Corona Update : जगाला मोठ्या संकटात टाकणारा कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत.
मात्र आज गुरुवारी पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये (corona patients) वाढ झाली असून 2364 नवीन बाधित आढळले, तर बुधवारी 1829 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, मंगळवारी 1569 नवीन रुग्णांची नोंद झाली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) गुरुवारी सकाळी ८ वाजता अपडेट (Update) केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या वाढत आहे.
मात्र, नव्याने संक्रमित झालेल्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात २५८२ जणांनी कोरोनावर मात केली असून १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशातील सक्रिय प्रकरणांमध्ये २२८ ची घट झाली असून त्यांची संख्या 15,419 आहे. साथीच्या आजाराने आणखी १० मृत्यूंसह देशातील एकूण मृत्यूंची संख्या 5,24,303 वर गेली आहे. गुरुवारी, 2364 नवीन संसर्ग आढळून आले, ज्यामुळे देशातील एकूण कोविड रुग्णांची संख्या 4,31,29,563 झाली.
गेल्या तीन दिवसांतील मृत्यूच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर त्यातही मोठी चढ-उतार दिसून येत आहे. बुधवारी 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death) झाला, तर मंगळवारी 19 जणांचा मृत्यू झाला आणि गुरुवारी 10 लोकांचा मृत्यू झाला.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दैनिक संसर्ग दर 0.50 टक्के आणि साप्ताहिक दर 0.55 टक्के नोंदवला गेला. देशात या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 4,25,89,841 झाली आहे, तर मृत्यूदर 1.22 टक्के नोंदवला गेला आहे. देशभरात कोरोनाविरुद्ध लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 191.79 कोटीहून अधिक कोविड डोस देण्यात आले आहेत.