देशभरात कोरोना पसरला ! २४ तासांत कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण

Ahmednagarlive24 office
Published:
Corona virus

Corona virus : देशात कोरोनाच्या जेएन-१ उपप्रकाराचे १९६ रुग्ण आढळून आले आहेत. देशातील १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत जेएन-१ चा संसर्ग पसरल्याचे ‘इन्साकॉग’ ने सोमवारी सांगितले. देशात गत २४ तासांत कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ होऊन ती ४,३९४ झाली आहे.

जेएन-१ या उपप्रकाराचे सर्वाधिक ८३ रुग्ण एकट्या केरळ राज्यात सापडले आहेत. केरळनंतर गोव्यात सर्वाधिक ५१ रुग्ण, त्यानंतर गुजरातमध्ये ३४, कर्नाटक ८, महाराष्ट्र ७, राजस्थान ५, तामिळनाडू ४, तेलंगाणा २, ओडिशा व दिल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचे सार्स व कोविडशी निगडित देशातील सर्वोच्च संस्था ‘इन्साकॉग’ने सांगितले.

डिसेंबर महिन्यात जेएन-१ चे देशात १७९ रुग्ण आढळून आले होते. त्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या या उपप्रकाराचे १७ रुग्ण आढळून आल्याचे इन्साकॉगच्या आकडेवारीत म्हटले आहे.

जेएन-१ हा अत्यंत वेगाने पसरणारा कोरोनाचा उपप्रकार असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने त्याला व्हेरियंट ऑफ इंट्रेस (व्हीओआय) मध्ये वर्गीकृत केले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात गत २४ तासांत कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या साडेचार कोटींहून अधिक झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe