बोगस बियाणांचा शेतकऱ्याला फटका… 25 लाखांचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना तयार झालेल्या डाळिंबाच्या बागेवर फवारणी करण्यासाठी दिलेल्या बनावट औषधामुळे 9 एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उद्वस्त झाली असून शेतकर्‍यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथे घडला आहे. या प्रकरणी प्रकाश गावडे व विनोद गावडे या शेतकर्‍यांनी तक्रार दाखल केली आहे. … Read more

नवीन नियमानुसार ‘या’ तालुक्यातील नगरसेवकांची संख्या वाढणार…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शासनाच्या नवीन नियमानुसार जामखेड नगर परिषद निवडणूकीत २१ ऐवजी १२ प्रभाग तर २१ ऐवजी ३ जाग वाढून २४ नगरसेवक निवडले जाणार आहे. वाढत्या संख्येमुळे आता इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. दरम्यान नगर परिषद निवडणुकीबाबत शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिकांची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार … Read more

विजेचा जोराचा धक्का बसून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- एका तरूण शेतकऱ्याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली आहे. नाजीम पापा देशमुख (३२ वर्षे) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नाजीम देशमुख हे बारागाव नांदूर गावातील अल्पभुधारक शेतकरी होते. त्यांच्या पत्नी, आई व मुले हे लग्नासाठी परगावी गेले … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात: कोरोनाच्या संकटात देखील सरकारने ‘ती’ परंपरा कायम ठेवली

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राला मोठा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, प्रगल्भ महाराष्ट्र घडविण्याचे काम संतांनीच केले आहे. त्याच भक्तिमार्गाच्या वाटेवरून चालत ही परंपरा जोपासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. त्यामुळेच राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले असतानाही यावर मार्ग काढत पालखी सोहळ्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारने खंडित होऊ दिली नाही. असे … Read more

मोटारसायकल अपघातात ७ जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे राहुरी मांजरी रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या जोरदार धडकेत सात जण जबर जखमी झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरडगाव परिसरात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या अपघातात मानोरी येथील अक्षय आढाव, ऋतुराज काळे, मयूर मोरे हे मानोरीकडे … Read more

आठवडे बाजार सुरू करण्यासाठी ‘या’ नगरपालिकेच्या गेटला ठोकले कुलूप !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आठवडे बाजार सुरू झालेले असताना देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार सुरू न केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेटला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यभरातील सर्वच ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी ! या’ रोडवरील घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भरधाव वेगात असलेल्या ट्रकची समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर दौंड महामार्गावरील मढेवडगाव शिवारात घडली. अर्जुन भीमा ढवळे असे या अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळे दाम्पत्य … Read more

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री … Read more

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 115 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

मोठी बातमी ! शेवगाव बाजार समिती संचालकांचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय विश्वनाथ शिंदे (वय 52, रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) यांचे एक अपघातात निधन झाले आहे. हा अपघात आज रविवारी पहाटेच्या सुमारास घटला. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगरहून शेवगावकडे जात असतांना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटून बोलेरो … Read more

पत्रकार परिषदेनंतर सरपंच अन ज्येष्ठ नेते एकमेकांशी भिडले… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पत्रकार परिषदेनंतर चहापाना प्रसंगी किरकोळ कारणावरून एकापक्षाचे युवा सरपंच व ज्येष्ठ नेते आपसातच भिडल्याची घटना समोर येत आहे. दरम्यान हि घटना पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्टँड जवळच्या एका हॉटेलमध्ये घडली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, एका पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मिरी येथे एकत्र आले होते. … Read more

‘या’ ठिकाणी ‘द बर्निंग ट्रक’चा थरार नागरिकांच्या सतर्कतेमुळे चालक – सहचालक बचावले

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा शिवारात पहाटे राजस्थानवरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेल्या ट्रकने पाठीमागील बाजूने वायरींगचे शॉटसर्किट झाल्याने अचानक पेट घेतला. जवळच्या वस्तीवरील नागरिकांनी प्रसंगावधान राखून बेलवंडी पोलिसांना तात्काळ खबर दिल्याने पोलिस घटनास्थळी आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक विझविण्यात … Read more

माजी आ.औटी म्हणतात : आम्ही सोयीचे राजकारण करणार भलेही हातात तलवार…!

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आमच्या तालुक्यात आम्ही सोयीचे राजकारण करणार भलेही तलवार हातात घ्यावी लागली तरी चालेल. संघर्ष भयानक झाला असून मतदार संघ वाचविण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. राजकारणात उलथापालथ चालू असते परंतु या सर्व सामान्य जनतेसाठी रक्ताचा थेंब असे पर्यंत काम करणार असल्याचे मत माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले. … Read more

‘त्या’ तालुक्यात परत बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर शिवारातील कळसपिंप्री व सोनोशी या गावांच्या शिवारात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिसून आला आहे. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास दोघा शेतकऱ्यांनी सोनोशी फाटयाजवळ बिबट्या पाहिला. नागरिकांनी बिबट्याचे छायाचित्र काढले असून, वनविभागाने दखल घेण्याची मागणी केली आहे. परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे … Read more

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघंाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहराजवळील घोडेगाव रोडवर आंबील ओढा परिसरात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची व दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात राशीन येथे आरोग्य सेवक म्हणुन सेवेत असलेले नवनाथ विठ्ठल काशीद (वय- ३४) हे जागीच ठार झाले. तर निमगाव खलु येथील … Read more

पोलिसांस धक्काबुक्की करून कामात अडथळा आनला : न्यायालयाने दिली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- न्यायालयाचे वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) याला ३ वर्ष सक्­तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड,दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एन.राव यांनी सुनावली आहे. याबाबत अणिक माहिती अशी की, पोलिस कर्मचारी … Read more

विरोधक तुम्हाला देखील हिशोब मागतील: आमदार राजळे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव -पाथर्डी विधासभा मतदार संघात विकासात्मक कामे केली. त्याचा बाराशे कोटीचा हिशोब मला विरोधक मागत आहेत. शहराच्या पिण्याच्या पाणी योजनेसह सव्वाशे कोटीचा निधी पालिकेला विकासकामासाठी मिळालेला आहे. तुम्हालाही सव्वाशे कोटीचा हिशोब मागतील तेव्हा हिशोब चांगला करून ठेवा असा टोला आमदार मोनिकाताई राजळे यांनी विरोधकांना लगावला आहे. येथील एका … Read more