून येत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मागील आठवड्यापासून अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. बुधवारी या भागाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारी दुपारनंतर भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस … Read more

श्रीरामपूर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्वधर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !

sarvadharm

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी प्रांताधिकारी किरण सावंत यांना सर्वधर्मीय धर्मगुरुंनी नुकतेच निवेदन दिले. श्रीरामपूर गुरुद्वाराचे धर्मगुरु बाबा मिस्किनजी, हनुमान मंदिर ट्रस्ट रेल्वे स्टेशन मंदिराचे हिंदू धर्मगुरु प्रल्हाद पांडेय, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अकबर अली, बौद्ध धम्म गुरु भन्ते मोगलयान, संत लोयला … Read more

महिलेने वाचविले दोघांचे प्राण, मंजूर येथून गोदावरी नदीपात्रात तरुण बेपत्ता, प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू !

nadi

दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊन नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी -हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५) नदीमध्ये गेले; मात्र पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये वाहून गेले असून पाण्याचा प्रवाह जास्त असून शोधकार्य सुरू असल्याचे … Read more

मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण !

mula dharan

अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचल्याने राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी ६ वाजता कोतूळ येथील पाण्याची आवक मंदावली असली तरी मुळा धरणात १२ हजार ९८० दशलक्ष घनफुट झाला असून धरण ५० टक्के झाले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड प्रमाणात तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढला. … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तीन, चार दिवसांपासून मुसळधार पाऊस, भातशेतीचे नुकसान !

paus

पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध दर असणाऱ्या घाटघर येथे अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळल्याने १४ इंच पावसाची नोंद झाली असून भंडारदरा धरण गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता ७६ टक्के भरले आहे. गुरुवारी दुपारनंतर पुन्हा पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र पावसाचे माहेरघर म्हणून समजले जाते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस … Read more

संगमनेर मधील हृदयद्रावक घटना, शेततळ्यात बुडून नातवासह आजोबाचा मृत्यू !

mrutyu

शेततळ्यात बुडाल्याने नातवासह आजोबाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातील पिंपळमळा परिसरात घडली. शिवाजी सोनवणे (वय ६६) व समर्थ नितीन सोनवणे (वय ३) असे मृत्यू पावलेल्या आजोबा व नातवाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल गुरुवारी दुपारी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील तळ्यालगत … Read more

पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार : सुनील गंगुले

kopargav talav

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटीची पाणी योजना आणली. त्यामुळे कोपरगावकरांची पाणी संकटातून मुक्तता करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. शहरातील नागरीक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची … Read more

मुसळधार पावसाने भंडारदरा परिसर झोडपला, धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ !

bhandardara

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अतिवृष्टी सुरूच आहे. मुसळधार पावसाने भंडारदरा धरणाचा परिसर झोडपून काढला असून पावसाचे तांडव सुरू असल्याने भंडारदरा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. २४ तासामध्ये भंडारदरा धरणात अर्ध्या टीएमसीपेक्षा जास्त पाण्याची आवक झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. प्रचंड वारा आणि पाऊस यामुळे भंडारदरा … Read more