शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? संपूर्ण माहिती वाचा सविस्तर

राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! एक रुपयाच्या जुन्या पीक विमा योजनेतले गैरप्रकार लक्षात आल्यावर आता सरकार नवीन, सुटसुटीत आणि विश्वासार्ह पीक विमा योजना आणणार आहे. याबरोबरच ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलं. एवढंच नाही, तर तृणधान्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना आणि शेतीत पाच हजार … Read more

अहिल्यानगरमध्ये यंदा ज्वारीपेक्षा कडबा महागला, शेतकऱ्याला कडब्याच्या पेंढीला मोजावे लागत आहेत एवढे पैसै!

अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीच्या पेरणीखालील क्षेत्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. त्यातच रानडुक्कर आणि हरणांसारख्या जंगली प्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने चाऱ्याची टंचाई वाढली आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे डोळे हिरव्या चाऱ्याकडे लागले आहेत. गावांमधील बाजारपेठांमध्ये हिरव्या चाऱ्याची मागणी वाढली असून, आश्चर्याची बाब म्हणजे ज्वारीच्या तुलनेत कडब्याला दुप्पट भाव मिळत आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी नवे आव्हान … Read more

पिकांचे भाव घसरले, मार्चच्या शेवटी अडचणी वाढल्या, शेतकऱ्यांचं लक्ष कर्जमाफीवर!

जामखेड- सध्या मार्च महिना सुरू झालाय आणि शेतकऱ्यांवर कर्जाचे हप्ते भरण्याचा ताण वाढतोय. पीककर्ज, शेतीसाठी आणि इतर गरजांसाठी घेतलेलं कर्ज भरण्यासाठी पैसा हवा आहे, पण रब्बी हंगामातल्या पिकांना बाजारात भावच मिळत नाहीये. ज्वारी, हरभरा, तूर यांचे दर गडगडलेत. अशा परिस्थितीत कर्जाचा हप्ता कसा भरायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील रंगीत खरबुजांचा दुबईत स्वाद, तरुण शेतकऱ्यांनी दुष्काळावर मिळवला विजय

दुष्काळाचं सावट डोक्यावर असताना मांडवगण परिसरातील बांगर्डे गावातल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली आहे. बलभीम शेळके आणि नितीन जाधव या युवा शेतकऱ्यांनी कमी पाण्यात नियोजन करत रंगीत खरबुजांची शेती फुलवली आणि ती थेट दुबईपर्यंत पोहोचवली. रमजान ईदच्या निमित्ताने या खरबुजांचा स्वाद तिथल्या लोकांना चाखायला मिळाला. बांगर्डे गावाचा पाण्याचा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे. इथे उन्हाळ्यात … Read more

खरबुजाला भाव नाही! ३० रुपयांवरून थेट १० रुपयांवर – शेतकरी आर्थिक अडचणीत

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक १५ ते १८ टनांवर पोहोचली आहे, परंतु या वाढत्या आवकेमुळे खरबुजाच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव रविवार, २३ मार्च २०२५ रोजी १० ते १५ रुपये किलोपर्यंत खाली आला. यामुळे शेतकऱ्यांना खरबूज लागवडीवर झालेला खर्च वसूल करणे अवघड झाले आहे. उन्हाळ्यात … Read more

कर्जमाफी दिली नाही, आता फसवणुकीचा गुन्हा दाखल ! १४ एप्रिलपासून शहरांचा शेतमाल रोखणार

श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेचे विधिज्ञ अजित काळे यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारून निवडणुकीत दिलेल्या लेखी आश्वासनांचा भंग केल्याचा दावा त्यांनी केला. याविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हा सत्र न्यायालयात सरकारविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत … Read more

पोहताना मृत्यूच्या दारात ? शेततळ्यांतील दुर्घटनांवर संगमनेरात विशेष मोहीम!

उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळावा म्हणून अनेकजण शेततळे, विहिरी, बारव आणि जलसाठ्यांमध्ये पोहण्यासाठी जातात. मात्र, या ठिकाणी योग्य सुरक्षेचा अभाव आणि माहिती नसल्याने शेततळ्यात बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या दुर्घटना अहिल्यानगर जिल्ह्यात वारंवार घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील अशा घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले की, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच म्हशींचा स्वतंत्र बाजार; जाणून घ्या ठिकाण

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवार, २५ मार्च २०२५ पासून म्हशींचा बाजार सुरू होणार आहे. राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात हा बाजार भरवला जाणार असून, याबाबतची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि उपसभापती आण्णासाहेब कडू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रसंगी बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे आणि संचालक मंडळातील … Read more

जमीन स्वतःची तरीही शेती दुसऱ्यांच्या हाती; शेतकरी का आहेत चिंतेत

अहिल्यानगर : शेतीच्या वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचा शेती स्वतः कसण्याऐवजी ती हिश्श्याने (वाट्याने) देण्याकडे कल वाढत आहे. मजुरांची कमतरता, वाढता खर्च आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जिरायत क्षेत्राबरोबरच बागायती शेतीदेखील निम्म्या हिश्श्याने देण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादनापेक्षा लागवड खर्च जास्त होत असल्याने स्वतः शेती करणे परवडत नाही. … Read more

पाणथळ व क्षारयुक्त जमिनीच्या समस्या सोडविण्यासाठी बंदिस्त चर योजना राबविणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

बई, दि. २१ :- पाण्याचा अतिवापर, पाणी निचरा न होणे यामुळे राज्यातील काही भागात पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत बंदिस्त चर योजना राबविण्यात येणार असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. सदस्य राहुल कुल यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली … Read more

कांद्याने रडवलं! – दर घसरले, खर्चही निघणार नाही; शेतकरी संकटात!

नगर तालुका हा कांदा उत्पादनात राज्यात अग्रेसर मानला जातो आणि येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून आहे. कांद्याला “पठार” अशी नवी ओळख मिळालेल्या या तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. यंदा विक्रमी कांदा उत्पादन झाले असले तरी बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याला ५ ते … Read more

१ एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू ! – वारस नोंदीसाठी महसूल विभागाची तयारी!

जामखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२५ पासून जिवंत सात-बारा मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने या मोहिमेसाठी परिपत्रक जारी करून महिनाभराचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. या मोहिमेचे समन्वय तालुका स्तरावर तहसीलदारांकडे सोपवण्यात आले असून, सात-बारा उताऱ्यांवरील मृत खातेदारांची नावे काढून त्यांच्या वारसांची … Read more

१४ एप्रिलपूर्वी कर्जमाफी नसेल तर दूध, साखर, भाजीपाला बंद ! शेतकऱ्यांचा एल्गार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिलच्या जयंतीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, तर साखर कारखान्यांकडून बाहेर पाठवली जाणारी साखर तसेच शहरांना मिळणारे दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात प्रत्येक तालुक्यात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष … Read more

अबब ! गवार १३६ रुपये, भेंडी, मिरची ५० रुपये किलो; तर टरबूज, मेथी पालक फक्त ४ रुपयांना

मार्केटमध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे. काही भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. तर काही भाजीपाल्याचे , फळांचे दर फार कमी झाले आहेत. यात गवार सध्या १३६ रुपये किलोपर्यंत गेली आहे. भेंडी, हिरवी मरीची ५० रुपयांपर्यंत गेली आहे. टरबूज, खरबूज, मेथी, पालक मात्र अत्यंत उतरले असून भाव ४ ते पाच रुपयांपर्यंत आले … Read more

Onion Price : मागील वर्षापेक्षा कांद्याला चांगले दर: मार्चमध्ये टिकून, पण निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Onion Price : श्रीरामपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यंदा मार्च २०२५ मध्ये कांद्याला मागील वर्षाच्या तुलनेत चांगले दर मिळत आहेत. सध्या कांद्याचे दर प्रतिक्विंटल १६०० ते १८०० रुपये असून, शेतकऱ्यांना या दरामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने सध्याचे २० टक्के निर्यात शुल्क हटवल्यास दर २,००० रुपये क्विंटलपर्यंत जाऊ शकतात. मात्र, यंदा कांदा लागवडीला … Read more

तंत्रज्ञानाची साथ अन मेहनतीच्या जोरावर तरुण शेतकऱ्याने अवघ्या दहा गुंठ्यात कमावले दहा लाखांचे उत्पादन!

अहिल्यानगर: सध्या शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही, मजुरी खूप वाढली आहे, मालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेती परडवत नाही. यामुळे बहुतेकजण शेती करणे नको रे बाबा असे म्हणत शेतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. एकीकडे शेतीपासून शेतकरी दूर पळताना दिसत असताना दुसरीकडे मात्र दुष्काळी असलेल्या जामखेड तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्याने शेतीत नवीन प्रयोग करत अवघ्या दहा … Read more

चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला ; भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था

अहिल्यानगर : नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहीले जाते यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा पीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मार्च महिन्याच्या सुरुवातीस कांद्याला सरासरी २५००ते ३००० रूपये भाव मिळत होता. परंतु मार्च महिन्यात कांद्याची काढणी सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक वाढताच कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात … Read more

शेतात काम करण्यास मजुरांचा नकार; शेतकऱ्यांना करावी लागतात रात्री कामे

अहिल्यानगर : सध्या राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यात जिल्ह्यातील देखील तापमान कमालीचे वाढलेले आहे. मात्र ग्रामीण भागात अद्याप शेतीची कामे प्रलंबित आहेत.मात्र या वाढलेल्या तापमानामुळे शेतात काम करण्यास मजूर तयार नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले … Read more