लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन! आ.तांबेंची तत्काळ अंमलबजावणी,पहिल्याच रात्री रस्त्यांची स्वच्छता; नगराध्यक्षांसह नगरसेवक मैदानात

विजयाच्या सभेतून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत निर्देश देत शहरातील वर्षभर साचलेली घाण तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी सायंकाळी आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन कामाचा आराखडा ठरवला. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने रात्रीच युद्धपातळीवर काम सुरू केले. पालिका अधिकारी-कर्मचारी एकत्र येत शहरातील मुख्य लक्ष्मी रोडची मध्यरात्रीच साफसफाई करण्यात आली. … Read more

संगमनेरमधील म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईवरून राजकारण तापले:

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मात्र, स्थानिक भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडवले … Read more

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – डॉ.जयश्रीताई थोरात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉ. जयश्री थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

संगमनेर तालुक्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे शासनाने कोणतीही फार्सबाजी न करता त्वरित पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. सावरगाव तळ खांडगाव कवठे धांदरफळ यांचे पठार … Read more

संगमनेरच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार, विकासकामांसाठी ११ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर- तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या खोल्या बांधल्या जाणार आहेत. याशिवाय, नागरिकांना मूलभूत सुविधा देणारी अनेक … Read more

संगमनेर तालुक्यात या शुभ मुहूर्तावर होणार फक्त एक रुपयात विवाह, लग्न झालेल्या जोडप्यांना भेटणार खास गिफ्ट!

संगमनेर: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाने रविवारी संगमनेरात एक खास सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. खरं सांगायचं तर, हा विवाह अवघ्या एका रुपयात होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्वधर्मीय जोडपी एकाच मांडवात लग्नबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना जवळपास २५ हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून मिळणार आहेत. १५ एप्रिलपर्यंत नावनोंदणी … Read more

संगमनेरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांची फटकेबाजी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवले संगमनेरचे मैदान

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची उपस्थिती, संपूर्ण गजबजलेले मैदान, षटकारा – चौकारांची आतिषबाजी, आणि प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे ऐतिहासिक ठरलेल्या ऑस्ट्रेलिया इलेव्हन व संगमनेर इलेव्हन या संघांमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी षटकारा – चौकारांची आतिषबाजी करून मैदान गाजवले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन या संघाने 11 धावांनी विजय मिळवला. सहकारमहर्षी भाऊसाहेब … Read more

सहकार न्यायालय संगमनेरात आणा; आमदार खताळांच्या ‘या’ मागणीने वाढल्या अपेक्षा

संगमनेर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर राज्य शासनाचे लक्ष वेधत आमदार अमोल खताळ यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या विधानसभेत मांडल्या आहेत. यामध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्यांसाठी संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू करणे, पाणीपुरवठ्यासाठी टँकर मंजुरीच्या अटी शिथिल करणे, पोलिस वसाहतीची दुरुस्ती, औद्योगिक विकास आणि रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांमुळे स्थानिक जनतेच्या … Read more

पाणी हक्कासाठी संघर्ष! ग्रामस्थांनी थांबवलं निळवंडे कालव्याचं काँक्रिटीकरण

संगमनेर: निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम धांदरफळ खुर्द आणि गोडसेवाडी (ता. संगमनेर) येथे सुरू होते. मात्र, बुधवारी (१९ मार्च २०२५) स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे काम बंद पाडले. पोटचारी पूर्ण होईपर्यंत लाभक्षेत्रात काँक्रिटीकरण करू नये, कालव्यामुळे बंद झालेले ओढे आणि रस्ते पुन्हा खुले करावेत, तसेच ओढ्यांना पाणी मिळण्यासाठी व्हॉल्व्ह बसवावेत, अशा मागण्या ग्रामस्थांनी … Read more

संगमनेर ब्रेकिंग : छत्रपती शिवाजी महाराज यांची कमान कोसळल्याने राज्यात संतापाची लाट !

फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची उभारलेली स्वागत कमान कोसळली असून यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला असल्याने राज्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून आयोजकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवप्रेमी व विविध … Read more

बिबट्याचा शोध घेणाऱ्या ड्रोनचं गुपित उघडलं ! दहा किलोमीटर परिसरावर नजर

अहिल्यानगर (१८ मार्च २०२५) – जिल्ह्यातील मानव-बिबट्या संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, बिबट्यांना जेरबंद करणे वनविभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. पारंपरिक पद्धतीने पिंजरे लावून बिबट्यांचा शोध घेणे अनेकदा अपयशी ठरते. त्यामुळे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बिबट्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीममध्ये ‘थर्मल थ्रीटी’ ड्रोनचा समावेश केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांत हा ड्रोन रेस्क्यू टीमच्या … Read more

कीर्तनकारांच्या फोटो छेडखानीशी विशाल महाराज खोलेंचा संबंध नाही ; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून तपास सुरू

संगमनेर तालुक्यातील एका गावातील कीर्तनकारांच्या पत्नीच्या फोटोची छेडछाड करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाशी मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा संबंध नाही. याप्रकरणी आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीत चुकीने त्यांचे नाव छापून आले आहे. संगमनेर तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी कीर्तनसेवा करतात. १० मार्च रोजी दुपारी संबंधित कीर्तनकाराच्या मोबाइलवर एक आक्षेपार्ह फोटो अज्ञात … Read more

पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केली मारहाण

१५ मार्च २०२५ संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, राम आरगडे, मोहम्मद तांबोळी, राहुल जराड यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नगरपालिकेच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक आटोपून बाहेर आले असता छात्र भारती संघटनेचे अनिकेत घुले … Read more

लहान मुलांना होणारा पॅरामिक्झोव्हायरस विषाणू संसर्ग ; ‘एमएमआर’ लस हाच प्रभावी उपाय

१४ मार्च २०२५ संगमनेर : गालफुगी होणे किंवा गालगुंड हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्गजन्य आजार आहे.हा आजार पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होत असतो.ही लाळ ग्रंथी कानाच्या खाली आणि कानाच्या समोरच्या भागात असते. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होत असतो.हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायला … Read more

दोन दिवस दोन मंदिरात केली चोरी अन मुद्देमाल विक्रीसाठी निघाले अहिल्यानगरला मात्र पोहोचले भलत्याच ठिकाणी

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवादी येथील महालक्ष्मी मंदिरासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवीच्या मंदिरात चोरी करून देवाचे दागिने विक्री करण्यासाठी काळया रंगाच्या फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (एमएच ०४-एचएफ१६६१) मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे चोरट्यांची टोळी चालली होती. मात्र पोलिसांना याबाबत आगोदरच माहिती मिळाल्याने अहिल्यानगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर … Read more

दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे ! थोरातांच विखे पाटलांनी सगळंच बाहेर काढलं….

आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारी एक जमात संगमनेर शहरात कार्यरत आहे. अलिकडे या आंदोलन जीवी जमातीस जनता किंमत देत नाही म्हणून आता रिकाम्या झालेल्या माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारीही घेण्याचा धंदा सुरु केला असल्याची टीका महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात … Read more

संगमनेर-पारनेर MIDC ते आश्वी अपर तहसील प्रस्तावाला विरोध ! आमदार तांबे विधान परिषदेत…

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्यांचा औद्योगिक विकास आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मोठी एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) उभारावी, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली. संगमनेर-पारनेर औद्योगिक हब संगमनेर आणि पारनेर तालुके हे पर्जन्यछायेतील दुष्काळी भाग आहेत. तरीही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठ्या प्रमाणावर विकास साधला गेला आहे. … Read more

संगमनेर मतदारसंघात राबविणार आमदार आपल्या गावात अभियान

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : सर्वसामान्यांसाठी गाव पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात लवकरच ‘आमदार आपल्या गावात’ हे अभियान सुरु करणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.तालुक्यातील डिग्रस येथे एकलव्य जयंती व प्राथमिक शाळा खोली भूमिपूजन आ. खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हरी कोरडकर … Read more

‘नाशिक-पुणे रेल्वे’ला लोकप्रतिनिधींच्या एकीचे इंजिन ! प्रस्तावित बदलाला विरोध; कृती समिती स्थापन, पूर्वीप्रमाणेच कामाची मागणी

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : ‘पुणे-नाशिक : हायस्पीड रेल्वेमार्गा’ च्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गा’तील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले.या … Read more