नेवासा तालुक्यात घराला आग लागून गॅस टाकीचा स्फोट, वृद्धेचा संसार उघड्यावर
नेवासा- तालुक्यातील भानसहिवरा गावात मारुती तळे वस्तीवर एक धक्कादायक घटना घडली. २५ मार्चला रात्री ८:३० वाजता घरी कोणीही नसताना अचानक आग लागली आणि गॅस टाकीचा स्फोट झाला. या घटनेत मोठं नुकसान झालं, ज्यामुळे ७७ वर्षीय द्वारकाबाई भणगे यांचा संसार उघड्यावर पडला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध महिलेची ही आपत्ती पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे. … Read more