सापांची भीती वाटते का ? मग 10 रुपयांचा खर्च करून ‘हा’ एक सोपा उपाय ट्राय करा, घरात कधीच साप घुसणार नाही

Published on -

Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते का? मग आज आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचे प्रमाण वाढते. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यात सुद्धा सापांचा धोका कायम असतो.

खरे पाहता, भारतात सापाच्या फार मोजक्याच जाती अशा आहेत, ज्या की प्रचंड विषारी आहेत. यामध्ये मन्यार, कोब्रा अशा जातींचा समावेश होतो. मात्र विषारी जातींची संख्या कमी असली तरीही देशात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे.

यामुळे अनेक जण सापांपासून कसे संरक्षण करायचे असा प्रश्न उपस्थित करतात. साप घरात घुसू नये किंवा घराशेजारी येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच बाबत आज आपण या लेखातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हा उपाय करणार सापांपासून संरक्षण

साप हा थंड रक्ताचा जीव असल्याने तो हिवाळ्यात उबदार जागेच्या शोधात असतो. यामुळे उबदार जागेच्या शोधात तसेच अन्नाच्या शोधात अनेकदा साप आपल्या घरात घुसण्याची शक्यता असते.

विशेषता जी घरे जंगलाच्या जवळ असतात अशा ठिकाणी सापांची भीती अधिक असते. दरम्यान तुम्हाला पण सापांची भीती वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय सांगणार आहोत जो की फक्त दहा रुपयांमध्ये करता येतो.

विशेष म्हणजे या दहा रुपयांच्या ट्रिकने सापांची भीती बरीच कमी होते. दहा रुपयांचा एक छोटासा उपाय केल्यास साप तुमच्या घरात शिरणार सुद्धा नाही. असे सांगितले जाते की सापांना काही विशिष्ट पदार्थांचा वास अजिबात आवडत नाही.

सोशल मीडियामध्ये असा दावा केला जातो की सापाला कांदा आणि लसून याचा वास सहन होत नाही. कारण लसून आणि कांद्यामध्ये सफ्ल्यूरिक कंपाऊंड असतं. या पदार्थांमध्ये असणारे हे घटक सापांना अजिबात आवडत नाहीत.

या वासाचा सापांना प्रचंड त्रास होत असतो. यामुळे साप घरात येऊ नये यासाठी तुम्ही दोन – तीन कांदे आणि लसनाच्या काही पाकळ्या घेऊन त्याचं मिश्रण करा आणि हे मिश्रण ज्या ठिकाणी सापांचा धोका वाटतो तिथे ठेवा.

साप घरात घुसू शकतो असं तुम्हाला वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण थोड्या-थोड्या प्रमाणात पसरून ठेवा असे केल्यास साप पुन्हा कधीच घरात येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe