डॉ.तनपुरे कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने २१ जागा जिंकत केली एकहाती सत्ता स्थापन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पॅनेलचा उडवला धुव्वा

Ahilyanagar News: राहुरी- येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्व २१ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाने लढणाऱ्या शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांच्या कारखाना बचाव कृती समितीचा दारुण … Read more

Astrology Predictions : पुढील निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत ! प्रख्यात ज्योतिषाचार्य स्पष्टच बोलले…

Astrology Predictions : प्रख्यात ज्योतिषाचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी एक पत्रकार परिषद घेऊन देश व राज्याच्या भविष्यातील राजकीय स्थितीचे अचूक विश्लेषण मांडले. त्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व येत्या काळातही कायम राहील. देशाच्या राजकीय पटावर त्यांची छाप स्पष्टपणे दिसून येईल. निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी गृहमंत्री अमित शहा यांचे राजकीय चातुर्य असून, त्यांच्या रणनीतीने देश … Read more

Ahilyanagar Politics : राजकारणात माझं पुनरागमन ठरलं ! सुजय विखेंचं मिश्किल वक्तव्य चर्चेत

Ahilyanagar Politics : राहाता तालुक्यातील डोहाळे गावात नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी दाखल झाले. तब्बल चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर हे पाणी गावात पोहोचल्यामुळे संपूर्ण परिसरात जलोत्सवाचे वातावरण होते. या ऐतिहासिक प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जलपूजन सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावकऱ्यांनी जलाचा उत्सव साजरा करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून … Read more

Shrigonda Politics : राष्ट्रवादीत प्रवेश, पण भाजपवर शून्य परिणाम ? आमदार विक्रम पाचपुतेंचं मोठं वक्तव्य!

Shrigonda Politics : श्रीगोंदा तालुक्यातील माजी आमदारांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, या पक्षप्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे, या प्रवेशप्रक्रियेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीऐवजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत एका इतर कार्यक्रमातील पत्रकार परिषदेत पार पडले, … Read more

पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा…. मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह… आरोपांच्या फेरीत जोर्वे ग्रामसभा गाजली

Ahilyanagar News : संपूर्ण गाव एकत्र एकवटले असताना आदिवासींचा निधी यांचा विविध विकास कामांचा निधी नेमका कुठे गेला असे अनेक प्रश्न विचारले असताना विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामसभेमध्ये मोठा राडा झाला. जोर्वे येथे  ग्रामसभा होती, परंतु ती ग्रामसभा गाजली काही विशिष्ट कारणांनी सामान्य जनता आपल्या कष्टाचा … Read more

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगणमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि सामाजिक गौरव पुरस्कार

Ahilyanagar News : जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध विकास कामाचा शुभारंभ तसेच अण्णा हजारे यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति आणि संस्थाना देण्यात येणार्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात मंत्री … Read more

एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे – माजी कृषिमंत्री थोरात

Ahilyanagar News, : -ऊस व दूध हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. सातत्याने वापर होत असलेल्या शेतीमध्ये सेंद्रिय द्रव्यांची कमतरता झाली असून ती भरून काढण्याबरोबर कमी पाणी व कमी श्रमामध्ये एकरी 100 टना पेक्षा जास्त उत्पादन होणे गरजेचे असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन … Read more

श्रीगोंद्यात आगामी निवडणुकीत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता, जगताप, नागवडेंच्या प्रवेशामुळे महायुतीतच रंगणार महाभारत

Ahilyanagar Politics : श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने राष्ट्रवादी हा तालुक्यातील सर्वाधिक नेते असलेला पक्ष बनला आहे. या घडामोडींमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी … Read more

पारनेरमधील ‘या’ निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार निलेश लंकेंचा एकाच उमेदवाराला पाठिंबा, प्रचाराच्या सभाही घेतल्या

Ahilyanagar Politics: पारनेर- तालुक्यातील जी.एस. महानगर बँकेच्या निवडणुकीने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. खासदार नीलेश लंके आणि आमदार काशिनाथ दाते यांनी गीतांजली शेळके यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी सक्रियपणे पुढाकार घेतला आहे. गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखालील स्वालिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाला आहे, तर दुसरीकडे सासू सुमनताई शेळके आणि नणंद स्मिता … Read more

माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, पवारांचा शब्द अंतिम असल्याचं सूतोवाच

Ahilyanagar News: अहिल्यानगर- मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी सकाळी एक महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. श्रीगोंदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तसेच नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या … Read more

… नाहीतर जिल्ह्यातील आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, संगमनेरमधील बैठकीत जिल्हाध्यक्षांनी दिला इशारा

Ahilyanagar Politics: संगमनेर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची महत्त्वाची बैठक संगमनेरात पार पडली. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला जागा वाटपात योग्य स्थान मिळावे, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांनी सांगितले. बैठकीत काय झालं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगमनेरातील कार्यालयात झालेल्या या बैठकीत शहर … Read more

मतदार संघात मल्टीमोडल लॉजिस्टिक हब हवा खासदार नीलेश लंके यांची आग्रही मागणी

Ahilyanagar News : नगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली. खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले. खा. लंके यांनी यासंदर्भात मंत्री सोनोवाल यांची भेट घेत शेती, उद्योग … Read more

अहिल्यानगरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, ‘हा’ मा.आमदार करणार आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Ahilyanagar Poliitics : श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप आणि ठाकरे शिवसेनेतील नेते तसेच नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे बुधवारी (दि. २८ मे २०२५) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे, … Read more

खासदार निलेश लंके यांनी योग्य ठिकाणी आवाज उठवावा, आमदार विक्रम पाचपुते यांचा सल्ला

Ahilyanagar Politics: श्रीगोंदा- तालुक्यातील निमगाव खलू येथील टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी खासदार निलेश लंके यांनी केलेल्या आंदोलनावर आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खा. लंके यांना टोलमाफीचा शासकीय आदेश आणून देण्याचे आव्हान देत, योग्य ठिकाणी आवाज उठवण्याचा सल्ला दिला आहे. जर असा आदेश असेल, तर आपण स्वतः पुढाकार घेऊन टोलमाफी … Read more

शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या खा. नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

Ahilyanagar News : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. खा. लंके सध्या कामकाजानिमित्त नवी दिल्लीत असून, महाराष्ट्र सदनामध्ये मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली. … Read more

जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार -ना. विखे पाटील

Ahilyanagar News,  : जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून,या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सूरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

माजी आमदार राहुल जगताप यांना मोठा धक्का, श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती लोखंडे यांचे सभापती व संचालकपद रद्द

Ahilyanagar Poliitics: श्रीगोंदा- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातील गैरव्यवहारांमुळे सभापती अतुल उर्फ प्रवीण लोखंडे यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ आणि नियम १९६७ यांचे एकाहून अधिक वेळा उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी लोखंडे यांचे सभापती आणि संचालकपद रद्द केले आहे. या कारवाईमुळे माजी … Read more

अजित पवार लग्नाला गेले म्हणून टीका करणे चुकीचे, वैष्णवी हगवणे प्रकरणावरून सुजय विखेंनी केली पवारांची पाठराखण

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने पुणे शहरात आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लग्न समारंभाला उपस्थितीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, एखाद्या लग्न समारंभाला उपस्थित राहणे आणि तिथे … Read more