बेलापूरसह, गळनिंब परिसरात मोबाईल हॅक करून पैसे उकळण्याचा प्रकार सुरूच !

haacking

श्रीरामपूर येथे अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हॅक करून पैसे उकळण्याचा प्रकार नुकताच समोर घडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंगणवाडी मदतनीस सेविकेच्या नावे बेलापूरसह गळनिंब गावामध्ये १० ते १२ महिलांना फेक कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील फसवणूकीची घटना ताजी असताना गळनिंब येथे एका महिलेला अंगणवाडी सोविका … Read more

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी पाटपाण्याचे नियोजन कोलमडले, पत्रकार खंडागळे, मुथा यांचा आरोप !

पाटबंधारे विभाग

पाटपाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी कोलमडले आहे. त्यामुळेच आज लाभक्षेत्राला पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. तसेच लाभक्षेत्रात व धरणाच्या पाणलोटात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या भासणार आहे. त्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारीच कारणीभूत असतील, असा आरोप बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व खजिनदार सुनिल मुथा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला … Read more

श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी रविवार बंदची हाक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे निदर्शन !

shrirampoor jilha

श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर काल सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आले. यावेळी रविवारी (दि.१४) स्वयंस्फूर्तीने श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंदराव आदिक यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही प्रत्येक श्रीरामपूरकरांचे स्वप्न आहे. … Read more

नगर जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासू देणार नाही, विवेक कोल्हे यांचे आश्वासन !

vivek kolhe

कोपरगावचे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासाला प्राधान्य दिले. तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खताचा तुटवडा भासू देणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन इफकोचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. तालुक्यातील कोपरगाव, शिंगणापूर रेल्वेस्टेशन येथे १२ वर्षापासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईट नुकताच नव्याने … Read more

साई संस्थानच्या सकारात्मतेमुळे २६७ कोटी रुपये खर्चुन निमगाव हद्दीत उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल सुरू !

sai sansthan

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने सकारात्मक पाऊल उचलून सुमारे २६७ कोटी रुपये खर्चुन निमगाव हद्दीत उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केली आहे. त्याबद्दल शिर्डी ग्रामस्थ, निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत तसेच निमगाव येथील जनसेवा युवक मंडळाच्या वतीने सरपंच कैलास कातोरे व कार्यकत्यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपकार्यकारी … Read more

संगमनेरमध्ये चेक न वटल्याने आरोपीस ६ महिन्यांची शिक्षा, शीतपेयाच्या खरेदीसंबंधी खटला !

kort kacheri

शीतपेयाच्या खरेदी पोटी व्यापाऱ्याला दिलेले ४ धनादेश न वटल्याने आरोपीस वेगवेगळ्या खटल्यामध्ये प्रत्येकी ६ महिन्यांची शिक्षा येथील न्यायाधीश गिरीश देशमुख यांच्या न्यायालयाने सुनावली आहे. रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून विविध शितपेये विक्रीसाठी … Read more

महसूल मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर गणोरे येथील शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित !

vikhe

अकोल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येऊन उपोषणकर्ते संदीप दराडे आणि शुभम आंबरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली. याप्रसंगी माजी आमदार … Read more

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटघर रतनवाडी जनजीवन विस्कळीत, घाटघरला नऊ इंच पावसाची नोंद !

ghatghar

अहमदनगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे घाटघरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटघर येथे नऊ इंच पावसाची नोंद झाली असून रतनवाडीला आठ इंच पाऊस पडला आहे. आजवरची पावसाळ्यात ही सर्वात मोठी आकडेवारी समोर आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा पाणलोट क्षेत्र म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते. मागील … Read more

तरुणीवर अत्याचार, नंतर केलं लग्न, विवाहानंतर गुंगीचे औषध देऊन दुसऱ्याकरवी अत्याचार.. अहमदनगरमधील खळबळजनक घटना

Ahmednagar Rape News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला व त्यानंतर लग्नही करण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला नंतर गुंगीचे औषध देऊन दुसऱ्याकरवी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तशी फिर्याद पीडित तरुणीने सोनई पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मुख्य आरोपी असलेल्या पतीच्या … Read more

दूध उत्पादकांच्या आंदोलनासाठी शेतकरी एकवटले, कोतूळ येथील धरणे आंदोलनाला पाठिंबा वाढला !

farmer protest

दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध … Read more

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या की, घातपात. काय आहे मृतदेहाचे अकोले कनेक्शन ?

ghatpaat

सप्तशृंगी गडावरील पाट झाडीत गुरुवारी (दि.४) रोजी एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतमालाच्या व्यापाऱ्याने या शेतकऱ्याचे अपहरण करून त्याचा खून केला असल्याचा आरोप शेतक-याच्या कुटुंबीयांनी केला आहे. जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने आपल्या कुटुंबियांना दबक्या आवाजात ऑडिओ व व्हिडीओ पाठवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली … Read more

अकोले तालुक्यात वरुण राजा बरसला, भंडारदऱ्यात धुव्वाँधार तर घाटघरला मुसळधार पावसाची हजेरी !

musaldhar paus

गेल्या २४ तासामध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणाच्या परीसरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्टयात पावसाचे तांडव सुरूच आहे. घाटघरला पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. सतत कोसळत असणारा पाऊस व प्रचंड धुके यामुळे घाटघर गाव धुक्यामध्ये हरवले … Read more

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

suiside

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील कनोली येथे समोर आली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. आपण फायनान्स कंपनीला पैसे दिले; मात्र … Read more

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरी द्या – खासदार भाऊसाहेब वाकचौरे 

bhausaheb vakchaure

१०२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटिश काळात मंजुरी मिळून, या रेल्वे मार्गासाठी भूमि अधिग्रहण करून माती भरावाचे काम देखील झालेले आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग … Read more

केवळ विरोधी पक्षातील आमदार आहे म्हणून…., आ. कानडेंनी अधिवेशनात मांडले गाऱ्हाणे !

lahu kanade

लोकप्रतिनिधी म्हणून आपण मंजूर केलेल्या कामाचे फलक लावून उद्घाटने खासदार अथवा अन्य पदाधिकारी करीत असल्याबद्दल आमदार लहू कानडे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी आ. कानडे म्हणाले की, माझ्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात केवळ विरोधी पक्षातील आमदार आहे म्हणून काही नवीन गोष्टी सुरू झाल्या आहेत. सभागृहात अंतरिम … Read more

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २ कोटी ४८ लाख रुपये वर्ग !

संजय गांधी निराधार योजना

राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना जून २०२४ अखेर २ कोटी ४८ लाख ४ हजार ८०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्यांना ७७ लाख ७६ हजार ६०० … Read more

नेवास्यामध्ये एट्रॉसिटीची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल !

atrocity

नेवासा येथे, लज्ज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन, एट्रॉसिटीची धमकी व शिवीगाळ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देखील नुकताच घडला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सचिन रतन धोंगडे या आरोपीविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तीच्या घरामध्ये सासु, पती, मुलगा, मुलगी असे … Read more

केंद्रीय मंत्रीअमित शहा आणि ना.विखेंच्या भेटीचे महत्व खा.लंकेना काय समजणार : भालसिंग

Ahmednagar News : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरात मध्ये अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायला प्रोत्साहन दिले.दूधाच्या प्रश्नाबबात मंत्री विखे पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट खा.लंकेना समजायला वेळ लागेल असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लगावला. दूध प्रश्नाच्या संदर्भात दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री … Read more