भाजीपाल्यांचे दर घसरल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमती झाल्या कमी, डाळींच्या किमतीत वार्षिक १४ टक्क्यांनी घट

भाज्यांच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्यामुळे जुलैमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाच्या सरासरी किमतीत घट झाली. शाकाहारी थाळीची किंमत वर्षानुवर्षे १४ टक्क्यांनी घसरून ३२.६ रुपयांवरून २८.१ रुपयांवर आली आहे. पण मासिक आधारावर त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जूनमध्ये किंमत २७.१ रुपये होती, असे क्रिसिल इंटेलिजेंसच्या रोटी-चावल दर अहवालामध्ये म्हटले आहे. टोमॅटो, कांदे आणि … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजारात २४२० क्विंटल भाजीपाल्याची आवक, टोमॅटोच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची २४२० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोच्या भावाची तेजी कायम आहे. टोमॅटोची २२२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ६०४ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते … Read more

डाळिंबाची लाली ओसरली ; भावात झाली तब्बल पाच हजार रुपयांची घसरण

अहिल्यानगर : काल परवा पर्यंत डाळिंबाला १५हजार रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळत होते. मात्र आता हे भाव कमी झाले असून ते थेट १०हजारांवर आल्याने तब्बल ५ हजारांची तूट झाली आहे. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी विविध फळांची ३९४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. … Read more

संततधार पावसामुळे टोमॅटोची लाली वाढली ; किरकोळ बाजारात किलोला मिळतोय ६० रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर : संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढण्यात झाला आहे. आठवड्यापूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यातही उत्तम दर्जाच्या टोमॅटोला प्रतिकिलो ६० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. पावसामुळे नवीन टोमॅटो लागवडही मंदावल्याने … Read more

कांदा भाव वाढीसाठी पारनेमध्ये ‘अन्नत्याग आंदोलन’ ; कांद्याला हमीभाव द्या

अहिल्यानगर : सध्या कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यासाठी झालेला खर्च देखील वसूल होत1 नसल्याने त्यांची खूप आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे . त्यामुळे कांदा या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. ३५ ते ४० रूपये किलो भाव देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पाठबळ दिले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला मिळतोय १६०० रुपयांपर्यंत भाव, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३१ हजार १३१ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या भाव भाव पडलेलेच असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी केलेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ५०० ते ८०० रुपये भाव मिळाला. … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव, जाणून घ्या इतर फळांचे आजचे बाजारभाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी २८० क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ६९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १७ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ६००० रुपये भाव मिळाला. पपईची २३ क्विंटल आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १ … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्याला मिळाला ७००० रूपयांचा भाव, जाणून घ्या इतर भाजीपाल्याचे काय आहेत दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची १९३७ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४४० क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १२०० ते २४०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ३९० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १८०० रुपये भाव मिळाला. वांग्याची १८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना २००० … Read more

अहिल्यानगरच्या बाजार समितीत कांद्याच्या भावात पुन्हा घसरण, सोमवारच्या बाजारात प्रतिक्विंटल कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव?

अहिल्यानगर- अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी २४ हजार २२० क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १४०० ते १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात शंभर रुपयांनी घट झाल्याचे दिसून आले. अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ४४ हजार ३६ गावरान कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळांची आवक घटली, मात्र डाळिंबांना मिळाला १६ हजारापर्यंत भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची २२१ क्विंटल आवक झाली होती. कालच्या तुलनेत फळांची आवक घटली आहे. यावेळी मोसंबीला ४ हजार, तर डाळिंबांना १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी डाळिंबांची ३२ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर मोसंबीची … Read more

आषाढीनिमित्त रताळ्यांची आवक वाढली; अहिल्यानगरमध्ये मिळाला प्रतिक्विंटल ३ हजारांपर्यंत भाव

अहिल्यानगर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत. आषाढी एकादशीचे वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी घरातील लहान थोर मंडळी उपवास करतात. त्यामुळे या उपवासासाठी शाबुदाना, केळी तसेच रताळे, बटाटे आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्या अनुषंगाने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी रताळ्याची ३३४ क्विंटल … Read more

अहिल्यानगरच्या भाजी बाजारात २५३३ क्विंटल भाजीपाल्यांची आवक, जाणून घ्या कोणत्या भाज्यांचे काय आहेत दर?

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी २५३३ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ७२२ क्विंटल बटाट्याची, तर ६६६ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १६०० रुपये भाव मिळाला. वांगे, दोडक्याला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत गुरुवारी वांग्यांची … Read more

हापूस, पायरी सोडा… हा आंबा आहे 3,00,000 रुपये किलो; काय आहे यात एवढे खास? वाचा

जगातील सर्वात महागड्या आंब्याची चर्चा होते, तेव्हा मियाझाकीचे नाव सर्वात आधी येते. या आंब्याची लागवड जपानमध्ये केली जाते. पण आता भारतातील शेतकऱ्यांनीही मियाझाकी आंब्याची शेती सुरू केली आहे. चव आणि सुगंधासाठी हा आंबा जगभर ओळखला जातो. हा आंबा जगातील सर्वात महागडे फळ म्हणूनही ओळखले जाते. एक किलो मियाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये … Read more

अहिल्यानगरात गावरान कांद्याची आवक वाढली, पण भाव मात्र घसरले, प्रतिक्विंटल मिळतोय एवढे रुपये भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गावरान लाल कांद्याची आवक सोमवारी (१२ मे २०२५) ४५,७३५ गोण्यांवर पोहोचली, जी शनिवारच्या तुलनेत १०,००० गोण्यांनी जास्त आहे. मात्र, ही वाढलेली आवक शेतकऱ्यांसाठी सुखद ठरली नाही, कारण कांद्याचे भाव घसरलेले आहेत. लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १,२०० ते १,४०० रुपये भाव मिळाला, तर काही अपवादात्मक … Read more

अहिल्यानगर बाजारात भाजीपाल्याची ११८५ क्विंटल आवक मात्र भाव स्थिर, हिरव्या मिरचीला ६ हजारांपर्यंत भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाला आणि फळांची मोठी आवक झाली, आणि भाव सामान्यपणे स्थिर राहिले. शेतकऱ्यांनी १,१८५ क्विंटल भाजीपाला विक्रीसाठी आणला होता, तर फळांची ४३४ क्विंटल आवक नोंदवली गेली. हिरव्या मिरचीने २,५०० ते ६,००० रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळवला, तर बटाट्याच्या भावात शंभर रुपयांची वाढ झाली. लिंबू, टोमॅटो, … Read more

Ahilyanagar Politics : गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही ! विधानसभेला आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती – डाॅ.सुजय विखे पाटील

Ahilyanagar Politics News : घनकचरा किंवा सांड पाण्याचे शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होईल असा प्रकल्प देशामध्ये सर्वप्रथम शिर्डी मध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.०, मलनिःसरण प्रकल्पांतर्गत टर्शरी ट्रीटमेंट प्लँट लोकार्पण सोहळ्यानिमित्त डाॅ.सुजय विखे पाटील बोलत होतेे. शिर्डी … Read more

महाराष्ट्रात ११ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.६ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यात ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ मे. टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याचे रावल यांनी सांगितले.सोयाबीन खरेदी करण्यासाठीची मुदत गुरुवार, ६ फेब्रुवारी … Read more

बाजारभावाने दिल्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी !

Ahilyanagar News : तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर घटले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.तुरीचे पडते दर बघता शेतकऱ्यांना किमान हमीदर तरी मिळावा अशी मागणी होत आहे. … Read more