आज ११२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ११२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आचासंहिता लागू ! नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी हटवली राजकीय प्लेक्सबाजी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  कर्जत नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया जाहीर होवून आचासंहिता लागू झाली. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी कर्जत शहरातील मेन रोड व इतरत्र असलेले सर्व राजकीय पक्षाचे फलक, झेंडे हटवले आहे. दरम्यान तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कर्जत नगरपंचायतच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांवर … Read more

रोहित पवारांनी तीन वेळा केलीय भलतीच चूक ! भाजप नेत्याने केले गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोना कालावधीत नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कर्जत जवळ बिबट्याचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील रजपूतवाडी शिवारातील बुवासाहेब मळा याठिकाणी आज बिबट्याचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मरण पावलेला बिबट्या याचे वय अंदाजे चार वर्ष असावे, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली दिसून येते त्याच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक आहे. त्याला कोठेही जखम झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत … Read more

बोगस बियाणांचा शेतकऱ्याला फटका… 25 लाखांचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना तयार झालेल्या डाळिंबाच्या बागेवर फवारणी करण्यासाठी दिलेल्या बनावट औषधामुळे 9 एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उद्वस्त झाली असून शेतकर्‍यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथे घडला आहे. या प्रकरणी प्रकाश गावडे व विनोद गावडे या शेतकर्‍यांनी तक्रार दाखल केली आहे. … Read more

चोरीच्या प्रयत्नात असलेल्या महिलांचा कट कर्जत पोलीस पोलिसांनी उधळून लावला

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील आठवडे बाजारात मुख्य रस्त्यावर प्रसिद्ध असलेल्या चिंचेच्या झाडाखाली भाजी विक्रेते व इतर साहित्य विक्रेत्यांजवळ काही ग्राहक व महिला भाजीपाला खरेदी करत असताना या महिलांभोवती घोळका करून व त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्याजवळ असणाऱ्या पर्स व पिशवीत हात घालून चोरीचा प्रयत्न करताना चार महिला आढळल्या. … Read more

प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  कारवाईसाठी गेलेल्या कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता या प्रकरणी कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि कर्जतचे … Read more

चक्क पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रांताधिकार्‍यांना शिवीगाळ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना पोलीस कर्मचारी वाळू तस्कर केशव व्हरकटे याने शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने … Read more

आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतर जल्लोष करायचा; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- कृषी कायद्याविषयी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याच निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. यावर बोलताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचे मनापासून स्वागत … Read more

अरे बापरे! वाळूतस्कर पोलिसाकडून प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- एका वाळू तस्कर असलेल्या पोलिसाने कर्जतचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना कर्जत शहरात शिवीगाळ करत ट्रक पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद तलाठी यांनी दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी सकाळी सवा सात वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकारी डॉ .अजित थोरबोले यांनी तहसिलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी बाळासाहेब … Read more

काय सांगता : ‘या’ बाजार समितीच्या मतदार यादीत अनेक नावे बोगस

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  सध्या बाजार समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीवर आपलेे वर्चस्व स्थापन करण्यासाठी अनेक पुढारी प्रयतनशील आहेत. मात्र कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादीत ३० ते ४० टक्के बोगस मतदार हमाल -मापाडी व व्यापारी मतदार यादीमध्ये घुसविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप हमाल -मापाडी संघटने निवेदनाद्वारे … Read more

आज ५७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

सावकाराने लिहून घेतलेली शेतकऱ्याची जमीन पोलिस निरीक्षकांमुळे मिळाली परत

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  ‘व्याजाच्या पैशांच्या बदल्यात तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावे लिहून घेत अनेक खाजगी सावकार गब्बर झाले.यात अनेकांचे संसार धुळीस मिळाले,मुलांच्या शिक्षणाबरोबरच कुटुंबाचीही वाताहत झाली. या सगळ्या चक्रव्यूहात कर्जतच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार चंद्रशेखर यादव यांनी स्विकारला अन् सावकारांना लगाम बसला.सावकारांनी व्याजात हडपलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळू लागल्या.यामुळे … Read more

Ahmednagar Corona Update Today : 18-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात आज १०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो असे सांगून आर्थिक फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-सोशल मीडियातून ओळख निर्माण करत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघड आली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथे नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांची ही फसवणूक झाली असून याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुलकुमार श्रीधर राऊत (मुळगाव गडहिंग्लज,कोल्हापुर) सध्या नोकरीनिमित्त (रा.राशीन ता. कर्जत) … Read more

मालकास मोबाईलवर सुसाईड नोट पाठवत 27 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  युवकाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे घडली आहे. गोविंद सटाले (वय 27 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने निमगाव गांगर्डामध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दरम्यान गोविंद हा नगर येथे नोकरी करत होता. त्याने आपल्या मालकास … Read more

कृषी सेवा केंद्राचे कुलूप तोडले मात्र काहीच चोरी गेले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच सोमवारी रात्री चोरट्यांनी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे ॲग्रो एजन्सी दुकानाचे कुलूप तोडले.याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, त तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे प्रमोद … Read more

कर्जत तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…रात्रीतून अनेक घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास चार ठिकाणी कुलपे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आसिफ सय्यद यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील एलसीडी टीव्ही व रोख रक्कम व इतर साहित्य … Read more