अहिल्यानगरकरांसाठी महानगरपालिकेचे १०० बेडचे अद्ययावत रूग्णालय लवकरच होणार सुरू, ९० टक्के काम पूर्ण
अहिल्यानगर- शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील महापालिकेच्या जागेत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शंभर बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत आहे. इमारतीचे काम आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगरकरांना अद्यायवत आरोग्य सेवा मिळणार आहे. अहिल्यानगर शहरात महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय नगरकरांच्या सेवेत आहे. मात्र, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात अपुऱ्या जागेमुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. … Read more