आघाडी कशीही लढो,आम्हाला चिंता नाही ! विखे पाटील यांचा आत्मविश्वास ; निगेटिव्ह नॅरेट अल्पकाळ टिकले

१३ जानेवारी २०२५ शिर्डी : विधानसभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला जनतेने नाकारले आहे.ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, त्याची आम्हाला चिंता नाही,अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य केले.शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.अधिवेशन स्थळाचा आज विखे पाटील यांनी आढावा घेतला.त्या वेळी ते बोलत होते. … Read more

सौंदाळा येथील महादेव मंदिरातून मूर्त्यांची चोरी

१३ जानेवारी २०२५ भेंडा : नेवासे तालुक्यातील सौंदाळा आणि परिसरात आजपर्यंत विविध ठिकाणी अनेक चोऱ्या झाल्या आहेत.त्यात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या, दुचाकी चोऱ्यांचा समावेश असून,अशा अनेक घटना घडत असतानाच चोरांनी महादेव मंदिरात गणपतीची मूर्ती आणि शिव लिंगावरील पार्वती माता या दोन मूर्तीची मंदिरातून चोरी झाली. या मूर्तीची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे व … Read more

आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

१३ जानेवारी २०२५ शिर्डी: लोकसभेला ४८ पैकी १७ जागा मिळून आपण काठावर पास झालो होतो; परंतु मनात मात्र नापास झाल्याची भावना होती. हे अपयश पुसण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम केले, म्हणून महायुती राज्यात विक्रमी २३७ जागा मिळवू शकली. यात महायुतीला ८२ टक्के मते तर भाजपला ८९ टक्के मते मिळाली.हा महाविजय जनता जनार्दनाबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे साकारला आहे.आता … Read more

संगमनेरसाठी इंटरचेंज प्रस्तावित करा ; आमदार सत्यजित तांबे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

१० जानेवारी २०२५ संगमनेर : नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करावा व इतर मागण्यांच्या संदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या घरात राहणाऱ्या २,५०० कुटुंबांना हक्काचं स्वमालकीचे घर मिळावे,यासाठी प्रधानमंत्री आवास … Read more

सुरेशनगरच्या सरपंचाचा ५ लाखांचा अर्थिक गैरव्यवहार ! अमृत उभेदळ यांचा आरोप; कारवाई न झाल्यास जलसमाधीचा इशारा

९ जानेवारी २०२५ कुकाणा : नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी पाच लाख १७ हजार ६४९ रुपये ग्राम पंचायतमध्ये कागदोपत्री दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत यावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमृत सुरेशराव उभेदळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.याबाबत … Read more

माजी मंत्री पिचडांमुळे अकोल्यात पाण्याची उपलब्धता

८ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मितीमध्ये माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही, तालुक्यात पाण्याची उपलब्धता देखील माजी मंत्री पिचड यांचे मुळेच झाली,असे मनोगत विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत स्व. पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याने … Read more

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला ! साईभक्तांबद्दल प्रचंड आदर : माजी खा. डॉ. सुजय विखे

८ जानेवारी २०२५ शिर्डी : साईभक्तांबद्दल मनात प्रचंड आदर आहे. आपण साईभक्तांमध्ये साईबाबांना बघतो, साईभक्तांविषयी मनात कधीच चुकीची भावना नसते, माझा आक्षेप साईभक्तांवर कधीच राहिला नाही. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मात्र, बाहेरून अनेक जण येतात शिर्डीत भिक्षेकऱ्यांचे सोंग घेऊन प्रसादालयात मोफत जेवतात आणि नशापाणी करून साईभक्तांना व नागरीकांना त्रास देवून गुन्हेगारी वाढवतात, त्यावर माझा … Read more

वकील हत्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येपूर्वीचे राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.सीसीटीव्ही फुटेजधमील आरोपींची ओळख पटली असून साक्षीदार अॅड. रामदास बाचकर यांची उलट तपासणी होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम व मनीषा आढाव खून खटल्याची … Read more

आमदारांकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; सोयाबीन नेणाऱ्या वाहनावर ३५ हजारांचा दंड केल्याने अधिकाऱ्याचा सत्कार करीत गांधीगीरी

८ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या प्रोड्यूसर कंपनीच्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नावाखाली सोयाबीनची गाडी पकडून ३५ हजार रुपयांचा दंड केला.ही बातमी कानावर येताच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरटीओ कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर घरले. जी तत्परता शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना दाखवली, त्याबद्दल उपस्थितांनी गांधीगिरी करीत … Read more

श्वानामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, पिंपरी लौकीतील घटना; बिबट्याचा धुमाकूळ सुरूच

७ जानेवारी २०२५ आश्वी : श्वानाचा पाठलाग करणे बिबट्याला चांगलेच महागात पडले आहे. श्वानाने चालाखी दाखवल्याने बिबट्या थेट शौचालयात जाऊन अडकला. त्यामुळे ‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’ याचा प्रत्यय आला. यानंतर शेतकऱ्याने बाहेर येत कडी लावली.ही घटना पिंपरी लौकी (ता. संगमनेर) येथे रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. पिंपरी लौकी परिसरातील देवीचा मळा … Read more

गोदावरी खोऱ्यात अतिरीक्त पाणी निर्माण करणार ; मंत्री विखे पाटील यांचा निर्धार

७ जानेवारी २०२५ राहाता : गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करून सिंचनासह दुष्काळी समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत, महायुती सरकारने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच चाऱ्यांच्या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक आणि … Read more

२० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात ; ज्येष्ठ साहित्यिक गडाखांची माहिती

७ जानेवारी २०२५ सोनई : जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक संमेलन शोध मराठी मनाचा येत्या (दि. १०) ते १२ जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात गडाख … Read more

स्मशानातील सोन्यासाठी राखेची चोरी ! कुळधरण परिसरातील घटना : विधीसाठी गेल्यानंतर प्रकार समोर

७ जानेवारी २०२५ कुळधरण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा प्रसिद्ध आहे. या कथेतील नायक स्मशानातील राख उकरून त्यातील सोनं काढून त्याची विक्री करत असतो.अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरातील एका गावात सोमवारी (दि.६) उघडकीस आला. स्मशानभूमीतील अस्थिराखेची सोन्यासाठी चोरी झाल्याची घटना या गावात घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत … Read more

प्रेम विवाहातून तरुणाचे अपहरण !

७ जानेवारी २०२५ अकोले : प्रेम विवाहाच्या कारणातून एका तरूणाचे तरुणीच्या नातेवाईकांनी अपहरण केले. मात्र मित्राने तत्परता दाखवत ११२ ला फोन केल्याने पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अपहृताला मारहाण करतांना पोलीसांनी आरोपीना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या व्हिडिओ … Read more

विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

घारगाव : विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगमनेरातील खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराज बाळू लेंडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीराज त्यांच्या विहिरीत पाय घसरून पडला. त्यानंतर … Read more

फेब्रुवारीत होणार शिर्डी महापरिक्रमा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची उद्घोषणा

शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिडी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

Ahilyanagar Breaking: राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षकांची आत्महत्या

राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा … Read more

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे अटकेत

शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर … Read more