डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील खरीप नुकसानीची केली पाहणी

Dr. Sujay Vikhe Patil

लोणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणी बुद्रुक, हणमंतगाव व पाथरे या भागातील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, मका यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड … Read more

नुकसानीसाठी मोठा निधी लागणार; मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार – पालकमंत्री विखे पाटील

पाथर्डी दि.१६ :  यापुर्वी कधीही झाला असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नूकरसान झाले आहे.झालेल्या नूकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल.स्थायी आदेशा प्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.परंतू मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहीती जलसंपदा तथा … Read more

“कामाच्या गुणवत्तेवरच ठेकेदारांची ओळख; राजकारण आणि ठेकेदारी वेगळीच राहणार” डॉ. सुजय विखे पाटील

राहाता :  शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला असला तरी यापुढील काळात गुणवत्ता, आधुनिकता आणि शिस्तीवर भर दिला जाणार असून, ठेकेदारांनी कामाच्या दर्जावर भर द्यावा, अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली. भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस व अभियंता दिनानिमित्त राहता नगरपरिषद येथील सभागृहामध्ये राहता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स … Read more

Ahilyanagar Airport : अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी विमानतळ उभारा ! खासदार नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

Ahilyanagar Airport : सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा विस्तार करून सुपा परिसराशी जोडणी करण्याचा प्रस्तावही खा. लंके यांनी ठेवला आहे. खा. लंके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुपा हे महाराष्ट्रातील एक … Read more

पाणी ‘पोर-बाळांनीच” आणून दाखवल!-डॉ. विखे निळवंडे डाव्या कालव्याचे जलपूजन संपन्न.

संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत,माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला.पन्नास वर्ष सर्व सर्व सतास्थान असताना सुध्दा तुम्हाला जे करता आल नाही, ते पोरा बाळांनीच करून पाणी आल्याच सिध्द करून दाखवल असल्याचा टोला लगावला. … Read more

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर … Read more

चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी- “राज्यात महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करत आहोत. कोणत्याही पक्षाकडून चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त केली पाहिजे. कारण अशा चुका संपूर्ण महायुतीवर परिणाम घडवतात. राज्यातील जनतेने दिलेला जनादेश ही आपली जबाबदारी आहे आणि त्याचा सन्मान करणं अत्यावश्यक आहे, चुका करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा,” असे स्पष्ट मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्त्वपूर्ण आणि दूरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च … Read more

महायुतीला जनादेश, पण कार्यकर्त्यांचा ‘अति उत्साह’ महागात पडतोय विखे पाटलांचा टोला

राज्यात आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतो.ज्या पक्षाकडून चुका होतात त्यांनी त्या दुरूस्त केल्या पाहीजेत.महायुतीवर या गोष्टीचा परीणाम होतो.राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे.त्याचा आदर केला पाहीजे चुकीच्या पध्दतीने वागणार्या कार्यकर्त्यांना अटकाव केला पाहीजे असे मत जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रसारीत झालेल्या व्हीडीओ … Read more

जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत ठाम मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण आणि दुरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची आवष्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची … Read more

नाव महिला आयोगाचं, कारस्थान फसवणुकीचं! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी!

राहुरीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी उभं असणारं महिला आयोग, तर दुसरीकडे त्याच नावाचा गैरवापर करत महिलांना फसवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश झालाय. हे सगळं घडलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका पदाधिकाऱ्यामुळे. आणि या प्रकारामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसला आहे. घटना अशी आहे की, … Read more

काँगेस पक्षाला विचारधारा आहे, पक्ष संकटात असतांना अनेक जण सोडून गेले मी गेलो नाही, भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर- १९८५ साली सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आपण निवडून आलो. मागील ४० वर्ष राजकारणात राहिलो. पराभव हा अनपेक्षितच होता. इतकी मोठी संधी तालुक्यातील जनतेने मला दिली, १८ वर्ष मंत्रिमंडळात राहिलो. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरही मला मोठी संधी दिली. मतदार संघातही मी चांगली विकास कामे केली, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. याबाबत … Read more

माननीय विखे.. आपला बाळासाहेब ! थोरातांनी सांगताच विखे धावले, प्रश्नही तात्काळ सोडवला..

संगमनेर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना आज (दि.१५) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै … Read more

श्रीगोंदेतील मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचे गणित बदलणार; आ.पाचपुते यांची राजकीय खेळी

मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा आज (दि.१५) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या व तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. श्रीगोंदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम डाके तसेच तांदळी दुमालाचे सरपंच संजय निगडे, तांदळी दुमालाचे माजी सरपंच देविदास … Read more

जामखेड तालुक्यातील जवळेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंकेंची उपस्थिती

जामखेड- गुरुपोर्णिमेनिमित्त तालुक्यातील जवळा येथे श्री जवळेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हजारो भाविकांनी रथयात्रेला हजेरी लावली. श्री जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिध्द असून, गुरुपोर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या रथयात्रेला वेगळे महत्व आहे. रथयात्रेनिमित्त सकाळी जवळेश्वर मुकुटाची आरती करून, रथामध्ये प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतानाच नारळाचे तोरण रथाला अर्पण केले. दुपारी एक वाजता … Read more

संगमनेरमधील गटार दुर्घटनेतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करा- आमदार अमोल खताळ

संगमनेर- शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर भूमिगत गटारीच्या साफसफाईदरम्यान ठेकेदारांच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत ठामपणे मांडली. या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल पवार याच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार ३० … Read more

संगमनेर गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर शहरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे भूमिगत गटार जोडली. यामुळे या सुरू असलेल्या कामात दोन कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नगरपालिकेने किंवा सरकारने तातडीने प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी तसेच नगरपालिकेतील प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी … Read more

25 वर्षे पाण्याचा प्रश्न मिटणार ! शिवधनुष्य उचललं सुजय विखेंनी, आता गाव पाण्याच्या संकटातून मुक्त होणार

Ahilyanagar News : जेव्हा गोदावरी कालव्याचे काम पूर्ण होईल, तेव्हापासून पुढील २५ वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असा आम्ही शब्द नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने देतो असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. एकरुखे तालुका राहाता येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक १, नाशिक अंतर्गत उजव्या तट … Read more