Akole News : काजवा महोत्सवावर पावसाचं संकट ! निसर्गाचा चमत्कार यंदा फसला

Akole News : अकोले तालुक्यात मान्सूनपूर्व आणि अवकाळ्या पावसामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, यंदा पर्यटकांना भंडारदरा परिसरात काजव्यांचे नेत्रदीपक दर्शन अजूनही घडलेले नाही. यामुळे हजारो पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. काजवे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई अभयारण्य परिसरात हजारो काजवे … Read more

संगमनेरमधील म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईवरून राजकारण तापले:

संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मात्र, स्थानिक भाजप व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडवले … Read more

Kopargaon News : लग्नात परवानगीशिवाय वाजवला बँड ! पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Kopargaon News : कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयासमोर शनिवारी (दि. २४ मे २०२५) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोणतीही परवानगी न घेता बँड वाजवण्याच्या घटनेने स्थानिक पोलिसांना कारवाईसाठी भाग पाडले. या प्रकरणी शहर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणासह शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँड चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत, शिरजगाव (ता. येवला) येथील रहिवासी लक्ष्मण दौलत सोनवणे यांनी … Read more

जायकवाडी सारखं धरण उशाला असतांना शेवगावकरांच्या घशाला मात्र कोरड, शहराला पंधरा दिवसातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक आक्रमक

Ahilyanagar News: शेवगाव- पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. शहराला सध्या १२ ते १५ दिवसांतून एकदा आणि तेसुद्धा अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम आणि नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी (दि. ५) क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणीपुरवठ्यासह शहरातील अन्य समस्यांवर नागरिकांनी आक्रमक पवित्रा … Read more

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – डॉ.जयश्रीताई थोरात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉ. जयश्री थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

संगमनेर तालुक्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे शासनाने कोणतीही फार्सबाजी न करता त्वरित पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. सावरगाव तळ खांडगाव कवठे धांदरफळ यांचे पठार … Read more

आधी घरावर पडत होते अचानक दगड, सीसीटीव्ही बसवताच दगड थांबली अन घडू लागला भलताच प्रकार ; संपूर्ण कुटुंबच नव्हे तर ग्रामस्थ देखील झालेत हैराण !

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात रात्री तसेच दिवसा देखील चोरीच्या घटना घडत आहेत . त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत. मात्र आता जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावात अत्यंत विचीत्र प्रकार घडत आहे. यामुळे ते कुटुंबच नव्हे तर आसपासचे शेजारी तसेच पोलीस देखील या अनोख्या प्रकाराने चक्रावून गेले आहेत. पाहूया नेमका काय प्रकार घडत आहे, श्रीरामपूर … Read more

अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात ; मात्र दोन डोंगर जळुन खाक

अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे … Read more

अकोल्याच्या महिलेला साईबाबा पावले अन् दृष्टीहीन महिलेला मिळाली नवी दृष्टी साईसंस्थानच्या आयबँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकताच सुरू झालेल्या अत्याधुनिक आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. त्या नेत्रदानाच्या माध्यमातून काल संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सौदामिनी निघुते व त्यांच्या … Read more

साईसंस्थानकडून भक्तांसाठी चॅटबॉट डिजिटल सेवा सुरू : मात्र भक्तांमध्ये काय आहेत चर्चा सुरू ?

अहिल्यानगर : देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानतर्फे भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. संस्थानच्या ऑनलाईन सेवा अधिक सुलभ करण्यासाठी स्वतंत्र आयटी विभाग कार्यान्वित असून, आता चॅटबॉट ही डिजिटल सेवा भक्तांसाठी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (२७ मार्च) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत या सुविधेचे लोकार्पण करण्यात … Read more

Ahilyanagar News :दोन गटात हत्याराने हाणामाऱ्या , दोघे गंभीर, अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना…

दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत २ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात बुधवार दि.२७ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नुकतेच कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन … Read more

श्रीरामपुरात रेल्वेची अतिक्रमण हटवण्याची तयारी, नागरिकांना नोटीसा तर काहींची न्यायालयात धाव

श्रीरामपूर- शहरात अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाने आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्यानंतर आता रेल्वे प्रशासनही या कामाला लागले आहे. रेल्वेने यापूर्वीच अतिक्रमणांबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे अनेकांना आपली घरे आणि व्यवसाय धोक्यात येण्याची भीती वाटत आहे. दुसरीकडे, आपली जागा कायदेशीर असल्याचा दावा करत आणि … Read more

संगमनेरच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार, विकासकामांसाठी ११ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर- तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या खोल्या बांधल्या जाणार आहेत. याशिवाय, नागरिकांना मूलभूत सुविधा देणारी अनेक … Read more

कोपरगावमधील २.६० कोटींच्या विकासकामांना मान्यता, शहरातील या भागातील कामे होणार पूर्ण!

कोपरगाव- शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३-२४ अंतर्गत शहरातील विविध विकासकामांसाठी २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतची माहिती खुद्द आ. आशुतोष काळे यांनी दिली. या निधीतून शहरातील रस्ते, गटारे आणि पेव्हर ब्लॉक बसवण्यासारखी अनेक … Read more

श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी, अत्याचार प्रकरणी ३६ तासांत दोषारोपपत्र सादर! काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर!

श्रीरामपूर- शहरात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. मिल्लतनगर पुलावर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी ऊर्फ अफ्फान (वय २४, राहणार फातिमा हाय सोसायटी, वॉर्ड नं. ०१, श्रीरामपूर) याला अटक केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी … Read more

प्रवरा नदीवर बांधलेल्या पाच बंधाऱ्याचे शालिनी विखे यांच्या हस्ते जलपूजन

शिर्डी- प्रवरा नदीवर बांधलेल्या वसंत बंधाऱ्यांनी या भागाला खूप मोठा आधार दिला आहे. हे बंधारे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचं फळ आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मेहनतीमुळे हे बंधारे पाण्याने भरले आहेत, ज्यामुळे या परिसरातला पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी आणण्यासाठी मंत्री विखे आग्रही आहेत, असं जिल्हा … Read more

पद्मश्री राहीबाईं पोपरे यांची नवी चळवळ, गावरान बियाण्यांनी शेतीत होणार परिवर्तन!

अकोले- तालुक्यातील पोपेरवाडी, कोभाळणे गावात राहणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाईंनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना भरडधान्य आणि भाजीपाल्यासाठी गावरान, देशी बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि बियाणे सोडून गावरान वाणांच्या लागवडीचं आवाहन केलं आहे आणि यासाठी … Read more

आईच्या मदतीने पतीचा खून ! अहिल्यानगर जिल्ह्यातील खळबळजनक घटनेत नातवाच्या तोंडून बाहेर आलं सत्य

श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे, जिथे पती-पत्नीमधील किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात झाले. पतीने पत्नीला माहेरी जाऊ न देता नगरमध्ये मुलांसह राहण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातून पत्नीने आपल्या आईच्या सहाय्याने पतीवर हल्ला करून त्याचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नी … Read more

अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, आमदार आशुतोष काळे यांची मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी निवड

कोपरगाव- आमदार आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. शासनाने विधान मंडळाच्या वेगवेगळ्या समित्या जाहीर केल्या आणि त्यांचे अध्यक्षही निश्चित केले. यात मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मराठी भाषा समिती ही महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाचं अंग आहे. मराठी भाषेचा विकास व्हावा आणि तिचा योग्य … Read more