आगामी निवडणुकांबाबत ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी. अशी घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भाजपाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील बोलता होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील कडाडून टीका केली … Read more

वीजचोरांवर महावितरणचा कारवाईचा बडगा; लाखोंची वीजचोरी झाली उघड

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- महावितरण कंपनीच्या बाभळेश्वर उपविभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने तीन ठिकाणी छापा टाकून 13 लाख 56 हजार 610 रुपयांची वीज चोरी पकडली. याप्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली चोरीची घटना :- श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे सोहम मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट येथे चोरून वीज वापरल्याप्रकरणी महाराष्ट्र … Read more

सोयाबीन मालाची गाडी लुटणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांकडून अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोयाबीनची पिकअप गाडी व रक्कम लुटल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून करून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचे 22 क्विंटल सोयाबीन जप्त केले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डोगर शेवली (ता. चिखली जि. … Read more

खुशखबर ! जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- देशासह राज्यातून कोरोना हळूहळू पायउतार होऊ लागला आहे. यामुळे निर्बंध देखील शिथिल करण्यात येत आहे. यातच नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या 24 तासात श्रीरामपूर शहर व तालुक्यात नव्याने एकही नवीन करोना रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाबाधितांची भर न पडल्याने तालुक्यातील … Read more

गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडाकेबाज कारवाई… लाखोंचा माल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्याचा धडाका सुरूच आहे. नुकतेच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अशीच एक कारवाई करत गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती समजली कि, गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी … Read more

आज ५७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत नगर जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-   शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यात येत आहे. यात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि कोपरगावचा समावेश आहे. … Read more

श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाचा निकाल राखीव ठेवला

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. मात्र सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्याबाबतचे अपिल उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली. पंचायत समितीच्या सभापती संगिता … Read more

दुचाकीस्वाराला मास्क पडला चार हजारांना… भामट्याने पोलीस असल्याचे भासवत लुटले

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- बाभळेश्वरकडून पिंपरी निर्मळला येताना एका दुचाकीस्वाराने पिंपरी निर्मळ येथील विना मास्क असलेल्या व्यक्तीला अडवत पोलीस असल्याचे सांगुन चार हजारांना गंडवले आहे. विशेष म्हणजे या भामट्याने दुचाकीस्वाराला नवा कोरा मास्क देखील दिला. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील एका जेष्ठ नागरिक बाभळेश्वरकडून दुचाकीवर विना मास्क घरी येत असताना … Read more

Ahmednagar Corona Update Today : 18-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात आज १०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

श्रीरामपूर तालुक्यात ‘या’ रोगराईने थैमान घातले

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- गेल्या वर्षभरातून अधिक काळ कोरोनाचे संकट देशासह जिल्ह्यात घोंगावत होते. याचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला असून नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात आता वेगळेच संकट निर्माण झाले आहे. श्रीरामपूर शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे चिकन गुणीया व गोचिड तापाचे रुग्ण मोठयाप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तातडीने फवारणी सुरू करावी, अशी मागणी … Read more

श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदाची निवड आज पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदाची जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती मिळावी म्हणून पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे अपील केले होते. मात्र शिंदे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज होणार आहे. पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांनी पक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकला शेतात ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बडाळा महादेव येथील कैसर तय्यबजी फार्म येथे परप्रांतिय तरुणाचा खून करुन मृतदेह फेकण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दावेद नागेय्या कंदामला, वय २८ रा. गजवेल, ता. सिद्धीपेठा, राज्य तेलंगणा या तरुणाच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२,२०१९ प्रमाणे खुनाचा गुन्हा … Read more

गाडीखाली कोंबडी चिरडून मेल्याने चालकाला जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर परिसरातील आठवाडी एकलहरे येथे कोंबडी मृत झाल्याने गाडी चालक गाडी बाहेर आला नाही म्हणून त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे परिसरात आठवाडी परिसरात एका गाडीखाली कोंबडी चिरडून मेली. तेव्हा … Read more

ज्वेलर्स शॉपच्या मालकाला अज्ञातांकडून दोन कोटींची खंडणीची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले यांना एका अज्ञाताने व अनोळखी व्यक्तीने मोबाइल नंबरवरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्वेलर्सचे … Read more

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला दोन कोटीची खंडणी मागितली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले,वय 42 वर्ष यांना काल एका अज्ञाताने अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. या खंडणीखोराने दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले. तसेच पोलिसांना … Read more

‘त्या’ सभापतिपदाच्या निवडणुक स्थगितीबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी 18 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी संगीता शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केलेली सभापतिपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संगीता … Read more

आज ५८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ३११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more