मालकास मोबाईलवर सुसाईड नोट पाठवत 27 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  युवकाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे घडली आहे. गोविंद सटाले (वय 27 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने निमगाव गांगर्डामध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दरम्यान गोविंद हा नगर येथे नोकरी करत होता. त्याने आपल्या मालकास … Read more

चुकीच्या पद्धतीने रद्द केलेल्या निविदा प्रकरणी झेडपीसमोर उपोषण करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाच्या निविदा चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांसह झेडपी सदस्य हर्षदा काकडे यांनी मंगळवार (दि.23) रोजी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव व … Read more

विहिरीत पाणी आहे परंतु वीज मिळत नसल्याने शेतकरी झाले हतबल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजीमधील मिरी परिसरातील गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून शेती पंपाच्या विजेचा तांत्रिक बिघाड झालेला आहे. यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी मिरी सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शिराळचे उपसरपंच हनुमंत घोरपडे, गितेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे, डमाळवाडीचे सरपंच रामनाथ शिरसाठ यांच्यासह सुमारे 30 ते 40 शेतकर्‍यांनी सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन केले. या … Read more

शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हरवलेत…सापडून देणाऱ्यास बक्षीस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक हरवले असून यामुळे शेवगाव शहरातील नागरीसुविधेची कामे ठप्प झालेली आहेत. यामुळे हे अधिकारी कार्यालयात सापडून देणा-यांस मनसेच्या वतीने १००० रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. शेवगाव नगरपरिषदेत सध्या मुदत संपल्यांने प्रशासक असुन त्यांचे देखील नगरपरिषदेच्या कामकाजाकडे लक्ष नाही. मुख्याधिकारी गर्कळ यांची बदली झाल्यानंतर प्रभारी … Read more

अपहरण झालेल्या १६ वर्षीय तरुणीचा तपास लागेना.. आई काय म्हणाली ते बघा…

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  राहुरी पोलिस ठाणे हद्दीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. सदर घटने बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले. मात्र अद्याप सदर मुलीचा काही तपास लागला नाही. त्या मुलीचे आई वडील पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारत असून १९ नोव्हेंबर रोजी ते आमरण उपोषण सुरू करणार आहेत. दिनांक … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 101 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कृषी सेवा केंद्राचे कुलूप तोडले मात्र काहीच चोरी गेले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच सोमवारी रात्री चोरट्यांनी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे ॲग्रो एजन्सी दुकानाचे कुलूप तोडले.याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, त तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे प्रमोद … Read more

कर्जत तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…रात्रीतून अनेक घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास चार ठिकाणी कुलपे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आसिफ सय्यद यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील एलसीडी टीव्ही व रोख रक्कम व इतर साहित्य … Read more

दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडली आहे. या अपघातात अक्षय आंधळे, रा. कडा व सुनिल राऊत, रा. पारेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनिल यादव यांना घटनेची माहिती होताच त्यांनी खासगी ॲम्ब्युलन्समधून जखमींना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात … Read more

आज ५८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४८ हजार ३११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 97 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..भविष्यात कर्जतमध्ये एमआयडीसी होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-  कर्जत येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांचे भरभरून कौतुक केले. सरकार अडचणीत असतानाही कर्जत – जामखेडला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन कोट्यवधीची कामे सुरू करण्यात आली आहेत. येथे केवळ … Read more

त्याच्या दर्शनाने नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळाले…घराबाहेर निघणे झाले मुश्किल

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील कमालीची भीती पसरू लागली आहे. बिबट्याचा दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहे. नुकतेच बिबट्याने पारनेर तालुक्यात दर्शन दिल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. पारनेर तालुक्यातील अस्तगाव शिवारात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून गावकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे. … Read more

Maharashtra weather news : राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता… तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 maharashtra weather news :-  राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 71 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

रोहित पवार शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देतायत… मंत्र्यांपुढे शिवसैनिकांचा तक्रारीचा पाढा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप कर्जत येथील शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला. तसेच यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये होत असलेल्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार टाकला. कर्जत येथे शनिवारी सकाळी तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांची तालुका प्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार … Read more

अजित पवार संतापले… म्हणाले रोहितला त्रास नको म्हणून ऐकून घेतोय, नाहीतर हिसका दाखविला असता

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी भाषण करत असताना अजित पवार काहींवर चांगलेच संतापले होते. यावेळी त्यांनी आपल्या शैलीतच समोरील व्यक्तींना चांगलेच खडेबोल सुनावले होते. भाषण सुरू असताना समोर उपस्थितांमधून काही जण विविध मागण्या व सूचना … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले… मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका आयोजित कार्यक्रमात सुजय विखे यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण. मला काही फरक पडत नाही, कारण मी कुणाला खातच नाही अन् कुणाला मोजतही नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले. विखेंच्या … Read more