शिर्डीतील व्यावसायिकांबाबत प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन देखील सतर्क झाले असून विविध उपायोजना करत आहे.

यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी येथून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. शिर्डीतील सर्व व्यावसायिकांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येत आहे.

शिर्डी नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमिवर मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते.भविकांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यावसायिकांची करोना चाचणी करण्यात येत आहे.

दरम्यान राज्यासह नगर जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे नगरपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदार आणि कामगारांची करोना तपासणी सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांनी देखील कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान आज राज्यात कोरोना विषाणूच्या 26,538 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

आज राज्यात 8 मृत्यू झाले असून, 5,331 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 87,505 सक्रीय रुग्णाच्यावर उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणाची संख्या 797 वर पोहोचली आहे. यातील 330 रुग्ण बरे झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe