भोंग्यावर टीका केल्याची शिक्षा ? अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकाराला घरासमोरच जबर मारहाण

श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर परिसरात १९ मार्च २०२५ रोजी एका वरिष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे. हल्ल्यामागचे कारण शांतता कमिटीच्या बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावर केलेली टीका असल्याचे समोर आले आहे. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत … Read more

कोपरगावच्या विजेचा प्रश्न मार्गी! २.६८ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीअंतर्गत २.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, तसेच नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. … Read more

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आरोपीस अटक !

अकोले, २० मार्च २०२५: महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंबड (ता. अकोले) येथील गवनेर सरोदे यास अकोले पोलिसांनी बुधवारी पहाटे पुण्यात अटक केली. अकोले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नरेंद्र रामभाऊ भोर (रा. आंबड) यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गवनेर सरोदे विरोधात विविध कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गोहत्येच्या आरोपाखाली ८ सराईत गुन्हेगार हद्दपार – नेमकं काय घडलं?

२० मार्च २०२५, नेवासे : महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी घातलेली असूनही, नेवासे येथील आठ सराईत गुन्हेगारांनी सातत्याने गोवंशाची कत्तल केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी … Read more

संगमनेर ब्रेकिंग : छत्रपती शिवाजी महाराज यांची कमान कोसळल्याने राज्यात संतापाची लाट !

फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची उभारलेली स्वागत कमान कोसळली असून यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला असल्याने राज्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून आयोजकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवप्रेमी व विविध … Read more

पोलिसांना घेऊन आरोपी पळाला! हवालदाराने उडी मारून वाचवले प्राण

श्रीरामपूर येथे एका संशयित वाहनाला अडवल्यानंतर वाहनचालकाने थेट पोलिस हवालदारालाच घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाला रोखले आणि तपासणीसाठी हवालदार आजिनाथ आंधळे त्यात बसले. मात्र, पोलिस ठाण्याकडे जाण्याऐवजी आरोपीने भरधाव वेगाने वाहन दुसऱ्याच दिशेने पळवले. संशयित वाहनचालकाने पोलिस ठाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने वाहन पळवले असता, गोंधवणी रस्त्याजवळील … Read more

शिर्डी विमानतळावर बिबट्यांची वस्ती ? वनविभाग आणि विमानतळ प्रशासनात गोंधळ

शिर्डी विमानतळ परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मादी बिबट्या दोन पिल्लांसह या भागात फिरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने मंत्रालयात वनविभागाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डी विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी नाशिक येथील मुख्य वनरक्षक कार्यालय तसेच कोपरगाव वनविभागाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वनविभागाकडून कोणतेही ठोस प्रत्युत्तर … Read more

कारखान्याच्या गट कार्यालयात बोगस डॉक्टरचा दवाखाना!

आश्वी, १९ मार्च २०२५ – कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसतानाही राजस्थानमधील एका बोगस डॉक्टरकडून आयुर्वेदिक उपचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या आश्वी विभागीय गट कार्यालयात अवैधरित्या दवाखाना सुरु केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. इम्रान अब्दुल खान (रा. भरतपूर, राजस्थान) आणि भरत मधुकर … Read more

शिर्डी : साई संस्थान पुन्हा एकदा चर्चेत ! आता झालाय हा मोठा घोटाळा ?

शिर्डीच्या साई संस्थानच्या कापड खरेदी प्रक्रियेवर मोठा वाद निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी या प्रकरणात अनियमितता असल्याचा आरोप करत निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, एका कंपनीने एकाच आडनावाच्या तीन पुरवठादारांना हमीपत्रे दिली असूनही संस्थानने त्यांना पात्र ठरवले. मात्र, संस्थानने हे आरोप फेटाळत योग्य पारदर्शकतेसाठी निविदा प्रक्रिया रद्द केल्याचा दावा … Read more

पत्नीची अदलाबदल करून अत्याचार ! अहिल्यानगर जिल्ह्यात लग्नाच्या नात्याला काळिमा

श्रीरामपूरमध्ये एका पतीने स्वतःच्या पत्नीची अदलाबदल करून तिच्यावर अत्याचार घडवून आणल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात पतीसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह एका व्यक्तीस अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेचा विवाह २०१४ मध्ये झाला. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच पतीने तिच्यावर मानसिक … Read more

बिबट्याचा शोध घेणाऱ्या ड्रोनचं गुपित उघडलं ! दहा किलोमीटर परिसरावर नजर

अहिल्यानगर (१८ मार्च २०२५) – जिल्ह्यातील मानव-बिबट्या संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, बिबट्यांना जेरबंद करणे वनविभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. पारंपरिक पद्धतीने पिंजरे लावून बिबट्यांचा शोध घेणे अनेकदा अपयशी ठरते. त्यामुळे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बिबट्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीममध्ये ‘थर्मल थ्रीटी’ ड्रोनचा समावेश केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांत हा ड्रोन रेस्क्यू टीमच्या … Read more

ढिसाळ नियोजनामुळे मुळाच्या आवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही : ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी

अहिल्यानगर : मुळा कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव, सामनगाव व मळेगावच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांचे भरणे बाकी असताना वरच्या भागातील मायनर उघडून टेलचे पाणी बंद करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असताना पैसे भरूनही हेडच्या पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची पाण्यासाठी … Read more

बचत गटाच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ उमेद मॉल’ उभारणार : ना.विखे पाटील

अहिल्यानगर : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद आणि … Read more

कीर्तनकारांच्या फोटो छेडखानीशी विशाल महाराज खोलेंचा संबंध नाही ; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून तपास सुरू

संगमनेर तालुक्यातील एका गावातील कीर्तनकारांच्या पत्नीच्या फोटोची छेडछाड करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाशी मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा संबंध नाही. याप्रकरणी आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीत चुकीने त्यांचे नाव छापून आले आहे. संगमनेर तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी कीर्तनसेवा करतात. १० मार्च रोजी दुपारी संबंधित कीर्तनकाराच्या मोबाइलवर एक आक्षेपार्ह फोटो अज्ञात … Read more

पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केली मारहाण

१५ मार्च २०२५ संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, राम आरगडे, मोहम्मद तांबोळी, राहुल जराड यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नगरपालिकेच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक आटोपून बाहेर आले असता छात्र भारती संघटनेचे अनिकेत घुले … Read more

अ. भा. संत साहित्य संमेलन होणार शिर्डीत

१५ मार्च २०२५ पंढरपूर : शिर्डी येथे जगभरातील लोक येत असतात. त्यामुळे सर्व ठिकाणी वारकरी साहित्याचा प्रसार व्हावा, यासाठी यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे १३ वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे २२ आणि २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वीस एकरांवर श्रीराम सृष्टी ! एतिहासिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले!

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना रामायणाच्या महान परंपरेची जाणीव करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ‘श्रीराम सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येऊन … Read more

लहान मुलांना होणारा पॅरामिक्झोव्हायरस विषाणू संसर्ग ; ‘एमएमआर’ लस हाच प्रभावी उपाय

१४ मार्च २०२५ संगमनेर : गालफुगी होणे किंवा गालगुंड हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्गजन्य आजार आहे.हा आजार पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होत असतो.ही लाळ ग्रंथी कानाच्या खाली आणि कानाच्या समोरच्या भागात असते. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होत असतो.हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायला … Read more